शब्दांत न मावणारे कर्तृत्व प्रा. भगवान महाजन सर....!
शब्दांत न मावणारे कर्तृत्व प्रा. भगवान महाजन सर....! जांभोरे, ता. धरणगाव येथील एका अगदी साध्या, सर्वसामान्य कुटुंबात सेवानिवृत्त प्रा. भगवान महाजन सर यांचा जन्म झाला. त्यांचे वडील शेती करून कुटुंबाचा गाडा ओढत होते. घरची परिस्थिती अत्यंत नाजूक होती. दैनंदिन जीवनात गरिबी, कष्ट, ताणतणाव आणि अनेक मर्यादा यांचा सामना करावा लागत होता. जीवनाची सुरुवातच संघर्षाने भरलेली होती. बालपणीच आई-वडिलांचे अविरत कष्ट, त्याग आणि दुःख जवळून पाहताना त्यांच्या मनात एक ठाम विचार खोलवर रुजला“घरची परिस्थिती बदलायची असेल, तर शिक्षणाशिवाय दुसरा कोणताही मार्ग नाही.”हा विचार केवळ वाक्य न राहता त्यांच्या आयुष्याचा ध्यास बनला, जीवनाचा दीपस्तंभ ठरला. परिस्थिती कितीही कठीण असली, तरी त्यांनी कधीही हार मानली नाही. अनेक अडचणी, अभाव आणि संकटांवर मात करत, स्वकर्तृत्वावर, प्रामाणिक परिश्रमावर आणि अखंड चिकाटीवर विश्वास ठेवून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. शिक्षण हेच आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला अंधारातून प्रकाशाकडे नेईल, या श्रद्धेने ते अखंड झटत राहिले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते पडघे येथे शिक्षक म्हणून रुजू झाल...