आयुष मालपूरे: कष्ट, जिद्द आणि यशाचा प्रेरणादायी प्रवास


आयुष मालपूरे: कष्ट, जिद्द आणि यशाचा प्रेरणादायी प्रवास

एरंडोलच्या लहानशा गावात असं एक व्यक्तिमत्त्व घडलं आहे, ज्याच्या यश कथेने संपूर्ण गावात एक नवा आत्मविश्वास आणि प्रेरणा निर्माण केली आहे. आयुष मालपूरे, एक साधा, मितभाषी आणि खूप मेहनत करणारा युवक, वयाच्या फक्त २२ व्या वर्षी चार्टर्ड अकाऊंटंट (सीए) परीक्षा उत्तीर्ण होऊन सर्वांच्या चांगलाच आदर्श बनला आहे. त्याच्या यशामुळे फक्त मालपूरे कुटुंब नाही, तर संपूर्ण एरंडोल शहर आनंदित झाले आहे. या यशामागे त्याचे कष्ट, जिद्द आणि त्याला त्याच्या कुटुंबीयांनी दिलेले संस्कार आहेत.

आयुषचे जीवन अनेकांसाठी प्रेरणादायी ठरलं आहे. त्याच्या आजोबांचे, स्वर्गीय गोपिणाथ(गोपाल)नरहर मालपूरे धरणगाव यांचे मार्गदर्शन त्याच्यासाठी एका तेजस्वी दीपा प्रमाणे होते. ते केवळ कुटुंबाचेच नव्हे, तर आयुषचे खरे जीवनगुरू होते. त्यांनी त्याला जो प्रामाणिकपणाचा पाठ दिला, तोच आयुषच्या जीवनाचा खरा आधार बनला. या संस्कारांनी आयुषला जीवनातील प्रत्येक टप्प्यावर योग्य निर्णय घेण्याची क्षमता दिली.

आयुषचे वडील गोविंद मालपूरे हे एक साधे, पण कष्ट करणारे व्यक्तिमत्त्व होते.त्यांचे मूळ गाव धरणगाव ते श्रीकृपा जिनिंग प्रायव्हेट लिमिटेडमध्ये एरंडोल येथे साध्या कर्मचाऱ्याचे काम करत असताना आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी सर्वस्व अर्पण करत होते. त्यांनी आयुषच्या भविष्यासाठी जे काही केलं, ते केवळ त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठीच नव्हे, तर त्याच्या कष्टांची खरी किमत आयुषला पटवली. त्याचप्रमाणे, आयुषच्या चुलत्यांचे मार्गदर्शन ही त्याच्या जीवनात मोलाचे ठरले. बिपिन आणि रोशन मालपूरे यांनी नेहमी त्याला योग्य मार्गदर्शन दिले, ज्यामुळे त्याला कधी ही थांबून बसण्याची वेळ आलीच नाही.

आयुषचा संघर्ष म्हणजेच त्याच्या कुटुंबाच्या समर्पणाची गाथा आहे. सीए परीक्षा ही भारतातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक मानली जाते. अनेक अडचणी आणि आव्हानांचा सामना करत आयुषने या परीक्षेला सामोरे जाण्याचा निर्धार केला होता. त्याने आराम आणि खेळ सोडले, आणि केवळ एका गोष्टीवर लक्ष केंद्रित केले - त्याच्या ध्येयावर. त्याच्या चिकाटीने आणि मेहनतीने तो यशाच्या शिखरावर पोहोचला. प्रत्येक दिवशीचा संघर्ष, प्रत्येक कष्टाचा प्रत्येक क्षण त्याच्या ध्येयासाठी झोकून दिले.

आयुषचे यश केवळ त्याच्या कुटुंबाच्या सन्मानाचा नाही, तर संपूर्ण गावाचा गौरव आहे. आज एरंडोलच्या प्रत्येक गल्लीत आयुषची गोष्ट ऐकली जात आहे. त्याच्या यशामुळे नव्या पिढीसाठी एक प्रेरणा तयार झाली आहे. कष्ट, समर्पण आणि ध्येयाची ताकद हीच खरी यशाची गुपितं आहेत, हे आयुषने सिद्ध केलं आहे.

आयुष मालपूरे याच्या यशप्रवासाला मी मनापासून शुभेच्छा देतो! त्याने दाखवून दिलं की कधीही जिद्द आणि कष्ट सोडता येत नाहीत. त्याचं यश फक्त त्याच्यापुरतं मर्यादित नाही, तो संपूर्ण समाजासाठी एक नवा आदर्श बनला आहे. त्याच्या कष्टांनी, त्याच्या विश्वासाने आणि त्याच्या आत्मविश्वासाने त्याला एक नवा आयाम दिला आहे.

"संस्कार, कुटुंबीयांचा आधार, आणि कठोर मेहनत हेच यशाचे खरे गुपित आहे." आयुषने हे सिद्ध केलं आहे. त्याच्या जीवनाचा हा प्रवास संपूर्ण समाजासाठी प्रेरणा देणारा आहे. आयुष मालपूरे, तुमचं यश खूप मोठं आहे, आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला मनःपूर्वक शुभेच्छा!

© शब्दांकन: दीपक पवार (संपादक) खान्देश माझा

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !