मनाच्या शिंपल्यात जपलेले डी. व्ही. सरांचे अमूल्य मोती
मनाच्या शिंपल्यात जपलेले डी. व्ही. सरांचे अमूल्य मोती
मित्रांनो-- *या जगण्यावर या जन्मावर शतदा प्रेम करणाऱ्या सरांच्या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने-- आज पंचवीस एप्रिल-- डी व्ही कुलकर्णी सरांच्या चौथ्या स्मृति दिनानिमित्त सरांना अत्यंत आदरपूर्वक ही श्रद्धांजली समर्पित*---आदरणीय डी व्ही सरांवर मनापासून प्रेम करणाऱ्या मित्रांनो--- *डी व्ही कुलकर्णीसरांनी इहलोकीची यात्रा संपवली यावर मन विश्वासच ठेवायला तयार नाही!आज सरांच अस्तित्व संपलं असलं तरी मनाच्या शिंपल्यात त्यांच्या अनेक आठवणी मोत्यासारख्या आम्ही जपून ठेवलेल्या आहेत*! मित्रांनो- *आठवीला आरटी काबरे विद्यालयात* मी प्रवेश घेतला! *सर आम्हाला इंग्रजी शिकवायचे* - मला तो दिवस लख्ख आठवतोय! *सरांनी आम्हाला वर्गात फिंगरच स्पेलिंग विचारलं*! काहीच चुकलं काहीच बरोबर आलं यावर सर म्हणाले *ज्यांचं स्पेलिंग बरोबर आलाय ते सगळे ज्वारीच्या कणसातील मोत्याचे दाणे आणि ज्यांचं स्पेलिंग चुकलं ते सगळे भड*! सुदैवाने माझ् स्पेलिंग बरोबर होतं! मी ज्वारीतला मोती- अन्नरसाचा दाणा! मित्रांनो-- *फिंगर म्हणजे बोट! बोट धरल्याशिवाय यशाचा तट गाठता येत नाही! तट गाठल्याशिवाय तटबंदी ओलांडता येत नाही*! खाडकन आवाज आला- माझा हात गालावर-- *गालावर डी व्ही कुलकर्णी सरांची उमटलेली पाचही बोट*! त्यांच्या सगळ्या संतापाचा तांबडा रंग माझ्या गालावर! का ?-- *मी गणवेश न घालताच शाळेत गेलो होतो म्हणून जबरदस्त शिक्षा*! इथं शिस्त या शब्दाचा कित्ता गिरवला गेला! *शिस्तीच पोलादी" कवच" अंगावर त्या वेळेपासून जे चढलं ते*-- *आजतागायत कायम आहे* ! मित्रांनो-- पानशेत प्रलयानं पुण्याचा घास घेतला! *डी व्ही कुलकर्णीसर पुण्याला गेले- तिथून जे परतले ते काळजात दाटलेला हुंदका घेऊनच! पूरग्रस्तांची दैना त्यांच्या भिज शब्दातून ओसंडयला लागली! आम्ही ऐकत होतो- सुन्न होत होतो! त्यांच्या डोळ्यात अश्रू होते- त्या अश्रुत आम्ही समाज पहिला! आपण याच समाजाचे एक घटक आहोत ही भावना अनुरेणू व्यापून गेली*! समाजातल्या व्यथा इतक्या टोकदार असू शकतात हे उमगलं! समाजपुरुषाची सेवा करण्याचं व्रत त्याक्षणी मनानं स्वीकारलं- सरांच्या आशीर्वादाने ते आज पर्यंत अखंड चालू आहे ! *माझं अकरावीचं वर्ष मन अतिशय बेचैन करणार! आयुष्याच्या अत्यंत महत्त्वाच्या उंबरठ्यावर मी उभा! गणपतीचे दिवस होते! मी तापानं फणफणलेला! दसऱ्यापर्यंत मनानं-- शरीरानं पूर्णपणे खचलेला अस्थिपंजर देह! पाठीवर एक आश्वासक स्पर्श झाला! डी व्ही कुलकर्णी सर पाठीवरून मायभरला हात फिरवीत होते! माझ्या नकळत उघडलेल्या ओंजळीत एक सोन्याच पान पडलं! मी जिंकलो- खडखडीत बरा झालो! परीक्षेचा फॉर्म भरण्याची मुदत संपली असतानाही- डी व्ही सरांनी फार्म दिला! मी शक्य तितक्या ताकदीने जोम धरत धरत अभ्यास केला- मी पास झालो! 74 टक्के मार्क मिळाले- त्या दिवशी आधी नमस्कारासाठी वाकलो ते डी व्ही कुलकर्णी सरांच्या पायाशी*! हे यश म्हणजे सोन्यासारख पिवळधमक होत! आयुष्याच भविष्य सरांनी व्याख्यानातून समोर मांडलं! तेव्हाच मनाशी ठरवलं -आपण मेडिकलला जायचं- डॉक्टर व्हायचं! मित्रांनो- एक गोष्ट मात्र नक्की की शाळेने- *मातापित्यांनी आणि आवर्जून सांगायचं झालं तर ते की- डी व्ही कुलकर्णी सरांनी हा शालिग्राम घडविला*!मित्रांनो-- पहिल्यांदा ज्यावेळी मी सरांना जवळून बघितलं त्यावेळी ते टिपिकल शिक्षकी पेशासारखे मला कधीच वाटले नाहीत! अतिशय टीप-टॉप राहणी- डोळ्यावर छानसा चष्मा- आधुनिक पोषाखामुळे उठून दिसणारे अतिशय चार्मिंग पर्सनॅलिटी असणारे आमचे डी व्ही सर- खरतर सिनेमातल्या कोणत्याही हिरोला मागे टाकतील इतके देखणे दिसायचे! -- *माणसाचं मन सुंदर असल की त्याचं व्यक्तिमत्त्व आणखीनच खुलून दिसतं! त्याप्रमाणेच बाह्यरूपाबरोबरच डी व्ही सरांच मन देखील तितकंच सुंदर होतं!- रंगमंचावर धिटाईनं कसं* *उभ राहायचं? याचं बाळकडू डी व्ही सरांनी आम्हाला दिलं! शाळेत असताना विविध स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी सर आम्हाला प्रोत्साहन देत असत*! शाळेत दर बुधवारी सांस्कृतिक कार्यक्रम घडवून आणत! नाटक बसवून ती सादर करणे हे चालूच असायचं! माझ्यातला कलाकार घडवण्याच काम सरांनी केल *! कारण सरांना आमच्यासारख्या मुलांच नेहमीच कौतुक असायचं! याबरोबरच डी व्ही सरांनी आम्हा विद्यार्थ्यांसाठी वृक्ष संवर्धन- श्रम संस्कार शिस्तबद्धता या अनेक संस्कारांची शिदोरी त्यांनी आम्हाला दिली ! पुस्तक पेढी हा असाच एक सरांचा उपक्रम!- प्रत्येक विद्यार्थ्याने निकालाच्या दिवशी आपापली पाठ्यपुस्तकं आणायची_- पासझालेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या पुस्तकाचा संपूर्ण संच गरीब विद्यार्थ्यांसाठी शाळेला परत करायचा! यातूनच परस्परांना मदत करण्याचा संस्कार सरांनी आम्हाला दिला! दरवर्षी हजारो रुपयांची पुस्तकं खरेदी करून समृद्ध वाचनालय- प्रयोगशाळा त्यांनी उभारली! *निवृत्तीनंतर सर पुण्याला स्थायिक झाले*! सरांनी कोथरूडला एक छान फ्लॅट घेतला! सरांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस त्यांच्या कन्या जावई आणि सुविद्य पत्नी शालिनीताई यांनी मोठ्या दिमाखात साजरा केला! या समारंभात कुटुंबाचा एक घटक म्हणून आम्हीही वावरलो हे आम्ही आमच भाग्य समजतो! तीनही मुलींचं सुस्थळी विवाह संपन्न झाल्यानंतर अत्यंत तृप्त समाधानी जीवन उभय पती-पत्नींनी अनुभवलं! सरांचे तीनही जावई त्यांना मुलासारख प्रेम देत आलेत! त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर मुलगा नसल्याची खंत- चिंता मला कधीही दिसली नाही!- कारण सरांनी त्यांना उत्कट प्रेम दिलं! याचा- साक्षात अनुभव म्हणजे सरांच्या अमृतमहोत्सवाच बहारदार नियोजन जे आम्हाला बरच काही सांगून गेलं! *सर स्वभावाने वरवर करारी दिसत असले तरी- सर अत्यंत हळुवार संवेदनशील मनाचे होते* म्हणूनच ते सर्वांना हवे हवेसे वाटायचे! म्हातारपणाला न कंटाळता वृद्धत्व कस आनंदी अनुभवता येईल हे खरोखरच सरांकडून शिकण्यासारख होतं! आदरणीय सरांच्या चिरतारुण्याच रहस्य जाणून घेण्यासाठी मी ज्यावेळी त्याचा मागोवा घेतला त्यावेळी-- माझ्यासमोर प्रकर्षानं एकच नाव आलं ते म्हणजे - *सरांच्या सुविद्य धर्मपत्नी सौ शालिनीताई कुलकर्णी*! *सरांना आयुष्यातील प्रत्येक सुखदुःखात त्यांनी साथ संगत सोबत दिली*! आमच्या सारख्या विद्यार्थ्यांचं आजही
त्या मनापासून स्वागत करतात- त्यांना प्रोत्साहन देतात! सरांसारख आदर्श व्यक्तिमत्व माझ्या आयुष्याचा एक भाग बनलेत! यासाठी मी त्या ईश्वराचा सदैव ऋणी आहे* ! आजही शिक्षण क्षेत्रातील एखादी व्यक्ती माझ्यासमोर आली की - त्यात मी डी व्ही कुलकर्णी सरांना शोधतो! मित्रांनो- सर -आजही आमच्यात आहेत- त्यांनी शिकवलेल्या जीवन मूल्यांच्या रुपान! कृतज्ञतेसह- सरांचा_ शिष्यगण-- *डॉक्टर शाळीग्राम भंडारी- सौ चंद्रकला भुतडा- चि राधेश्याम- चि दीपक भंडारी- अविनाश नांदेडकर अनिल अंधारे- सुभाष भानगावकर अविनाश राजगिरे-नागेश वाघोलीकर- विकास महाशब्दे -सुदाम पाण्डे चंद्रकांत बिर्ला* असा सरांचा असंख्य- असंख्य विद्यार्थी परिवार! तळेगाव दाभाडे पुणे🙏?
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा