लेकीच्या यशामागे उभा असलेला बाप.....!


लेकीच्या यशामागे उभा असलेला बाप.....!

आजचा दिवस मनात कायमचा कोरला जाणारा, आनंदाने आणि अभिमानाने भरलेला असा आहे. स्नेहा शिवाजी चव्हाण हिने एम.पी.एच. महिला कॉलेज, मालेगाव येथे T.Y.BCOM. मध्ये कॉलेजमध्ये प्रथम येऊन एक अद्वितीय यश संपादन केलं आहे. हा केवळ एक निकाल नाही, तर तिच्या अथक परिश्रमांचा, चिकाटीचा आणि जिद्दीचा उज्ज्वल पुरावा आहे.

विशेष म्हणजे Chartered Accountant (CA) Final सारख्या अत्यंत कठीण आणि जबाबदारीच्या अभ्यासावर पूर्ण लक्ष केंद्रित असतानाही, T.Y.BCOM. मध्ये प्रथम येणं ही अत्यंत कौतुकास्पद आणि प्रेरणादायी गोष्ट आहे. हे यश सांगतं की, जर मनात प्रबळ इच्छाशक्ती आणि मेहनतीची तयारी असेल, तर कोणतंही ध्येय अशक्य नाही.
आज या यशाचा गौरव करताना स्नेहा शिवाजी चव्हाण हिला ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं. पण या क्षणाला आणखी एक विशेष भावनिक स्पर्श लाभला.तिच्या अनुपस्थितीत तिच्या वडिलांचा सन्मान करण्यात आला. तिच्या यशा मागील संस्कार, आधार आणि प्रेरणा जणू त्या सन्मानातून साकार झाली.

तिच्या वतीने मला कॉलेजमध्ये प्राचार्या डॉ. रजनी पाटील मॅडम, डॉ. शिल्पा मॅडम व इतर प्रमुख मान्यवरांच्या हस्ते हा सन्मान स्वीकारण्याचा मान मिळाला. त्या क्षणी तिच्या वडिलांचा सन्मान होताना मन भरून आलं… डोळ्यांत आनंदाश्रू दाटून आले. कारण तो फक्त एका विद्यार्थिनीचा गौरव नव्हता, तर एका बापाच्या कष्टांचा, त्यागाचा आणि मुलीवरील विश्वासाचा सन्मान होता.

त्या क्षणी मनात एकच भावना दाटून आली “मला तुझा अभिमान आहे.” तुझं हे यश म्हणजे केवळ तुझं नाही, तर तुझ्या कुटुंबाचा, तुझ्या वडिलांचा आणि आपल्या सगळ्यांच्या अभिमानाचा विषय आहे. तुझ्या कष्टांची, तुझ्या स्वप्नांची ही सुंदर फळं पाहून मन समाधानाने भरून येतं.

स्नेहा, तुझी ही यशाची वाटचाल अशीच तेजस्वी आणि प्रेरणादायी राहो. तुझ्या प्रत्येक पावलावर यश, समाधान आणि आनंद लाभो. तू तुझ्या स्वप्नांच्या दिशेने अशीच उंच भरारी घेत राहा हीच मनापासून प्रार्थना.

तुला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा… आणि पुन्हा एकदा मनःपूर्वक अभिनंदन! 

© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !