गुलाबरावजी वाघ साहेब – बाळासाहेबांच्या विचारांचा सच्चा भक्त आणि उद्धव साहेबांचे कट्टर समर्थक
गुलाबरावजी वाघ साहेब – बाळासाहेबांच्या विचारांचा सच्चा भक्त आणि उद्धव साहेबांचे कट्टर समर्थक
आज आपल्या जिल्ह्याच्या जनतेचे खरेखुरे लाडके नेते, शिवसेनेच्या उबाठा गटाचे खंबीर आणि निष्ठावान शिलेदार, आदरणीय गुलाबरावजी वाघ साहेब यांचा वाढदिवस! त्यांचे कार्य आणि निष्ठा यामधून उलगडणारा त्यांचा प्रवास बघून मन खरंच गर्वाने उंचावून जातं.
गुलाबरावजी हे केवळ एक राजकीय नेता नाहीत, तर आपल्या प्रत्येक शिवसैनिकाशी जिव्हाळ्याचं नातं जोडणारा एक आपला माणूस आहेत. त्यांच्या साधेपणाने, प्रामाणिक कर्तव्यदक्षतेने आणि सतत जनतेच्या सेवेसाठी तयार राहण्याच्या वृत्तीने जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांच्या मनात त्यांनी आदराचं स्थान निर्माण केलं आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचं ते निष्ठावंत अनुकरण करतात, आणि उद्धव साहेबांप्रति असलेली त्यांची निष्ठा अजिबात ढळत नाही. त्यांच्या या निष्ठेमुळे शिवसेनेचा एक भक्कम आधार त्यांनी उभा केला आहे.
गुलाबरावजींचं नेतृत्व म्हणजे शिवसेनेच्या विचारांचा खरा अर्थ. ते केवळ पदासाठी नव्हे, तर जनतेच्या तळमळीच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी नेहमी पुढे सरसावतात. उबाठा गटात असूनही, त्यांनी आपल्या साध्या व्यक्तिमत्त्वातून आणि परखड विचारांतून सामान्य माणसाचं मन जिंकून घेतलं आहे. त्यांचं बोलणं जितकं खणखणीत, तितकंच त्यांच्या मनातली माया ओथंबून वाहणारी आहे. जिल्ह्यातील शिवसैनिक त्यांच्या मार्गदर्शनाखाली एकत्र राहतात, एक कुटुंब म्हणून जपलं जातं.
आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना शुभेच्छा देताना, त्यांच्या कार्याचं आणि त्याच्या प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाचं स्मरण होतं. गुलाबरावजींना उत्तम आरोग्य, यश, आणि सतत जनसेवेची ऊर्जा लाभो हीच आपल्या सर्व शिवसैनिकांची मनापासून प्रार्थना. त्यांच्या नेतृत्त्वाखाली शिवसेनेचा भगवा उंच फडकत राहो, आणि त्यांचा निष्ठेचा आदर्श आपल्याला सदैव प्रेरणा देत राहो, अशीच सदीच्छा!
© शब्दांकन: दीपक पवार (संपादक)खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा