पोस्ट्स

मार्च, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बुद्धीची देणगी पण मनाची निवड प्रामाणिकपणा की धूर्तपणा?....!

इमेज
बुद्धीची देणगी पण मनाची निवड प्रामाणिकपणा की धूर्तपणा?....! बुद्धी ही देवाने प्रत्येकाच्या हातात ठेवलेली एक दिव्य ज्योत आहे. ती अंधारात ही मार्ग दाखवते, योग्य-अयोग्य याची जाणीव करून देते. पण त्या ज्योतीचा उपयोग प्रकाशासाठी करायचा की इतरांना जाळण्यासाठी हा निर्णय मात्र प्रत्येकाने स्वतः घ्यायचा असतो. इथेच माणसाच्या खऱ्या स्वभावाची परीक्षा सुरू होते. काही लोक बुद्धीचा वापर करून धूर्तपणाचा मार्ग निवडतात. त्यांच्या शब्दांत गोडवा असतो, पण मनात स्वार्थ दडलेला असतो. ते परिस्थितीचा, लोकांचा, विश्वासाचा वापर करून स्वतःसाठी मार्ग काढतात. काही काळासाठी ते यशस्वी दिसतात, लोकांच्या नजरेत वर चढतात. पण त्या यशामागे एक न दिसणारा भार असतो.भीतीचा, अपराधी पणाचा आणि एकटेपणाचा. कारण विश्वास तुटला की माणूस जिंकत नाही, तर हळूहळू हरत जातो. याच्या अगदी उलट, इमानदारीचा मार्ग निवडणारा माणूस शांतपणे, संयमाने आपला प्रवास करत असतो. त्याच्या वाटेत अडचणी येतात, कधी तो मागे पडल्या सारखा वाटतो, पण त्याचा आत्मा कधीच डगमगत नाही. कारण त्याच्याकडे एक अशी ताकद असते जी कुठल्या ही धूर्तपणापेक्षा मोठी असते.स्वतःवरच...

आयुष्याची खरी तृप्ती.....!

इमेज
आयुष्याची खरी तृप्ती.....! या जगात प्रत्येक माणूस काही ना काही शोधत असतो कोणी पैसा, कोणी यश, कोणी प्रेम… पण या सगळ्यांच्या मुळाशी एकच गोष्ट असते तृप्ती. आणि ही तृप्ती नेमकी कशात आहे, हे अनेकांना आयुष्यभर कळत नाही. काही जण आयुष्यभर साठवतात. पैसा, संपत्ती, वस्तू… अगदी नातीसुद्धा. पण त्यांचं साठवणं हे देण्यासाठी नसतं, तर स्वतःपुरतं ठेवण्यासाठी असतं. त्यांच्या मनात एक भीती असते. “काही कमी पडू नये.” आणि या भीतीतूनच जन्म घेतो लोभ. लोभ माणसाला हळूहळू आतून रिकामं करत जातो. तो दुसऱ्याचा हक्क पाहत नाही, त्याला फक्त स्वतःचं पोट दिसतं. पण या पोटाची भूक विचित्र असते. जितकं भराल, तितकी वाढत जाते. अशा लोकांच्या घरात भरपूर अन्न असतं, पण जेवताना समाधान नसतं. त्यांच्या आजूबाजूला माणसं असतात, पण नात्यांमध्ये ऊब नसते. कारण त्यांनी घेतलं खूप, पण दिलं काहीच नाही. आणि दुसऱ्या बाजूला असतात काही साधे, निरागस माणसं… ज्यांच्याकडे फारसं काही नसतं, पण “नसतानाही देणं” ही त्यांची सवय असते. त्यांच्या हातात कदाचित एकच भाकरी असते, पण ती दोन तुकड्यांत तोडताना त्यांना आनंद होतो. कारण त्यांना माहीत असतं. वाटल...

प्रगतीच्या सावलीत हरवलेले साधेपण...!

इमेज
प्रगतीच्या सावलीत हरवलेले साधेपण...! आजची वस्तुस्थिती थोडी कडू आहे, पण तीच खरी आहे.पेट्रोल, गॅस आणि इंधनाच्या तुटवडीची जाणीव हळूहळू आपल्या दैनंदिन जीवनात येऊ लागली आहे. पण ही फक्त सुरुवात असू शकते.  लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे, तर संसाधने हळूहळू कमी होत आहेत. उद्या कदाचित पुन्हा ते दिवस येतील जिथे रस्त्यावरच्या गाड्या थांबतील, सायकली चालतील, गॅस संपेल आणि चूल पुन्हा पेटवावी लागेल. सोयी कमी होतील, जीवनाचे मूलभूत गरजांचे मूल्य समजेल आणि आपण प्रत्यक्षात अनुभूती घेऊ की माणूस किती नाजूक परिस्थितीत राहतो. आज आपण वेग, सोय आणि आरामाच्या मागे धावत आहोत. तंत्रज्ञानाने जीवन सुलभ केले आहे, पण त्याच वेळी आपल्याला निसर्गाशी असलेली जाणीव विसरायला लावले आहे. पूर्वी लोकांना गरज होती म्हणून त्यांचे जीवन साधं होतं, परंतु त्या साधेपणात समाधान, जिव्हाळा आणि संतुलन होते. उद्या परिस्थितीने आपल्याला तेच स्वीकारावे लागेल. ही भीती नाही; ही जाणीव आहे. प्रगतीला जबाबदारी जोडलं नाही, तर परत मागे जाणं अपरिहार्य आहे. आपल्या हालचालींवर मर्यादा आणण्याची वेळ आली आहे. आपल्या गरजा आणि लालसा यांच्या...

लेकीच्या यशामागे उभा असलेला बाप.....!

इमेज
लेकीच्या यशामागे उभा असलेला बाप.....! आजचा दिवस मनात कायमचा कोरला जाणारा, आनंदाने आणि अभिमानाने भरलेला असा आहे. स्नेहा शिवाजी चव्हाण हिने एम.पी.एच. महिला कॉलेज, मालेगाव येथे T.Y.BCOM. मध्ये कॉलेजमध्ये प्रथम येऊन एक अद्वितीय यश संपादन केलं आहे. हा केवळ एक निकाल नाही, तर तिच्या अथक परिश्रमांचा, चिकाटीचा आणि जिद्दीचा उज्ज्वल पुरावा आहे. विशेष म्हणजे Chartered Accountant (CA) Final सारख्या अत्यंत कठीण आणि जबाबदारीच्या अभ्यासावर पूर्ण लक्ष केंद्रित असतानाही, T.Y.BCOM. मध्ये प्रथम येणं ही अत्यंत कौतुकास्पद आणि प्रेरणादायी गोष्ट आहे. हे यश सांगतं की, जर मनात प्रबळ इच्छाशक्ती आणि मेहनतीची तयारी असेल, तर कोणतंही ध्येय अशक्य नाही. आज या यशाचा गौरव करताना स्नेहा शिवाजी चव्हाण हिला ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं. पण या क्षणाला आणखी एक विशेष भावनिक स्पर्श लाभला.तिच्या अनुपस्थितीत तिच्या वडिलांचा सन्मान करण्यात आला. तिच्या यशा मागील संस्कार, आधार आणि प्रेरणा जणू त्या सन्मानातून साकार झाली. तिच्या वतीने मला कॉलेजमध्ये प्राचार्या डॉ. रजनी पाटील मॅडम, डॉ. शिल्पा...

मातीशी लढणारा बाप....!

इमेज
मातीशी लढणारा बाप....! “काय सांगावं गड्या…” या एका वाक्यातच एका शेतकऱ्याचं संपूर्ण आयुष्य दडलंय.मातीशी नातं जोडून जगणारा हा माणूस, स्वतःच्या घामानं जमीन ओली करतो… पण नशिब मात्र कोरडंच राहतं. रात्रंदिवस मातीत राबणं त्याच्यासाठी काही नवीन नाही. उन्हाची तडाखा असो, पावसाचा मारा असो किंवा थंडीची झळ तो कायम शेतातच उभा असतो.पण एवढं सगळं करून ही जेव्हा हातात काहीच राहत नाही, तेव्हा त्याच्या मनात एक वेदना उसळते.“नशिबाला पाझर फुटला नाय…”नशिबाची ही फाटलेली झोळी शिवता शिवता खरंच त्याचं आयुष्य निघून जातं. जग त्याला “जगाचा बाप” म्हणतं कारण तोच तर आपल्या प्रत्येकाच्या ताटात अन्न वाढतो.पण त्या बापाचं दुःख कुणाला दिसतं का?जेव्हा त्याचं स्वतःचं लेकरू फाटकी चप्पल घालून शाळेला जातं… आणि त्या चप्पलमुळे त्याच्या डोळ्यात पाणी येतं, तेव्हा त्या बापाचं हृदय अक्षरशः तुटतं.त्या क्षणी तो शेतकरी नसतो, तो फक्त एक असहाय बाप असतो… ज्याला स्वतःच्या लेकरासाठी छोटंसं सुख ही देता येत नाही. शेतकऱ्याची जात म्हणजे संघर्षाची ओळख.रडणं त्याला जमत नाही.कारण त्यानं आयुष्यभर फक्त लढणंच शिकलंय.कधी दुष्काळ, कधी पावसाचं...

चुकीला चूक म्हणायची हिम्मत ठेवा...!

इमेज
चुकीला चूक म्हणायची हिम्मत ठेवा...! जीवन म्हणजे अनुभवांचा प्रवास, आणि प्रत्येक अनुभव आपल्याला घडवतो, आकार देतो. आपण कितीही अनुभवी का असू, चूक करणे हे मानवी निसर्गाचे एक अविभाज्य अंग आहे. तरीही, आपल्यातील बहुतांश लोक स्वतःला किंवा इतरांना दोष देत राहतात. “ही चूक झालीय,” “हे चुकीचं आहे,” असे म्हणत. पण खरी माणुसकी म्हणजे चुकीला चूक म्हणण्याची हिम्मत ठेवणे. कारण प्रत्येक चूक ही केवळ अपयश नाही; ती एक शिक्षक आहे, एक मार्गदर्शक आहे, आणि कधी कधी जीवनात पुढे जाण्याची एक नवी संधी आहे. प्रत्येक अपयशाच्या क्षणात स्वतःला सांगायला हवे  “हो, मी चुकीला चूक केली, पण मी शिकलोय.” ही हिम्मत ठेवणे सोपे नाही. भीती, आत्मविश्वासाची कमतरता, “लोक काय म्हणतील?” किंवा “माझी प्रतिष्ठा कमी होईल?” अशा विचारांनी मनाला जाळ्यात पाडले जाते. पण विचार करा.किती सुंदर क्षण आपण चुकांमुळे शिकतो, कसे स्वतःला सुधारतो आणि आयुष्याला नवीन अर्थ देतो! जेव्हा आपण चुकीला चुकीचं म्हणण्याची धाडस दाखवतो, तेव्हा आपण स्वतःला मुक्त करतो, आपले अंतरंग प्रगल्भ करतो आणि इतरांनाही शिकण्याची संधी देतो. चुकीचा स्वीकार केवळ स्वतःसाठ...

जेव्हा घराचे सूत्र परक्यांच्या हातात जातात...!

इमेज
जेव्हा घराचे सूत्र परक्यांच्या हातात जातात...! घर… हा शब्द उच्चारताच मनात एक उबदारपणा दाटून येतो. आईच्या मायेचा स्पर्श, वडिलांच्या छायेसारखा आधार, भावंडांच्या खट्याळ हसण्याचा गोंगाट हे सगळं मिळूनच घर तयार होतं. घर म्हणजे फक्त विटा आणि सिमेंट नव्हे, तर ते असतं जिव्हाळ्याच्या नात्यांचं, विश्वासाचं आणि प्रेमाचं एक जिवंत जग. पण कधी कधी आयुष्याच्या वळणावर अशी वेळ येते, की घराचे सूत्र हळूहळू आपल्या हातातून निसटून परक्यांच्या हातात जाऊ लागतात… आणि तेव्हा घर तसंच राहून ही काहीतरी हरवल्यासारखं वाटू लागतं. पूर्वी घरात घेतले जाणारे निर्णय आपल्या माणसांच्या सल्ल्याने, त्यांच्या भावनांचा विचार करून घेतले जायचे. प्रत्येक गोष्टीत आपुलकी होती, एकमेकांची काळजी होती. पण जेव्हा परके लोक घराच्या निर्णयांमध्ये येऊ लागतात, तेव्हा त्या निर्णयांमध्ये व्यवहार असतो, पण भावना नसतात. घरात आपलीच माणसं असूनही आपण एकटे वाटू लागतो. आपल्या मताला किंमत राहत नाही, आपली उपस्थिती जणू गौण ठरते. हळूहळू घरातील आपलेपण विरघळत जाते आणि त्या जागी एक अनोळखी शांतता पसरते. परके लोक घर व्यवस्थित सांभाळतील ही कदाचित नियम,...

मनातील प्रश्न आणि नात्यांची खरी समज...!

इमेज
मनातील प्रश्न आणि नात्यांची खरी समज...! कधी कधी आयुष्यात एखादा छोटासा प्रसंग घडून जातो… एखादं वाक्य आपण बोलून जातो… आणि त्या क्षणानंतर आपलं मन मात्र शांत बसत नाही. मनात सतत एकच प्रश्न घुमत राहतो.“मी काही चुकीचं बोललो का?” “माझ्या शब्दांनी समोरच्याला दुखावलं तर नाही ना?” आपण त्या क्षणाकडे पुन्हा पुन्हा पाहू लागतो. आपल्या प्रत्येक शब्दाचा, प्रत्येक हावभावाचा, आपल्या आवाजाच्या सुराचाही विचार करत राहतो. कधी कधी तर इतका विचार करतो की नकळत स्वतःलाच दोष देऊ लागतो. खरं पाहिलं तर अनेक वेळा समोरच्या व्यक्तीच्या मनात तसं काहीच नसतं. कदाचित ती व्यक्ती त्या प्रसंगाला विसरूनही गेलेली असते. पण आपण मात्र मनातल्या मनात त्या छोट्या गोष्टीचं मोठं ओझं बनवून बसतो. आपल्या मनातच अनेक अंदाज बांधतो आणि त्या अंदाजांच्या जाळ्यात स्वतःलाच अडकवून घेतो. पण या सगळ्या विचारांच्या मागे एक खूप सुंदर सत्य दडलेलं असतं. ज्याच्या मनात असा विचार येतो, ज्याला दुसऱ्याच्या भावनांची इतकी जाणीव असते, ते मन मुळात खूप कोमल आणि संवेदनशील असतं. दुसऱ्याच्या वेदनेची कल्पना ज्या मनाला होते, ते मन कधीही जाणूनबुजून कोणाचं वाई...

अंधश्रद्धेच्या सावटाखाली हरवलेला विवेक....!

इमेज
अंधश्रद्धेच्या सावटाखाली हरवलेला विवेक....! आजच्या धावपळीच्या, स्पर्धेच्या आणि अनिश्चिततेने भरलेल्या जगात माणूस बाहेरून जितका प्रगत दिसतो, तितकाच तो आतून अस्थिर होत चालला आहे. यश, पैसा, प्रतिष्ठा सगळं काही पटकन हवं आहे. थांबायचं नाही, वाट पाहायची नाही, संघर्ष करायचा नाही… पण यश मात्र निश्चित हवं. आणि या अधीरतेतूनच जन्म घेतो एक धोकादायक मार्ग अंधश्रद्धेचा. जेव्हा आयुष्य आपल्या मनासारखं घडत नाही, तेव्हा माणूस कारणं शोधू लागतो. "माझ्या बरोबरच असं का?" या प्रश्नाचं उत्तर शोधताना तो स्वतःकडे पाहण्या ऐवजी बाहेर उपाय शोधतो. आणि तिथेच त्याची भेट होते भोंदूगिरीशी. सुरुवातीला सगळं खूप साधं वाटतं गोड बोलणं, विश्वास देणं, "सगळं ठीक होईल" असं सांगणं. पण हळूहळू या गोड बोलण्यात भीती मिसळते. "तुमच्यावर संकट आहे", "कोणी तरी वाईट केलं आहे", "उशीर झाला तर सगळं हातातून जाईल"अशा वाक्यांनी माणसाच्या मनावर भीतीचं सावट पसरवलं जातं. भीती ही माणसाची सर्वात मोठी कमकुवत बाजू आहे. आणि जेव्हा भीती मनावर राज्य करू लागते, तेव्हा विवेक मागे पडतो. अशा वेळी म...

शॉर्टकटचं यश आणि कष्टाचा वाडा...!

इमेज
शॉर्टकटचं यश आणि कष्टाचा वाडा...! माणसाच्या आयुष्यात “यश” हा शब्द जसा गोड आहे तसाच तो मोहकही आहे. प्रत्येकाला आयुष्यात काहीतरी मोठं करायचं असतं, काहीतरी मिळवायचं असतं. त्या यशाची चमक, त्यातून मिळणारा सन्मान आणि समाधान याचं आकर्षण प्रत्येकाच्या मनाला भुरळ घालतं. पण त्या यशापर्यंत पोहोचण्यासाठी आयुष्य आपल्यासमोर दोन वाटा उभ्या करते.एक शॉर्टकटची आणि दुसरी कष्टांची. पहिली वाट सहज, चमकदार आणि आकर्षक दिसते; तर दुसरी वाट खडतर, संयमाची आणि संघर्षाने भरलेली असते. शॉर्टकटने मिळालेलं यश हे जणू भाड्याच्या घरासारखं असतं. सुरुवातीला ते खूप सुंदर वाटतं. लगेच मिळालेलं यश मनाला आनंद देतं, अभिमानही वाटतो. त्या घरात राहायला गेल्यावर काही काळ आपण सुखावतो, आनंद घेतो. पण मनाच्या कुठेतरी एक जाणीव कायम असते.हे घर आपलं नाही. कधी ना कधी ते सोडावंच लागणार आहे. त्याचप्रमाणे शॉर्टकटने मिळालेलं यशही तात्पुरतंच असतं. त्यामध्ये कष्टांची उब नसते, अनुभवाची शिदोरी नसते आणि संघर्षाची पायाभरणीही नसते. त्यामुळे वेळ आली की ते यश हळूहळू हातातून निसटून जातं. आजच्या वेगवान जगात अनेकांना पटकन यश मिळवायचं असतं. कमी व...

“स्वतंत्र विचार मांडणं खरंच वाईट आहे का…?”

इमेज
“स्वतंत्र विचार मांडणं खरंच वाईट आहे का…?” कधी कधी मनात एक वेदनादायक प्रश्न उमटतो.आपण खरं बोलतो, मनातलं मांडतो, तरीही आपणच का एकटे पडतो? आणि जे लोक फक्त “हो ला हो” लावतात, सर्वांना खूश ठेवतात, त्यांच्या भोवतीच का गर्दी जमते? समाजाचं एक विचित्र वास्तव आहे.इथे सत्यापेक्षा सोय अधिक महत्त्वाची असते. जे लोक इतरांच्या मतांना विरोध करत नाहीत, ते सहजपणे सगळ्यांचे होतात. त्यांच्या भोवती मैत्री, सहवास, एकोप्याचा आभास निर्माण होतो. पण तो खरा एकोपाच असतो का? की तो फक्त तात्पुरता, स्वार्थावर उभा असलेला एक मुखवटा असतो? स्वतंत्र विचार मांडणारी व्यक्ती वेगळी असते. ती विचार करते, प्रश्न विचारते, आणि गरज पडली तर “नाही” म्हणायची हिंमत ठेवते. पण हाच तिचा प्रामाणिकपणा अनेकांना खटकतो. कारण सत्य आरशासारखं असतं.ते प्रत्येकाला स्वतःचं खरं रूप दाखवतं, आणि ते सगळ्यांना सहन होत नाही. म्हणूनच अशा व्यक्तींना अनेकदा गैरसमजलं जातं. त्यांना हट्टी, अहंकारी किंवा बंडखोर ठरवलं जातं. आणि हळूहळू ते एकटे पडतात. पण हे एकटेपण खरंच कमकुवतपणाचं चिन्ह आहे का? नाही… हे एकटेपण म्हणजे स्वतःशी प्रामाणिक राहण्याची किंमत आ...

शिगेला पोहोचलेला अहंकार...!

इमेज
शिगेला पोहोचलेला अहंकार...! आपल्या आयुष्यातले छोटेसे यश, कुणीतरी केलेले कौतुक किंवा आपल्या मेहनतीची थोडीशी तारीफ, हृदयात आनंदाची लाट निर्माण करतात. त्या क्षणांचा आनंद हलका, उत्साही आणि मधुर वाटतो; पण जर आपण हळूहळू या “स्वतःच्या प्रशंसेच्या सवयी”मध्ये अडकलो, तर तो आनंद शिगेला पोहोचलेल्या अहंकारात रूपांतरित होतो. शिगेला पोहोचलेला अहंकार म्हणजे स्वतःच्या प्रशंसेत इतका गुंग होणे की, इतरांचे हित, मार्गदर्शन, सूचना किंवा प्रेमाचे संकेतही मनाला रुचत नाहीत. कोणी आपल्याला योग्य मार्ग दाखवला तरी मन म्हणते: “मला काही शिकवायची गरज नाही,” “माझा दृष्टिकोन सर्वोत्तम आहे.” अशा मनाने फक्त स्वतःच्या प्रशंसेत अडकून सहृदयतेचे, नम्रतेचे आणि समजूतदारपणाचे दरवाजे बंद केले जातात.शिगेला पोहोचलेला अहंकार नात्यांमध्ये अंतर निर्माण करतो, प्रेमाची गोडी कमी करतो, आणि आयुष्याच्या सुंदर क्षणांची अनुभूती दुर्लक्षित राहते. पण लक्षात ठेवा, हा अहंकार फक्त दोष नाही; तो भीतीचे कवच आहे. भीती की, “जर मी कमी दिसलो तर?” “माझ्या प्रयत्नांचे मूल्य कमी ठरले तर?” “माझ्या चुका उघड झाल्या तर?” ही भीती हृदयाला स्वतःचं कवच...

दि.२१ मार्च २०२६ ला असलेल्या जागतिक कविता दिना निमित्त लेख

इमेज
दि.२१ मार्च २०२६ ला असलेल्या जागतिक कविता दिना निमित्त लेख    २१ मार्च जागतिक कविता दिन          दरवर्षी २१ मार्च हा दिवस जगभरात 'जागतिक कविता दिन' म्हणून साजरा केला जातो .युनेस्कोने (UNESCO) १९९९ मध्ये पॅरिस येथे झालेल्या ३० व्या परिषदेत हा दिवस साजरा करण्याचे घोषित केले.मानवी मनातील भावनांना वाट करून देण्याचे कविता हे एक प्रभावी माध्यम आहे. भाषिक वैविध्य जपण्यासाठी आणि लुप्त होत चाललेल्या भाषांना कवितेद्वारे जिवंत ठेवण्यासाठी हा दिवस साजरा होतो.कवितेच्या माध्यमातून मानवी मूल्यांचा प्रसार करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे.जागतिक कविता दिन कवींच्या कल्पनाशक्तीचा आणि त्यांच्या सर्जनशीलतेचा सन्मान करतो. या दिवशी शाळा, महाविद्यालये आणि साहित्य संस्थांमध्ये कविता वाचनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात.कविता ही केवळ शब्दरचना नसून ती संस्कृती आणि इतिहासाचा आरसा असते.हा दिवस कवींना प्रोत्साहन देण्यासाठी आणि तरुण पिढीला साहित्याकडे वळवण्यासाठी महत्त्वाचा आहे. मौखिक परंपरेतील कवितांचे जतन करणे ही काळाची गरज असून हा दिवस त्याचे स्मरण करून देतो.कविता ...

जनतेचा नेता सेवा आणि समर्पणाची गाथा....!

इमेज
जनतेचा नेता सेवा आणि समर्पणाची गाथा....! सहकार महर्षी, कार्यसम्राट, मा. आमदार आदरणीय आबासाहेब श्री चिमणरावजी पाटील यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त करताना मन भावनांनी भरून येते. काही व्यक्तिमत्त्वे ही केवळ पदांमुळे मोठी नसतात, तर त्यांच्या कार्याने, विचारांनी आणि लोकांप्रती असलेल्या निस्सीम प्रेमामुळे ती जनमानसात अढळ स्थान निर्माण करतात.आबासाहेब हे त्यापैकीच एक तेजस्वी नाव. आबासाहेबांचे आयुष्य म्हणजे संघर्ष, जिद्द आणि सेवाभाव यांचे सुंदर उदाहरण आहे. ग्रामीण भागातील सामान्य माणसाच्या अडचणी त्यांनी केवळ ऐकल्या नाहीत, तर त्या स्वतःच्या समजून सोडवण्याचा ध्यास घेतला. सहकार क्षेत्रात त्यांनी उभारलेली भक्कम पायाभरणी ही केवळ संस्थांची निर्मिती नसून, हजारो कुटुंबांच्या जीवनाला स्थैर्य देणारी शक्ती आहे. त्यांच्या दूरदृष्टीमुळे अनेकांना रोजगार, शेतकऱ्यांना आधार आणि युवकांना नवी दिशा मिळाली. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात एक विलक्षण साधेपणा आणि आपलेपणा आहे. मोठ्या पदावर असून ही त्यांनी कधीही माणुसकीचा हात सोडला नाही. प्रत्येकाशी हसतमुखाने संवाद साधणारे, संकटात धीर देणारे आणि यशा...

मुखवट्यांच्या दुनियेत ‘मी’ शोधताना....!

इमेज
मुखवट्यांच्या दुनियेत ‘मी’ शोधताना....! “नाव आणि ओळख छोटी असली तरी चालेल, पण ती स्वतःची असायला हवी” हा विचार फक्त एक वाक्य नाही, तर आयुष्य जगण्याची दिशा आहे. या एका ओळीत माणसाच्या अस्तित्वाचं सार दडलं आहे. कारण शेवटी माणूस किती मोठा झाला हे महत्त्वाचं नसतं, तर तो किती “स्वतःसारखा” जगला हेच त्याच्या आयुष्याची खरी किंमत ठरवतं. आजच्या या वेगवान जगात प्रत्येकजण काहीतरी बनण्याच्या धावपळीत आहे. कुणाला प्रसिद्ध व्हायचं आहे, कुणाला श्रीमंत, कुणाला लोकांच्या नजरेत मोठं दिसायचं आहे. पण या सगळ्या धावपळीत आपण एक महत्त्वाची गोष्ट विसरतो.“आपण कोण आहोत?” आपण इतरांसारखं होण्याच्या प्रयत्नात इतके हरवतो की, आपल्या आतलं खरं “मी” कुठेतरी हरवून जातं. कधी कधी आपण स्वतःला विचारायलाच घाबरतो. “हे जे मी करतोय, ते खरंच मला हवं आहे का?”कारण त्या प्रश्नाचं उत्तर कदाचित आपल्या सगळ्या बनावट यशाला हादरवणारं असू शकतं. प्रत्येक माणूस वेगळा असतो. कुणाकडे सुंदर शब्दांची ताकद असते, कुणाकडे शांततेत समजून घेण्याची क्षमता असते, कुणाचं हसूच इतरांच्या दुःखाला औषध ठरतं. हीच त्याची खरी ओळख असते. पण समाजाच्या अपेक्षा,...

शब्दांविना मिळणारा आधार....!

इमेज
शब्दांविना मिळणारा आधार....!  कधी कधी आयुष्यात असे क्षण येतात, जेव्हा शब्दांची गरजच उरत नाही. मन खूप थकलेलं असतं, भावनांचा पूर आत उसळत असतो, आणि अशा वेळी एखादी व्यक्ती शांतपणे येते… तुमच्या जवळ बसते… आणि नकळत तुमच्या खांद्यावर डोकं टेकवते. त्या क्षणी ती काही बोलत नाही, पण तिच्या त्या एका कृतीत विश्वास, आपलेपणा आणि सुरक्षिततेची भावना भरलेली असते. खरं सांगायचं तर, यापेक्षा मोठं प्रमाणपत्र माणसाच्या चांगुलपणाचं दुसरं कोणतं असू शकतं? या जगात अनेक लोक भेटतात काही ओळखीचे, काही जवळचे, काही फक्त नावापुरते. पण काही माणसं अशी असतात ज्यांच्याजवळ गेलं की मनाला शांतता मिळते. त्यांच्या बोलण्यात, त्यांच्या वागण्यात आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वात एक वेगळाच सुगंध असतो.माणुसकीचा, समजुतीचा आणि निरपेक्ष आपलेपणाचा. अशी माणसं स्वतःचं चांगुलपण कधीच मिरवत नाहीत. ते मोठमोठ्या गोष्टी करत नाहीत, मोठे दावे करत नाहीत. पण त्यांच्या साध्या उपस्थितीतही लोकांना आधार मिळतो. कारण ते ऐकून घेतात, समजून घेतात आणि कोणताही स्वार्थ न ठेवता दुसऱ्याच्या वेदनेला थोडीशी जागा देतात. जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्याकडे भ...

अशी कमवा ओळख की नाव आपोआप मोठं होईल.....!

इमेज
अशी कमवा ओळख की नाव आपोआप मोठं होईल.....! माणूस जन्माला येतो तेव्हा त्याला दोन गोष्टी सहज मिळतात.रूप आणि नाव. रूप हे निसर्गाची देणगी असते, तर नाव आई-वडिलांनी प्रेमाने दिलेली ओळख असते. परंतु या दोन्ही गोष्टी माणसाला जन्मतः मिळालेल्या असल्या, तरी त्या त्याची खरी ओळख बनत नाहीत. माणसाची खरी ओळख घडते ती त्याच्या कष्टातून, त्याच्या स्वभावातून आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे त्याने आयुष्यात केलेल्या कर्मातून. रूप हे क्षणभंगुर असतं. काळाच्या प्रवाहात ते बदलत जातं. आज सुंदर वाटणारा चेहरा उद्या सुरकुत्यांनी झाकला जाऊ शकतो. शरीराची ताकदही काळाबरोबर कमी होत जाते. पण माणसाने केलेली चांगली कर्मं मात्र काळाच्या ओघात कधीच नष्ट होत नाहीत. ती लोकांच्या मनात, आठवणींमध्ये आणि इतिहासात कायमची कोरली जातात. म्हणूनच म्हणतात रूपाने नाही, तर कर्माने सुंदर व्हावं. खऱ्या अर्थाने मोठा तोच ठरतो, ज्याची ओळख त्याच्या कामातून निर्माण होते. अशा लोकांना स्वतःची स्तुती करण्याची गरज पडत नाही. कारण त्यांच्या कार्याची साक्ष समाज स्वतः देत असतो. जेव्हा एखाद्या व्यक्तीचं काम बोलू लागतं, तेव्हा त्याला स्वतःची ओळख करू...

तलाठी आणि नागरिक फोनमधील गैरसमज....!

इमेज
तलाठी आणि नागरिक फोनमधील गैरसमज....! तलाठी हा गावाच्या प्रशासनाचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ मानला जातो. सामान्य नागरिकांच्या अडचणी, शंका आणि कागदपत्रांशी संबंधित प्रश्न सोडवण्यासाठीच त्यांची नेमणूक झालेली असते. मात्र, अनेकदा असे दिसून येते की एखाद्या नागरिकाने आपल्या शंकांचे निरसन करण्यासाठी तलाठी साहेबांना फोन लावला, तर त्यावरून गैरसमज निर्माण होतात आणि काही वेळा तलाठी महाशय नाराज ही होतात. या मागील कारणांचा विचार केला तर एक वेगळाच भावनिक पैलू समोर येतो. गावातील शेतकरी, कष्टकरी किंवा सामान्य माणूस आपल्या कामाच्या व्यापातून वेळ काढून जेव्हा तलाठी साहेबांना फोन करतो, तेव्हा त्याच्या मनात फक्त एकच अपेक्षा असते.आपल्या प्रश्नाचे समाधान मिळावे. त्याला शासनाच्या नियमांची, प्रक्रियेची फारशी माहिती नसते. त्यामुळे तो थेट संबंधित अधिकाऱ्याशी संपर्क साधतो. परंतु दुसऱ्या बाजूला, तलाठी साहेबांवर ही कामाचा प्रचंड ताण असतो. एकाच वेळी अनेक गावे, नोंदी, अहवाल, आणि शासनाच्या विविध योजना यांचा भार त्यांच्या खांद्यावर असतो. अशा परिस्थितीत सतत येणारे फोन, वारंवार विचारले जाणारे तेच प्रश्न, किंवा ...

“प्रतिष्ठित” व्यक्तीपेक्षा “चारित्र्यसंपन्न” व्यक्ती नेहमीच श्रेष्ठ ठरते....! खान्देश माझा

इमेज
“प्रतिष्ठित” व्यक्तीपेक्षा “चारित्र्यसंपन्न” व्यक्ती नेहमीच श्रेष्ठ ठरते....! मानवी जीवनात “प्रतिष्ठा” आणि “चारित्र्य” या दोन संकल्पना नेहमीच चर्चेत असतात. समाजात अनेकदा एखाद्या व्यक्तीकडे संपत्ती, सत्ता, पद किंवा प्रसिद्धी असेल, तर त्याला प्रतिष्ठित मानले जाते. लोक त्याला सन्मान देतात, त्याचे कौतुक करतात आणि त्याच्या भोवती एक वेगळे वलय निर्माण होते. पण या बाह्य प्रतिष्ठेच्या मागे त्या व्यक्तीचे खरे व्यक्तिमत्त्व किती स्वच्छ, प्रामाणिक आणि नितळ आहे, याचा विचार मात्र फार थोडे लोक करतात. म्हणूनच माणसाची खरी उंची त्याच्या प्रतिष्ठेने नव्हे, तर त्याच्या चारित्र्याने मोजली जाते. चारित्र्य ही माणसाची खरी ओळख असते. ते कोणत्या ही पदावर, पैशावर किंवा प्रसिद्धीवर अवलंबून नसते. चारित्र्य म्हणजे प्रामाणिकपणा, सत्यनिष्ठा, नम्रता आणि माणुसकी यांचे सुंदर मिश्रण. ही मूल्ये माणसाला घरातील संस्कारांमधून, आई-वडिलांच्या शिकवणीतून आणि आयुष्यातील अनुभवातून मिळतात. त्यामुळे चारित्र्य ही अशी संपत्ती आहे जी कुणाकडून मागून मिळत नाही आणि पैशाने विकतही घेता येत नाही. ती माणसाच्या अंतःकरणातून उमललेली अ...

प्रामाणिक मनाची निडर वाटचाल....!

इमेज
प्रामाणिक मनाची निडर वाटचाल....! माणसाच्या आयुष्यात सर्वात मौल्यवान गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे त्याचे मन. मन जर स्वच्छ, निर्मळ आणि प्रामाणिक असेल, तर माणूस जगात कुठेही उभा राहू शकतो. त्याला कोणाची भीती वाटत नाही, कारण त्याच्या अंतःकरणात कोणताही खोटेपणा किंवा अपराधाची सावली नसते. आजची दुनिया फार विचित्र आहे. इथे लोकांना सत्यापेक्षा अफवा जास्त आवडतात, आणि चांगुलपणापेक्षा दोष काढण्यातच जास्त आनंद मिळतो. कधी कधी तर परिस्थिती अशी होते की लोक देवालाही दोष देतात. आयुष्यात एखादी अडचण आली, स्वप्न अपूर्ण राहिले किंवा काहीतरी आपल्या मनासारखे झाले नाही, की लगेच लोक म्हणतात “देवाने असे का केले?” जणू प्रत्येक वेदनेचे उत्तर देवाकडेच आहे. पण खरे पाहिले तर देवावर दोष ठेवणारी ही दुनिया माणसाच्या मनातील अस्वस्थतेचे प्रतिबिंब आहे. जेव्हा माणूस स्वतःच्या चुका स्वीकारत नाही, तेव्हा तो दोष दुसऱ्यावर टाकण्याचा प्रयत्न करतो.कधी परिस्थितीवर, कधी नशिबावर आणि कधी देवावर. म्हणूनच जीवनात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या मनाची शुद्धता जपणे. जर आपले विचार स्वच्छ असतील, हेतू चांगले असतील आणि आपण कु...

खोट्या गप्पांमागील सावली आणि सत्याचा प्रकाश...!

इमेज
खोट्या गप्पांमागील सावली आणि सत्याचा प्रकाश...! जीवनात काही वेळा असे प्रसंग येतात जिथे काही लोक स्वतःला योग्य दाखवण्यासाठी दुसऱ्यांबद्दल खोट्या गोष्टी पसरवतात. अफवा पेरतात, गैरसमज निर्माण करतात, आणि समोरच्या व्यक्तीची प्रतिमा धुसर करण्याचा प्रयत्न करतात. त्यांना वाटते की हे करून ते स्वतःला वर उभे करू शकतात. पण ते विसरतात एक अत्यंत साधी पण शक्तिशाली गोष्ट सत्याचा प्रकाश नेहमी येतो. खोटं कितीही काळ लपवण्याचा प्रयत्न केला तरी ते टिकत नाही. विश्वास हे खोट्या गोष्टींवर टिकत नाही, आणि मनाच्या खोलवर बसलेले प्रेम व निष्ठा खोट्या अफवांपेक्षा जास्त मजबूत असतात. जेव्हा सत्य उजेडात येतं, तेव्हा खोट्या गोष्टींचा आधार घेतलेली नाती हळूहळू ढासळू लागतात. ज्या नात्यांची पायाभरणी खोटेपणावर आहे, ती नाती वरून कितीही मजबूत दिसली तरी आतून हळूहळू कमकुवत होत जातात. खोट्या शब्दांचा घाला, गुप्त गैरसमज, आणि ढोंगी छटा हळूहळू नात्यांच्या मुळे ज्या ठिकाणी जीवनरस ओतला जातो, तिथून शोषून घेतात. काळाच्या पडद्याआड दिसलेले हे खोटे नाती वेळोवेळी उघड होतात; आणि ज्या नात्यांनी खरी मर्मळीक न दाखवता फक्त बाह्य छटा ...

फक्त तेच लोक वाईट बोलतात….!

इमेज
फक्त तेच लोक वाईट बोलतात….! जीवन हा एक अनोखा प्रवास आहे. त्या प्रवासात आपल्याला अनेक लोक भेटतात.काही आपल्याला हसवतात, काही आपल्याला प्रेरणा देतात, तर काही आपल्यावर टीका करतात. पण लक्षात ठेवा, फक्त तेच लोक आपल्याविषयी वाईट बोलतात, ज्यांची आपल्यासमोर बोलायची ‘लायकी’ नसते. जे लोक आपल्यावर टीका करतात, त्यांचे शब्द फक्त त्यांच्या स्वतःच्या अपयश, असमर्थता किंवा भीतीतून येतात. त्यांच्याकडे धैर्य, आत्मविश्वास किंवा प्रयत्नांची ताकद नसते; त्यामुळे ते आपल्याला खाली खेचण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या वाईट शब्दांमागे हताशा, तिरस्कार आणि आपल्या यशाची भीती दडलेली असते. पण लक्षात ठेवा. त्यांचे वाईट बोलणे आपल्याला कमी करीत नाही; ते फक्त त्यांची मर्यादा दाखवते. जगात खरे यशस्वी लोक तेच असतात जे शब्दांवर थांबत नाहीत, तर कृतीतून आपली उंची दाखवतात. विरोधकांचे शब्द फक्त निरीक्षण असतात; त्यांना आपल्या प्रयत्नांवर, धैर्यावर आणि मेहनतीवर परिणाम करता येत नाही. आपले यश, आपली उंची आणि आपली किंमत फक्त आपल्या प्रयत्नांची आणि आत्मविश्वासाची फळे आहेत. हृदयात एक गोष्ट ठेवा. ज्यांना आपल्यावर बोलायची लायकी न...

शास्त्री फार्मसीतील ‘युफोरिया 2K26’ आठवणी, स्वप्ने आणि भावनांचा अविस्मरणीय सोहळा....!

इमेज
शास्त्री फार्मसीतील ‘युफोरिया 2K26’ आठवणी, स्वप्ने आणि भावनांचा अविस्मरणीय सोहळा....! एरंडोल येथील शास्त्री फार्मसी महाविद्यालयाच्या प्रांगणात १४ मार्चचा दिवस काहीसा वेगळाच उजाडला होता. वातावरणात एक अनोखी उत्सुकता होती, चेहऱ्यांवर आनंदाची झळाळी होती आणि मनात असंख्य आठवणींची चाहूल लागली होती. कारण त्या दिवशी महाविद्यालयात ‘युफोरिया 2K26’ या वार्षिक स्नेहसंमेलनाचा भव्य सोहळा रंगणार होता. हा कार्यक्रम केवळ एक सांस्कृतिक उत्सव नव्हता, तर तो विद्यार्थ्यांच्या भावना, स्वप्ने, मैत्री आणि आठवणींचा एक हृदयस्पर्शी संगम ठरला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय शास्त्री होते. त्यांच्यासोबत सचिव सौ. रूपा शास्त्री, उपप्राचार्य डॉ. पराग कुलकर्णी, प्रा. जावेद शेख आणि कार्यक्रम समन्वयक प्रा. राहुल बोरसे यांची उपस्थिती कार्यक्रमाला विशेष मानाचे स्वरूप देत होती. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन होताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला आणि जणू त्या तेजस्वी प्रकाशाने विद्यार्थ्यांच्या स्वप्नांनाही उजाळा मिळाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अनु...

काही चेहरे आनंद देतात काही आग लावतात....!

इमेज
काही चेहरे आनंद देतात काही आग लावतात....! मुंगूसचं तोंड पाहिलं की दिवस चांगला जातो, अशी एक जुनी समजूत आपल्या गावाकडच्या लोकांमध्ये आजही ऐकायला मिळते. पहाटेच्या धूसर प्रकाशात जर मुंगूस दिसलं, तर मनात नकळत एक आशा जागते.आज काहीतरी चांगलं घडेल. कारण मुंगूस म्हणजे चपळाई, धैर्य आणि संकटावर मात करण्याचं प्रतीक मानलं जातं. पण आयुष्याचं गणित मात्र इतकं सोपं नसतं. काही वेळा आपल्या आयुष्यात अशीही काही “मुंगूस तोंडची” माणसं येतात की, त्यांचं तोंड पाहिलं की मनात विचित्र कळ उठते. नकळत तळपायाची आग मस्तकात जाते. त्यांच्या बोलण्यात, वागण्यात, नजरेत एक अशी कडवटपणा असतो की आपला शांत दिवसही अस्वस्थ करून टाकतो. ही माणसं कधी आपलेच असतात नातेवाईक, शेजारी, कधी मित्रही. त्यांच्याकडे पाहिलं की वाटतं, माणूस म्हणून इतकी कटुता मनात कशी साठवता येते? दुसऱ्याच्या आनंदावर पाणी फेरणं, प्रत्येक गोष्टीत नकारात्मकता शोधणं, आणि दुसऱ्याच्या मनाला नकळत जखम करणं.जणू त्यांचं रोजचं कामच असतं. पण खरं सांगायचं तर, अशा माणसांमुळेच आपल्याला चांगल्या माणसांची किंमत कळते. जसं अंधारामुळे दिव्याचा प्रकाश अधिक तेजस्वी वाटतो,...

शब्दांविना मिळणारा आधार....!

इमेज
शब्दांविना मिळणारा आधार....!  कधी कधी आयुष्यात असे क्षण येतात, जेव्हा शब्दांची गरजच उरत नाही. मन खूप थकलेलं असतं, भावनांचा पूर आत उसळत असतो, आणि अशा वेळी एखादी व्यक्ती शांतपणे येते… तुमच्या जवळ बसते… आणि नकळत तुमच्या खांद्यावर डोकं टेकवते. त्या क्षणी ती काही बोलत नाही, पण तिच्या त्या एका कृतीत विश्वास, आपलेपणा आणि सुरक्षिततेची भावना भरलेली असते. खरं सांगायचं तर, यापेक्षा मोठं प्रमाणपत्र माणसाच्या चांगुलपणाचं दुसरं कोणतं असू शकतं? या जगात अनेक लोक भेटतात काही ओळखीचे, काही जवळचे, काही फक्त नावापुरते. पण काही माणसं अशी असतात ज्यांच्याजवळ गेलं की मनाला शांतता मिळते. त्यांच्या बोलण्यात, त्यांच्या वागण्यात आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वात एक वेगळाच सुगंध असतो.माणुसकीचा, समजुतीचा आणि निरपेक्ष आपलेपणाचा. अशी माणसं स्वतःचं चांगुलपण कधीच मिरवत नाहीत. ते मोठमोठ्या गोष्टी करत नाहीत, मोठे दावे करत नाहीत. पण त्यांच्या साध्या उपस्थितीतही लोकांना आधार मिळतो. कारण ते ऐकून घेतात, समजून घेतात आणि कोणताही स्वार्थ न ठेवता दुसऱ्याच्या वेदनेला थोडीशी जागा देतात. जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्याकडे भ...

शिक्षण, संस्कार आणि समाजसेवेच्या प्रवासाचा भावनिक उत्सव

इमेज
७५ वर्षांची उज्ज्वल परंपरा साळवे इंग्रजी विद्यालय व ग्राम सुधारणा मंडळाचा अमृत महोत्सवी सोहळा उत्साहात शिक्षण, संस्कार आणि समाजसेवेच्या प्रवासाचा भावनिक उत्सव साळवे इंग्रजी विद्यालय व ग्राम सुधारणा मंडळाच्या ७५ वर्षांच्या उज्ज्वल प्रवासाचा साक्षीदार ठरलेला अमृत महोत्सवी समारंभ अत्यंत उत्साहपूर्ण, भावनिक आणि दिमाखदार वातावरणात संपन्न झाला. अनेक पिढ्यांना शिक्षणाचे संस्कार देत समाजात सक्षम नागरिक घडविणाऱ्या या संस्थेच्या कार्याचा गौरव करण्यासाठी परिसरातील मान्यवर, माजी विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सोहळ्यामुळे शाळेच्या आठवणींना उजाळा मिळाला आणि संस्थेच्या कार्याबद्दल अभिमानाची भावना सर्वांच्या मनात दाटून आली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जी. एन. पाटील यांनी भूषविले. प्रमुख अतिथी म्हणून ग्राम सुधारणा मंडळाचे अध्यक्ष डॉ. गिरीश नारखेडे, शालेय समितीचे अध्यक्ष डॉ. शशिकांत नारखेडे तसेच सर्व संचालक मंडळ आणि मान्यवर अतिथी उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रम अधिकच प्रेरणादायी आणि अर्थपूर्ण ठरला. कार्यक्रमाची सुरुवात म...

मराठी गझलचे जनक गझल सम्राट सुरेश भट

इमेज
गझल सम्राट सुरेश भट यांच्या दि.14 मार्च 2026 रोजी असलेल्या 23 व्या स्मृतिदिनानिमित्त लेख . मराठी गझलचे जनक  गझल सम्राट सुरेश भट                  दि.१४ मार्च २०२६ असलेल्या मराठी साहित्यातील महान कवी गझल सम्राट सुरेश भट यांना २३ व्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन ॥       मराठी साहित्यातील 'गझल सम्राट' म्हणून ओळखले जाणारे सुरेश भट यांनी मराठी गझलेला घराघरात पोहोचविले.गझल सम्राट सुरेश श्रीधर भट त्यांचे वडील श्रीधर भट हे व्यवसायाने डॉक्टर होते. त्यांच्या आईला साहित्याची आणि कवितेची प्रचंड आवड होती, ज्याचा प्रभाव सुरेश भट यांच्यावर बालपणापासूनच पडला.सुरेश भट यांचे बालपण इतर मुलांसारखे साधे नव्हते; त्यात शारीरिक आणि मानसिक संघर्षाचे पदर होते.लहानपणी त्यांना पोलिओ झाला होता. यामुळे त्यांचा उजवा पाय अधू झाला. या शारीरिक व्याधीमुळे त्यांना बालपणात बराच मानसिक त्रास सहन करावा लागला, पण याच वेदनेने त्यांच्यातील कवीला अधिक प्रगल्भ केले. त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण अमरावतीतच झाले. त्यांना अभ्यासापेक्षा कविता आणि ...

स्वतःच्या मनगटावरचा विश्वास...!

इमेज
स्वतःच्या मनगटावरचा विश्वास...! स्वतःच्या मनगटावर विश्वास असलेल्यांना दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही… जीवनाच्या प्रवासात माणसाला अनेक प्रकारच्या अडचणी, संकटे आणि आव्हाने भेटत असतात. काही वेळा समोरची परिस्थिती इतकी कठीण असते की ती पाहून मन घाबरून जाते. पण काही माणसं अशी असतात की जी परिस्थिती कितीही कठीण असली तरी डगमगत नाहीत. कारण त्यांचा विश्वास दुसऱ्यांच्या ताकदीवर नसतो, तर स्वतःच्या मनगटावर असतो. स्वतःच्या मनगटावर विश्वास असलेला माणूस कधीही दुसऱ्याच्या सामर्थ्याला घाबरत नाही. त्याला माहित असते की खरी ताकद शरीरात नसते, ती मनात असते. आत्मविश्वास, मेहनत आणि जिद्द या तीन गोष्टी ज्या माणसाच्या आयुष्यात असतात, त्याला कुणीही सहज हरवू शकत नाही. कारण तो प्रत्येक संकटाला घाबरून मागे हटत नाही, तर त्याला सामोरे जाण्याचे धैर्य दाखवतो. अशा माणसांच्या डोळ्यांत स्वप्नं असतात, पण त्या स्वप्नांना पूर्ण करण्याची जिद्दही असते. त्यांच्या मनात अपयशाची भीती नसते, कारण त्यांना माहित असते की प्रत्येक अपयश ही यशाकडे नेणारी एक पायरी असते. म्हणूनच ते पडले तरी पुन्हा उभे राहतात, हारले तरी...