बुद्धीची देणगी पण मनाची निवड प्रामाणिकपणा की धूर्तपणा?....!
बुद्धीची देणगी पण मनाची निवड प्रामाणिकपणा की धूर्तपणा?....! बुद्धी ही देवाने प्रत्येकाच्या हातात ठेवलेली एक दिव्य ज्योत आहे. ती अंधारात ही मार्ग दाखवते, योग्य-अयोग्य याची जाणीव करून देते. पण त्या ज्योतीचा उपयोग प्रकाशासाठी करायचा की इतरांना जाळण्यासाठी हा निर्णय मात्र प्रत्येकाने स्वतः घ्यायचा असतो. इथेच माणसाच्या खऱ्या स्वभावाची परीक्षा सुरू होते. काही लोक बुद्धीचा वापर करून धूर्तपणाचा मार्ग निवडतात. त्यांच्या शब्दांत गोडवा असतो, पण मनात स्वार्थ दडलेला असतो. ते परिस्थितीचा, लोकांचा, विश्वासाचा वापर करून स्वतःसाठी मार्ग काढतात. काही काळासाठी ते यशस्वी दिसतात, लोकांच्या नजरेत वर चढतात. पण त्या यशामागे एक न दिसणारा भार असतो.भीतीचा, अपराधी पणाचा आणि एकटेपणाचा. कारण विश्वास तुटला की माणूस जिंकत नाही, तर हळूहळू हरत जातो. याच्या अगदी उलट, इमानदारीचा मार्ग निवडणारा माणूस शांतपणे, संयमाने आपला प्रवास करत असतो. त्याच्या वाटेत अडचणी येतात, कधी तो मागे पडल्या सारखा वाटतो, पण त्याचा आत्मा कधीच डगमगत नाही. कारण त्याच्याकडे एक अशी ताकद असते जी कुठल्या ही धूर्तपणापेक्षा मोठी असते.स्वतःवरच...