शून्यातून विश्व निर्माण करणारे अशोक भाऊ महाजन: साधेपणात महानता
शून्यातून विश्व निर्माण करणारे अशोक भाऊ महाजन: साधेपणात महानता
अशोक भाऊ महाजन! रंगीला हॉटेलचे संचालक, पण त्यांचं व्यक्तिमत्व फक्त या शब्दात मावणारं नाही. ते साधे, सच्चे, इमानदार आणि दिलदार माणूस आहेत. आपल्या मेहनतीच्या जोरावर शून्यातून विश्व निर्माण करून त्यांनी आपल्या भावांना स्वतःच्या पायावर उभं केलं. त्यांच्या जीवनप्रवासाला नतमस्तक होण्यासारखं आहे.
अशोक भाऊंची कर्तबगारी फक्त रंगीला हॉटेल पुरती मर्यादित नाही; त्यांनी आपल्या कुटुंबाला आणि भावांना खंबीरपणे उभं करण्याचं काम केलं आहे. अशोक भाऊ म्हणजे माणसं जोडणारे, त्यांना आपल्या सोबत घेऊन पुढे जाणारे एक आदर्श नेतृत्व आहेत. त्यांनी स्वतःच्या कष्टातून आणि समर्पणातून जे उभारलं आहे, ते कोणत्याही मोठ्या शिल्पकाराच्या कारागिरीसारखं आहे.
त्यांचा दिलदारपणा असा की, त्यांनी कधीही माणसं पैशातून किंवा सत्ता वापरून जिंकली नाहीत, तर आपल्या साधेपणाने आणि माणुसकीने जिंकली. जिथे माणूस म्हणून मोल आहे, तिथे अशोक भाऊंचं मन नेहमीच मोठं आहे. त्यांनी आपल्या भावांसाठी कधीही आपलं कर्तव्य विसरलं नाही, आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभं केलं, हे त्यांच्या कुटुंबीयांसाठीच नव्हे, तर साऱ्या समाजासाठी आदर्श आहे.
रंगीला हॉटेल हे केवळ व्यवसाय नाही, ते प्रेमाने आणि माणुसकीने भरलेलं स्थान आहे. अशोक भाऊंचं नेतृत्व त्या हॉटेलमधल्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या चेहऱ्यावर हसू आणतं. ते सर्वांना आपलंसं करतात, आणि प्रत्येक जण त्यांचं कौतुक करतो, कारण ते फक्त एक यशस्वी उद्योजक नाहीत, तर एक जबाबदार माणूस आहेत.
आज जेव्हा आपण त्यांना पाहतो, तेव्हा त्यांच्या जीवनप्रवासातले चढ-उतार आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात. शून्यातून ते जे उभं केलं आहे, ते केवळ कष्टाचं फळ आहे. त्यांच्या साधेपणात महानता आहे, आणि त्यांच्या इमानदारीत माणुसकीचं दर्शन आहे.
अशोक भाऊ महाजन यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा. त्यांचा हा साधेपणा, इमानदारी, आणि सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची वृत्ती अशीच कायम राहो, हिच शुभेच्छा!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, अशोक भाऊ!
© शब्दांकन: दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा