कष्ट, सचोटी आणि नावलौकिकाची परंपरा – सुर्यवंशी परिवाराची प्रेरणादायी कहाणी

कष्ट, सचोटी आणि नावलौकिकाची परंपरा – सुर्यवंशी परिवाराची प्रेरणादायी कहाणी

प्रत्येक यशस्वी माणसाच्या मागे त्याच्या कष्टांची, त्याच्या प्रामाणिकतेची आणि त्याने जोडलेल्या माणसांची मोठी ताकद असते. पैसा मिळवणं सोपं असतं, पण विश्वास कमावणं कठीण असतं. आबासाहेब पंडित लकडू सुर्यवंशी यांनी हीच शिकवण आपल्या कष्टमय आयुष्यातून आपल्या कुटुंबाला आणि संपूर्ण समाजाला दिली.

आबासाहेब यांनी आपल्या तरुण वयात सुर्यवंशी सायकल मार्ट सुरू केलं. त्या काळी सायकली हे फक्त वाहतुकीचं साधन नव्हतं, तर लोकांसाठी स्वाभिमानाचं प्रतीक होतं. लोकांना उत्तम सेवा द्यावी, त्यांच्या सोबत नाळ जोडावी आणि व्यवसाय हा नुसता कमाईसाठी न ठेवता लोकांची मने जिंकण्यासाठी करावा, हा त्यांचा विचार होता.

त्यांनी कधी ही व्यवसायाच्या मागे धावण्या पेक्षा माणसं जोडण्याला महत्त्व दिलं. पैसा क्षणिक असतो, पण नाव आणि विश्वास कायम राहतो, या तत्त्वावर त्यांनी अख्खं आयुष्य घडवलं. त्यांनी अनेक गोरगरिबांना मदत केली, कुणाला सायकल घेताना सवलत दिली, कुणाला निखळ प्रेमानं आपलंसं केलं. त्यामुळेच सुर्यवंशी सायकल मार्ट हे फक्त दुकान राहिलं नाही, तर गावाच्या हृदयात एक विश्वासार्ह ब्रँड बनलं.

परंतु काळ बदलत गेला. सायकलींची जागा मोटारसायकलने घेतली आणि आबासाहेबांनी दूरदृष्टीने पुढचं पाऊल उचललं. त्यांनी आपल्या मुलांना शिक्षण देत मोठं केलं आणि त्यांच्यावरही तीच मूल्यं बिंबवली.

त्यांनी मुलाला मेकॅनिकल फील्डमध्ये प्रशिक्षण घेण्यास प्रवृत्त केलं. वडिलांनी जशी सचोटीने सायकलींची सेवा केली, तशीच नवीन पिढीने मोटारसायकलच्या क्षेत्रात काम करावं, हा त्यांचा मानस होता. मुलाने ही वडिलांचा विश्वास सार्थ ठरवत "सुर्यवंशी ऑटो सर्विसेस" या नावाने मोटारसायकल गॅरेज सुरू केलं.

आज सुर्यवंशी ऑटो सर्विसेस हे फक्त एक गॅरेज नाही, तर लोकांच्या विश्वासाचा ठेवा बनलं आहे. दोन मुलं हा व्यवसाय सांभाळत आहेत आणि वडिलांची शिकवण पुढे नेत आहेत. त्यांनी ग्राहकांची मनं जिंकत, प्रामाणिक सेवा देत एक नवीन विश्वासार्ह ब्रँड उभा केला.

जसं वडिलांनी ग्राहकां सोबत नाळ जोडली, तसंच मुलांनी ही. आज ज्या माणसांनी कधी काळी सायकली घेतल्या होत्या, त्यांची पुढची पिढी त्यांच्या गॅरेजमध्ये गाड्यांची सर्व्हिसिंग करून घेते. हीच खरी माणसं जोडण्याची ताकद आहे.

व्यवसायात यश मिळवल्यानंतर आबासाहेबांनी केवळ स्वतःपुरता विचार केला नाही, तर समाजासाठी ही मोठं योगदान दिलं. त्यांनी विविध कार्यकारी सोसायटीमध्ये बिनविरोध चेअरमन म्हणून जबाबदारी सांभाळली.

त्यांनी शेतकऱ्यांसाठी, कष्टकरी लोकांसाठी विविध योजना राबवल्या. लोकांना योग्य सुविधा मिळाव्यात, गरजूंना मदत व्हावी, गावाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू राहिले. त्यांनी पैशाने नाही, तर आपल्या कष्टाने आणि मनाने माणसं जोडली.

आबासाहेबांची ही कहाणी आपल्याला शिकवते की मेहनत आणि प्रामाणिकता माणसाला मोठं बनवते. पैसा कमवण्यापेक्षा विश्वास जिंकणं अधिक महत्त्वाचं आहे. काळाच्या बदलत्या ओघात पुढचं पाऊल उचलणं आवश्यक असतं. व्यवसाय हे केवळ कमाईसाठी नसतं, तर लोकांसोबत नाळ जोडण्याचं साधन असतं. समाजासाठी काही तरी योगदान देणं हे प्रत्येकाची जबाबदारी असते.

आज ही सुर्यवंशी परिवार हे नाव गावभर विश्वासाचं प्रतीक बनून आहे. नाव पैशाने नव्हे, तर माणसं जोडून कमवायचं असतं, हे त्यांच्या जीवनातून आपल्याला शिकायला मिळतं. त्यांच्या कष्टांचा, त्यांच्या सचोटीचा आणि त्यांच्या माणुसकीचा हा वारसा पुढच्या पिढ्यांसाठी नेहमीच प्रेरणादायी राहील.

© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !