दिलदार मनाचा दिलदार माणूस – आप्पा!
दिलदार मनाचा दिलदार माणूस – आप्पा!
शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या माणसांच्या गोष्टी ऐकल्या की मन भारावून जातं. काही जिद्दी माणसं असतात, जी परिस्थितीवर मात करून स्वतःचं अस्तित्व निर्माण करतात आणि समाजात एक आदर्श ठरतात. अशीच एक प्रेरणादायी व्यक्ती म्हणजे धिरेन्द्रभाऊ पुरभे, ज्यांना संपूर्ण परिसर आदराने "आप्पा" या नावाने ओळखतो.
आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचं जीवनप्रवास आठवला, की त्यांच्या कर्तृत्वाची झलक दिसते. ग्रामीण भागात जन्म, परिस्थिती अगदी साधी, पण मनात मोठी स्वप्नं होती. ते स्वप्नं पूर्ण करण्याची जिद्दही तितकीच मजबूत होती. कोणत्याही परिस्थितीत हार न मानता, आपलं वेगळं स्थान निर्माण करण्यासाठी त्यांनी कष्ट घेतले. आपल्या कर्तृत्वाने आणि कामाच्या जोरावर ते राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील साहेब आणि प्रतापराव पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून परिचित झाले.
आप्पा म्हणजे नुसते राजकीय कार्यकर्ते नाहीत, तर लोकांच्या सुख-दुःखात धावून जाणारे, मदतीचा हात पुढे करणारे एक दिलदार मनाचा माणूस आहेत. मैत्री निभवायची कशी, आपलेपणा कसा जपायचा, आणि संकटात आधार कसा द्यायचा हे शिकायचं असेल, तर आप्पांकडून शिकावं. त्यांचं मोठेपण केवळ त्यांच्या कर्तृत्वात नाही, तर त्यांच्या माणुसकीत आहे.
आज त्यांनी ज्या उंचीवर स्वतःला नेलं आहे, ती फक्त मेहनतीची आणि ध्येयाशी असलेल्या निष्ठेची देण आहे. ते ज्या नेत्यांचे समर्थक आहेत, त्या नेत्यांच्या विचारधारेप्रमाणेच त्यांनी लोकांसाठी, समाजासाठी अखंड कार्य केले आहे. त्यांच्या कार्यातूनच ते अनेकांना प्रेरणा देत आहेत.
आप्पांसारख्या दिलदार माणसाचा वाढदिवस हा केवळ एक सोहळा नसून, एका कष्टमय आणि प्रेरणादायी प्रवासाचा उत्सव आहे. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा! त्यांचे आरोग्य उत्तम राहो, आयुष्यातील प्रत्येक यशाची शिखरं त्यांनी सर करावीत, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
🎉 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, आप्पा! 🎉
© शब्दांकन: दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
मो.9370165997
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा