निष्ठेचा महामेरू – आदरणीय अण्णासाहेब रमेशअण्णा महाजन


निष्ठेचा महामेरू – आदरणीय अण्णासाहेब रमेशअण्णा महाजन

व्यक्तीचे मोठेपण हे केवळ त्याच्या पदाने निश्चित होत नाही, तर त्याच्या विचारसरणीने, कार्यक्षमतेने आणि अढळ निष्ठेने ठरते. अशाच एका ठाम, निश्चयी आणि तत्त्वनिष्ठ नेतृत्वाचे मूर्तिमंत प्रतीक म्हणजे आदरणीय अण्णासाहेब रमेशअण्णा महाजन.

सन १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत एरंडोल-धरणगाव मतदारसंघात शिवसेनेचे एक बलशाली, प्रभावी आणि विजयाच्या उंबरठ्यावर असलेले उमेदवार म्हणून अण्णासाहेब महाजन यांनी निवडणूक लढवली. त्यांच्या पाठीशी सामाजिक पाठबळ आणि जनतेचा ठाम विश्वास होता. विजय त्यांच्या हाकेच्या अंतरावर असताना नियतीने मात्र काही वेगळेच ठरवले. त्या निवडणुकीनंतर राजकीय परिस्थितीने अनेक वळणे घेतली, पण त्यांना पुन्हा उमेदवारी मिळाली नाही.

अनेक जण संधी न मिळाल्यास पक्ष बदलतात, विचारधारा सोडतात, पण रमेशअण्णांसाठी राजकारण हे केवळ सत्ता आणि पद मिळवण्याचे साधन नव्हते. त्यांच्या दृष्टीने ते एक ध्येय होते, एक साधना होती, ज्याचा केंद्रबिंदू हिंदुत्व आणि बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा होती.

राजकारणात कितीही चढ-उतार आले, कितीही कठीण संघर्ष करावे लागले, तरी अण्णासाहेब कधीही आपल्या तत्त्वांपासून ढळले नाहीत. सत्ता मिळाली नाही, पद लाभले नाही, म्हणून शिवसेना सोडण्याचा विचारही त्यांच्या मनाला शिवला नाही. आजही ते शिवसेनेच्या प्रत्येक कार्यकर्त्यांसाठी आदर्श आणि प्रेरणास्रोत आहेत.

एका खऱ्या नेत्याची ओळख त्याच्या पदावरून नव्हे, तर कार्यकर्त्यांवरील प्रेम आणि आधारावर ठरते. रमेशअण्णांनी कधीही कुणालाही दुय्यम समजले नाही. कार्यकर्ता अडचणीत असेल तर त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे, त्याचे म्हणणे शांतपणे ऐकणे, त्याला योग्य मार्गदर्शन करणे आणि त्याच्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेणे, ही त्यांची खरी ओळख आहे. शिवसेनेच्या कोणत्याही चळवळीत, आंदोलनात आणि संघर्षात त्यांनी नेहमीच आघाडी घेतली. ते केवळ राजकीय नेते नसून, सामाजिक प्रश्नांवर झटणारे आणि लोकांच्या अडचणी सोडवणारे एक संवेदनशील व्यक्तिमत्त्व आहेत.

आजच्या काळात राजकारणात अनेक जण केवळ पद, सत्ता आणि व्यक्तिगत फायद्यासाठी कार्यरत असतात. अनेकांनी विचारधारा सोडून वेगळ्या वाटा पत्करल्या, परंतु रमेशअण्णांनी मात्र आपली तत्त्वनिष्ठता कायम ठेवली. त्यांच्या दृष्टीने पद आणि सत्ता ही क्षणभंगुर असतात, पण विचार आणि निष्ठा कायम टिकली पाहिजे, हा त्यांच्या राजकीय जीवनाचा मूलमंत्र आहे.

आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या निष्ठेच्या प्रवासाला सलाम करण्याची संधी मिळते आहे. त्यांच्या विचारांचा प्रकाश असाच सदैव मार्गदर्शक राहो. त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि अखंड यश लाभो, हीच मनःपूर्वक शुभेच्छा.

शतशः प्रणाम आणि वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

© शब्दांकन: दीपक पवार (संपादक) खान्देश माझा 



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !