शून्यापासून विश्व निर्माण करणारा – हिराभाऊ पवार यांना वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा
शून्यापासून विश्व निर्माण करणारा – हिराभाऊ पवार यांना वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा
शून्यापासून विश्व निर्माण करणारा माणूस... हे शब्द वाचले की डोळ्यांसमोर उभा राहतो तो एकच चेहरा – हिराभाऊ पवार.
ओझर (ता. चाळीसगाव) या छोट्याशा गावात एका सामान्य कुटुंबात जन्मलेला हा मुलगा आज केवळ नावानेच नव्हे, तर स्वभावाने ही "हिरा" ठरला आहे. कष्ट, चिकाटी, संघर्ष आणि माणुसकी यांच्या बळावर त्यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली. "माऊली एजन्सी" सारखा व्यवसाय उभा करून लोकांच्या मनात विश्वासाचं स्थान मिळवलं.
हिराभाऊ हे नाव उच्चारलं की आठवतो तो प्रसन्न हास्याचा चेहरा, निरागस मन आणि सर्वांना आपलंसं करणारा स्वभाव. त्यांच्या डोळ्यांत नेहमीच आपलेपणाच दिसतो. मोठा असो वा लहान, गरीब असो वा श्रीमंत – प्रत्येकाशी त्यांनी माणूस म्हणूनच वागणं जपलं.
आजच्या या स्वार्थी जगात जिथं नाती हरवत चालली आहेत, तिथं हिराभाऊसारख्या व्यक्तींच्या अस्तित्वामुळे माणुसकी अजून ही शाबूत आहे. त्यांनी कधीही मोठेपणाचा आव न आणला नाही, ना स्वतःला पुढं मांडलं. पण तरी ही – किंवा म्हणूनच – ते लोकांच्या मनात खोलवर स्थान निर्माण करू शकले.
त्यांचं आयुष्य म्हणजे एक उघडं पुस्तक – जिथल्या प्रत्येक पानावर माणुसकी, प्रामाणिकपणा आणि समर्पण यांची अक्षरं सुवर्णाक्षरांनी कोरलेली आहेत. कुणाला मदतीची गरज असो, कुणी अडचणीत असो, किंवा कुणाचं मन तुटलेलं असो – सगळ्यांच्या ओठांवर येणारं एकच नाव म्हणजे "हिराभाऊ".
ते कधी गाजावाजा करत नाहीत. पण गरज पडली की, त्यांची मूक साथ संकटांमध्ये आधारवड ठरते. मदतीला त्यांच्या कृतीत आवाज नसतो, पण परिणाम मात्र खोलवर असतो. त्यांच्या कृती म्हणजे शांत झऱ्यासारख्या – कोणताही गडगडाट न करता, तहान भागवणाऱ्या.
त्यांचा स्वभाव, त्यांच्या नजरेतील आपुलकी, त्यांच्या वागण्यातलं सच्चेपण – हेच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचं खऱ्या अर्थानं वैभव आहे. त्यांनी जे कमावलं ते ना केवळ पैशानं, ना केवळ प्रतिष्ठेनं – तर माणसांच्या मनानं.
आज त्यांचा वाढदिवस आहे. पण ही केवळ एका व्यक्तीच्या जन्मदिनीची नोंद नाही, ही माणुसकीच्या महोत्सवाची दिवाळी आहे. समाजात अजून ही चांगुलपणा शिल्लक आहे, याची जाणीव करून देणारा हा विशेष दिवस आहे.
हिराभाऊ म्हणजे प्रत्येकाच्या जीवनातील वेगवेगळी भूमिका – कुणासाठी भाऊ, कुणासाठी मित्र, कुणासाठी संकटातील सावली. ते कधी थकले नाहीत, कधी कुणापुढे आपलं दुःख व्यक्त केलं नाही. उलट, इतरांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्यासाठी त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य आनंदानं खर्च केलं.
त्यांच्या वाढदिवसानिमित्त मनात एकच भावना उमटते –
"हजारो चेहरे रोज दिसतात, पण हिराभाऊसारखं सच्चं हास्य दुर्मीळ असतं.
शब्द अनेक ऐकायला मिळतात, पण त्यांच्या मूक उपस्थितीत असलेलं सामर्थ्य कोणत्या ही भाषेत सांगता येत नाही."
आज त्यांना शुभेच्छा देताना मनापासून एकच प्रार्थना करते –
“तुमच्यासारखी माणसं म्हणजेच खरं हिरवं गार झाड –
ज्यांच्या सावलीत माणुसकी वाढते,
ज्यांच्या फळांनी प्रेमाची गोडी मिळते,
आणि ज्यांच्या मुळांनी संस्कारांची मुळे खोलवर रुजतात.”
हिराभाऊ पवार यांना वाढदिवसाच्या अत्यंत हार्दिक, प्रेमळ आणि मंगलमय शुभेच्छा!
तुमच्यासारख्या हिरक महत्त्वाच्या व्यक्तीमुळे आजूबाजूचं सगळं अवकाश उजळून गेलं आहे. आमच्या मनात तुमचं स्थान अढळ आहे – आणि कायम राहील.
कारण...
"तुमच्यासारख्या माणसांमुळेच हे जग अजून ही माणुसकीने नटलेलं आहे!"
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा