शेतीत नवसंकल्पना रुजवणारे प्रगतिशील शेतकरी – दिनेश गुजर
शेतीत नवसंकल्पना रुजवणारे प्रगतिशील शेतकरी – दिनेश गुजर
"शेती ही केवळ व्यवसाय नसून, ती एक संस्कृती आहे, एक जीवनशैली आहे!"
या विचारांना आपल्या परिश्रमाने साकार करणारे जांभोरे गावातील प्रगतिशील शेतकरी दिनेश गुजर हे आधुनिक काळातील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहेत. शेतीत नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार, नवकल्पना आणि जिद्द यांच्या जोरावर त्यांनी आपल्या क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवले आहे.
दिनेशभाऊंनी पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत जलसंधारण, सेंद्रिय शेती आणि ठिबक सिंचनासारखे प्रयोग यशस्वी केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक शेतकऱ्यांनी उत्पादन वाढवले आणि शेतीला नवा आयाम दिला.
फक्त स्वतःपुरते मर्यादित न राहता, त्यांनी इतर शेतकऱ्यांना प्रगतीसाठी प्रेरित केले. समाजहितासाठी त्यांची समर्पित वृत्ती, मदतीचा हात आणि मृदू स्वभाव यामुळे ते गावातील प्रत्येकाच्या मनात विशेष स्थान निर्माण करू शकले.
आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि सतत यशाच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!
"मातीशी नाळ जोडलेल्या हातांनी जेव्हा नव्या प्रयोगांची आस धरली, तेव्हा त्या हातांनी यशाच्या नव्या वाटा शोधल्या!"
दिनेशभाऊ, तुमच्या मेहनतीला आणि यशाला सलाम!
© शब्दांकन: दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
मो.9370165997
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा