प्रगतीच्या सावलीत हरवलेले साधेपण...!

प्रगतीच्या सावलीत हरवलेले साधेपण...!

आजची वस्तुस्थिती थोडी कडू आहे, पण तीच खरी आहे.पेट्रोल, गॅस आणि इंधनाच्या तुटवडीची जाणीव हळूहळू आपल्या दैनंदिन जीवनात येऊ लागली आहे. पण ही फक्त सुरुवात असू शकते.

 लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे, तर संसाधने हळूहळू कमी होत आहेत. उद्या कदाचित पुन्हा ते दिवस येतील जिथे रस्त्यावरच्या गाड्या थांबतील, सायकली चालतील, गॅस संपेल आणि चूल पुन्हा पेटवावी लागेल. सोयी कमी होतील, जीवनाचे मूलभूत गरजांचे मूल्य समजेल आणि आपण प्रत्यक्षात अनुभूती घेऊ की माणूस किती नाजूक परिस्थितीत राहतो.

आज आपण वेग, सोय आणि आरामाच्या मागे धावत आहोत. तंत्रज्ञानाने जीवन सुलभ केले आहे, पण त्याच वेळी आपल्याला निसर्गाशी असलेली जाणीव विसरायला लावले आहे. पूर्वी लोकांना गरज होती म्हणून त्यांचे जीवन साधं होतं, परंतु त्या साधेपणात समाधान, जिव्हाळा आणि संतुलन होते.

उद्या परिस्थितीने आपल्याला तेच स्वीकारावे लागेल. ही भीती नाही; ही जाणीव आहे. प्रगतीला जबाबदारी जोडलं नाही, तर परत मागे जाणं अपरिहार्य आहे. आपल्या हालचालींवर मर्यादा आणण्याची वेळ आली आहे. आपल्या गरजा आणि लालसा यांच्यात संतुलन राखणं आवश्यक आहे, नाहीतर निसर्ग आपल्याला थांबवेल.

प्रगती सुंदर आहे, पण जबाबदारी शिवाय केलेली प्रगती, आपल्याला पुन्हा साधेपणाकडे नेईल. तो दिवस दूर नाही, पण त्याची तयारी आजपासून करता येईल. जर आपण आपल्या जीवनशैलीत थोडा बदल केला, गरजांचा विचार केला आणि संसाधनांचा आदर केला, तर भविष्यातील संकट काहीसे टाळता येईल.
शेवटी, प्रश्न असा उरतो. आपण स्वतःहून साधेपण स्वीकारणार आहोत, की परिस्थिती आपल्याला ते शिकवणार आहे?

© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !