शून्यातून स्वप्नपूर्ती: देविदास श्रावण येवले यांची प्रेरणादायी कहाणी
शून्यातून स्वप्नपूर्ती: देविदास श्रावण येवले यांची प्रेरणादायी कहाणी
धरणगावसारख्या शहरातील एका साध्या कुटुंबात जन्मलेले देविदास श्रावण येवले यांनी आपल्या आयुष्यातील कठीण परिस्थितींवर मात करून केवळ स्वतःच नव्हे, तर आपल्या कुटुंबाचेही भविष्य घडवले. त्यांचा प्रवास म्हणजे परिश्रम, जिद्द आणि आत्मसन्मान यांचे सुंदर उदाहरण आहे.
देविदास यांच्या वडिलांचा जन्म जरी सावकारी कुटुंबात झाला असला तरी त्यांचे वडील मिळेल ते काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असत.बालपणापासूनच त्यांनी वडिलांचे कष्ट पाहिले आणि त्यांच्या मनात लहान वयातच ठाम निश्चय निर्माण झाला की परिस्थिती बदलायची असेल, तर स्वतःला कष्ट करून मोठे काहीतरी साध्य करावे लागेल. शिक्षण हेच त्या परिस्थितीतून बाहेर पडण्याचे साधन आहे, हे ओळखून त्यांनी आपल्या शिक्षणावर लक्ष केंद्रित केले.
शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी धरणगाव येथील एका गॅस एजन्सीमध्ये लिपिक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. प्रामाणिकपणा, कष्ट आणि कामावरील निष्ठेमुळे त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. परंतु त्यांचे ध्येय फक्त स्वतःपुरते मर्यादित नव्हते; त्यांच्या मुलांचे उज्ज्वल भविष्य घडवणे हाच त्यांचा खरा उद्देश होता.
त्यांनी आपल्या मुलांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले आणि त्यासाठी अपार कष्ट घेतले. त्यांच्या या परिश्रमांचे चीज झाले, आणि त्यांच्या दोन्ही चिरंजीव यांच्यापैकी एक स्वप्निल येवले यांनी महावितरण विभागात नोकरी मिळवली तर दुसरा चिरंजीव निखिल बँकेत नोकरीला आहे. स्वप्निल व निखिल यांनी आपल्या वडिलांकडून शिकलेल्या मूल्यांवर ठाम राहून प्रामाणिकपणे आपले कर्तव्य पार पाडले आहे.
देविदास येवले यांची ही कहाणी केवळ संघर्षाची नाही, तर त्यांच्या दृढ इच्छाशक्तीची आणि मुलांसाठी केलेल्या त्यागाची साक्ष देते. त्यांनी समाजाला दाखवून दिले की परिस्थिती कितीही प्रतिकूल असली, तरी जिद्द, प्रामाणिकपणा आणि कष्ट यांच्या जोरावर यश नक्की मिळते.
त्यांचा जीवनप्रवास आजच्या पिढीला प्रेरणा देतो की कोणत्याही अडथळ्यांना घाबरू नका, तर त्यांचा सामना करून आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करा. देविदास येवले यांच्या या जिद्दीला आणि त्यांच्यामुळे कुटुंबावर आलेल्या यशाला मनःपूर्वक वंदन!
©शब्दांकन:दीपक पवार(संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा