संघर्षातून उभी राहिलेली यशोगाथा: किशोर जगदेव महाजन
संघर्षातून उभी राहिलेली यशोगाथा: किशोर जगदेव महाजन
धरणगावच्या हर्षदा मोबाईलचे संचालक किशोर जगदेव महाजन यांची कहाणी ही एका साध्या कुटुंबातील तरुणाने मेहनत आणि कर्तृत्वाच्या बळावर यशाचं शिखर कसं गाठलं, याची प्रेरणादायी कथा आहे. टाकळी, तालुका जामनेर येथील साधारण कुटुंबात जन्मलेले किशोर महाजन यांचे बालपण कष्टात गेले. त्यांच्या वडिलांनी हातमजुरी करून कुटुंब चालवले, आणि त्यामुळे किशोर यांच्या मनात लहानपणापासूनच मेहनतीचं महत्व बिंबलं होतं.
आपल्या शिक्षणाचा खर्च किशोर महाजन यांनी स्वतःच्या कष्टाने उचलला. शिक्षण संपल्यानंतर पोटाची खडगी भरण्यासाठी धरणगाव गाठत त्यांनी जिनिंगमध्ये काम सुरू केलं. तिथे नऊ वर्षे त्यांनी कठोर परिश्रम केले. कामाच्या दिवसात त्यांनी नेहमीच आपल्या परिस्थितीचा विचार केला; आपल्या कुटुंबाची परिस्थिती सुधारण्यासाठी त्यांनी स्वतः काहीतरी नवीन करून दाखवायचं ठरवलं. त्याच प्रेरणेतून त्यांनी हर्षदा मोबाईल रिपेअरिंगचे दुकान उघडले.
किशोर महाजन यांच्या प्रामाणिक कामगिरीमुळे आणि उत्कृष्ट सेवेने हर्षदा मोबाईल धरणगावात अल्पावधीतच लोकप्रिय झाले. लोकांचा विश्वास मिळवत त्यांनी आपल्या व्यवसायाला आकार दिला आणि स्वतःचं स्थान तयार केलं. आज हर्षदा मोबाईल हे फक्त एक दुकान नसून किशोर महाजन यांच्या संघर्षाची, मेहनतीची आणि स्वप्नांना साकार करण्याच्या ध्यासाची साक्ष आहे.
त्यांच्या यशाचा प्रवास हेच सांगतो की, कोणतीही परिस्थिती असो, जिद्द आणि आत्मविश्वासाने आपण जीवनात काहीही मिळवू शकतो. किशोर महाजन यांच्या मेहनतीने आज धरणगावातील प्रत्येकाच्या मनात त्यांच्याबद्दल एक विशेष आदर निर्माण केला आहे. त्यांनी सिद्ध केलं की कठोर परिश्रम आणि स्वप्नांच्या प्रति निष्ठा हेच यशाचं खरं रहस्य आहे.
© शब्दांकन: दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा