पोस्ट्स

मार्च, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

राज्यस्तरीय कलाभूषण पुरस्काराने सन्मानित यशवंत सोनवणे – एक स्वप्नपूर्तीचा सोहळा

इमेज
राज्यस्तरीय कलाभूषण पुरस्काराने सन्मानित यशवंत सोनवणे – एक स्वप्नपूर्तीचा सोहळा कलाविश्व हे प्रतिभेचे मंदिर असते. या मंदिरात ज्यांना स्थान मिळते, त्यांना समाज आदराने आणि अभिमानाने पाहतो. अशाच एका तेजस्वी कलाकाराचा गौरव करण्यासाठी यशवंतराव चव्हाण सेंटर, नरीमन पॉइंट, मुंबई येथे एक अनोखा सोहळा रंगला. हा सोहळा संविधान हक्क परिषद आणि सा. मंत्रालय वार्ता यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात चाळीसगावच्या सुपुत्र यशवंत संजय सोनवणे यांना राज्यस्तरीय कलाभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यशवंत अवघ्या १२वीत शिक्षण घेत आहे. परंतु त्याच्या कलात्मक प्रवासाची सुरुवात पाचवीत असतानाच झाली. लहानपणापासूनच त्याला रंगमंचाची ओढ होती. त्याच्या कल्पनाशक्तीला, मेहनतीला आणि निष्ठेला पाठबळ मिळाले त्याच्या वडिलांकडून. संजय सोनवणे, जे स्वतः खानदेशी चित्रपटसृष्टीतील एक नामांकित दिग्दर्शक आणि कलाकार आहेत. घरातच प्रेरणेचा झरा वाहत असल्यामुळे यशवंतने आपल्या कलेच्या माध्यमातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. या भव्य सोहळ्याला महाराष्ट्रातील अनेक दिग्गज राजकीय नेते, कलाकार आणि म...

शांत अभ्यासू माणूस – ॲड. मोहनजी शुक्ला सर

इमेज
शांत अभ्यासू माणूस – ॲड. मोहनजी शुक्ला सर न्यायाच्या मंदिरात उभे असलेले एक शांत, संयमी आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणजे आदरणीय ॲड. मोहनजी शुक्ला सर. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या विषयी काही लिहिणे, ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. वकिलीच्या क्षेत्रात संघर्ष, तणाव आणि स्पर्धा हे सहज दिसणारे पैलू असले तरी, या सगळ्यात शांतपणे, संयमाने आणि अपार ज्ञानसंपत्तीच्या बळावर मार्गक्रमण करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे मोहनजी शुक्ला सर. त्यांच्याकडे पाहिल्यावर जाणवते की त्यांच्या चेहऱ्यावर कुठला ही दिखावा नाही, शब्दांत कोणती ही आक्रमकता नाही, पण डोळ्यांत मात्र नितळ ज्ञान आणि आत्मविश्वास आहे. त्यांची खरी ताकद त्यांच्या अभ्यासात आणि सखोल विचारसरणीत आहे. वकिली व्यवसायात अनेकदा तणावाचे प्रसंग उद्भवतात, परंतु मोहनजी शुक्ला सर संयम कधीच सोडत नाहीत. कुणाला ही न दुखावता, परंतु ठामपणे न्यायाची बाजू मांडण्याची त्यांची हातोटी विलक्षण आहे. आजच्या तरुण पिढीने जर कोणाचा आदर्श घ्यायचा असेल, तर तो नक्कीच मोहनजी शुक्ला सरांचा घ्यावा. संयम, साधेपणा आणि ज्ञानाचा महासागर ही त्यांची जमेची बाजू. त्यांना पा...

संस्कारांची अमर कथा: स्वर्गीय वाल्मीक गंगाराम सूर्यवंशी

इमेज
संस्कारांची अमर कथा: स्वर्गीय वाल्मीक गंगाराम सूर्यवंशी धरतीवर काही माणसं अशी येतात जी आपले संपूर्ण आयुष्य केवळ स्वतःसाठी नाही, तर आपल्या कुटुंबासाठी, समाजासाठी आणि मातृभूमीसाठी समर्पित करतात. अशीच एक तेजस्वी आणि साधी, पण कर्तृत्ववान व्यक्ती म्हणजे स्वर्गीय वाल्मीक गंगाराम सूर्यवंशी. फागणे गावातील एका सर्वसामान्य कुटुंबात त्यांचा जन्म झाला. वडील हातमजुरी करून घर चालवत, तर आईने ही कष्टाची वाट सोसली होती. गरिबीने घर वेढले असले तरी त्यांची स्वप्नं मोठी होती. "शिक्षणा शिवाय प्रगती नाही," हा विचार त्यांनी लहानपणीच मनाशी घट्ट केला होता. शिक्षणाच्या वाटेवर त्यांनी एकाकी झुंज दिली. परिस्थितीने अनेक अडथळे आणले, पण त्यांच्या जिद्दीपुढे सर्व झुकले. शिक्षण चालू ठेवण्यासाठी त्यांनी कोणते ही काम करण्यास कमीपणा त्यांना वाटला नाही. मजुरीपासून दुकानातील मदतनीस म्हणून, शेतीकामापासून बांधकाम मजुरापर्यंत – जे मिळेल ते काम त्यांनी प्रामाणिकपणे केले. अखेरीस, आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर त्यांनी शिक्षण पूर्ण केले आणि आरोग्य खात्यात नोकरी मिळवली. साधी राहणी, प्रामाणिकपणा आणि निस्वार्थ सेव...

डॉ. नरेंद्रजी पाटील : आमच्या आयुष्याचे शिल्पकार

इमेज
डॉ. नरेंद्रजी पाटील : आमच्या आयुष्याचे शिल्पकार जीवनात काही माणसं अशी असतात, जी केवळ शिक्षक म्हणून नव्हे, तर मार्गदर्शक, आधारस्तंभ आणि प्रेरणास्थान म्हणून कायम स्मरणात राहतात. अशाच एका थोर व्यक्तिमत्त्वाच्या वाढदिवसानिमित्त आम्हाला आमच्या भावना शब्दरूपाने व्यक्त करायच्या आहेत—आमचे लाडके गुरु, डॉ. नरेंद्रजी पाटील सर! बालपणी आम्ही निरागस होतो, मातीच्या गोळ्यासारखे, कुठल्याही आकारात सहज वळणारे. समाजाच्या वाऱ्यांबरोबर वाहून जाण्याची भीती वाटायची. अशा वेळी एका सक्षम हाताने आम्हाला योग्य दिशा दिली, जीवनाची शिदोरी बांधली आणि आत्मविश्वासाचे बळ दिले. त्या हातांचे नाव होते—डॉ. नरेंद्रजी पाटील! आमच्या लहानपणी मनात हजारो प्रश्न, असंख्य शंका आणि जगाबद्दलची अनभिज्ञता होती. या सर्वांचा योग्य निचरा करण्यासाठी त्यांनी बालसंस्कार केंद्र सुरू केले. या केंद्रात आम्ही केवळ ज्ञान मिळवले नाही, तर माणूस म्हणून घडण्याची खरी शाळा शिकली. त्यांनी अक्षरओळख करून देण्याबरोबरच संस्कार, नैतिकता आणि जीवनातील खरे मूल्य यांची जाणीव करून दिली. त्यांच्या शिकवणीत पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडेही खूप काही होतं. त्यांन...

इंद्रजीत दिवाकर महाजन – शून्यातून विश्व निर्माण करणारा एक योद्धा

इमेज
इंद्रजीत दिवाकर महाजन – शून्यातून विश्व निर्माण करणारा एक योद्धा गरिबी ही खऱ्या लढवय्यांची खरी परीक्षा असते. काही जण परिस्थितीसमोर हार मानतात, तर काही आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर परिस्थितीलाच झुकवतात. इंद्रजीत दिवाकर महाजन हे त्याच दुर्दम्य इच्छाशक्तीचे प्रतीक आहेत. त्यांनी आपल्या कठीण जीवनप्रवासात एक क्षणही मागे वळून पाहिले नाही, तर परिस्थितीच्या प्रत्येक आव्हानाला धैर्याने सामोरे जात शून्यातून विश्व निर्माण केले. एरंडोल येथील एका साध्या कुटुंबात जन्मलेल्या इंद्रजीत यांचे बालपण सुखासीन नव्हते. घरची परिस्थिती हलाखीची होती, पण आई-वडिलांची सावली होती. मात्र नियतीला हे मान्य नव्हते. इयत्ता आठवीत असताना त्यांच्या वडिलांचे अचानक निधन झाले आणि त्यांच्या आयुष्याला एक कठीण कलाटणी मिळाली. घरातील कर्ता पुरुष हरवल्याने संपूर्ण जबाबदारी आईवर आली. डोळ्यांत अश्रू असले तरी हात थांबले नाहीत. आईने शिवणकाम करून संसाराचा गाडा पुढे न्यायचा निर्धार केला. पण एका स्त्रीच्या एकट्या हातांनी मुलांचे शिक्षण आणि कुटुंबाचा गाडा किती दिवस चालवणार? तेव्हा अवघ्या तेराव्या वर्षी इंद्रजीत यांनी कोवळ्या खांद...

मी संघर्ष करेन !

मी संघर्ष करेन ! जीवन म्हणजे संघर्षांची अखंड मालिका. प्रत्येकाच्या आयुष्यात संकटं येतात, अपयशाचं सावट पसरतं, स्वप्नं भंग पावतात. कधी कधी सगळं संपल्यासारखं वाटतं, मनाचा हुरूप खचतो, धडपड थांबते. पण अशा क्षणीच खऱ्या लढवय्याची ओळख पटते. तो मनाशी ठरवतो – "मी संघर्ष करेन, धावेन, लढेन, पण यशाला सोडणार नाही!" बालपणापासूनच आयुष्याचा हा धडा शिकायला मिळतो. पहिलं पाऊल टाकताना आपण पडतो, रडतो, पण पुन्हा उभं राहून धावतो. यशाची पहिली झलक तेव्हाच अनुभवतो. आयुष्यभर हेच चक्र चालू राहतं – संघर्ष, अपयश, धडपड आणि अखेरीचं यश! जीवनाच्या प्रवासात अनेक अडथळे येतात. कधी आर्थिक संकटं, कधी नशिबाची साथ सोडते, तर कधी समाजाच्या अपेक्षांचं ओझं जाणवतं. पण या सगळ्यांवर मात करून जो जिद्दीने उभा राहतो, त्याचं यश निश्चित असतं. संघर्षाचं बळ घेऊन जेव्हा आपण पाऊल पुढे टाकतो, तेव्हा आपलं स्वप्नही आपल्याकडे धाव घेऊ लागतं. इतिहासात महान व्यक्तींच्या जीवनातही हा संघर्ष दिसतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफाट संकटांवर मात करून स्वराज्याची स्थापना केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण घेतलं आणि देशासा...