“गरीबीला हरवून जिद्दीनं घडवलेलं विश्व - नितीन लक्ष्मण चौधरी”
“गरीबीला हरवून जिद्दीनं घडवलेलं विश्व - नितीन लक्ष्मण चौधरी”
काही व्यक्तिमत्त्वं अशी असतात, जी अगदी शून्यातूनच आपलं विश्व घडवतात… जिद्द, कष्ट आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर आपली वेगळीच ओळख निर्माण करतात. अशाच जिद्दी व्यक्तिमत्त्वाचं नाव आहे. नितीन लक्ष्मण चौधरी.
एरंडोल या छोट्याशा गावात, अगदी साध्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला. वडील दुसऱ्यांच्या शेतात मजुरी करीत, तर कुटुंबाचा गाडा कसा-बसा रेटला जात असे. गरीबीचं वातावरण, कष्टाचा रोपलेला घाम आणि दिवसेंदिवसचं संघर्षमय जगणं अशा परिस्थितीतच लहानग्या नितीनचं बालपण सरत गेलं. लहानपणापासूनच त्यांच्या मनात एकच गोष्ट घोळत राहिली “जर आपल्याला कुटुंबाला अडचणींमधून बाहेर पडायचं असेल तर कष्टाशिवाय पर्यायच नाही”.
याच जाणीवेनंच अवघ्या आठव्या वर्षीच ते कुटुंबाचा आधार होण्यासाठी पुढे सरसावले. लहान वयातच डॉ. सतीश पाटील यांच्याकडे रोज दोन रुपये मेहनतानं कमवायला सुरुवात केली. कष्टाच्या या शाळेतच आपलं शिक्षण घडवलं, आपलं शालेय जीवन आठवी पर्यंत तिथेच काम करून पूर्ण केलं. जिद्द एवढीच… दहावी पर्यंतच शिक्षण घेत, मोठा मुलगा म्हणून कुटुंबाचा आधारस्तंभ होण्यासाठी पुढे आले.
शिक्षणानंतर त्यांनी आपली वाट निवडली. रेडिमेड कपड्यांचा व्यापार. बाजारोगण बाजारात जाऊन, कडक उन्हात, थंडीत, कधी दारोदारी तर कधी रस्तोरस्ता आपला व्यवसाय वाढवला. आपुलकी, विश्वास आणि इमानी ईदबारीच त्यांच्या व्यापाराचा मूलमंत्र राहिला. कष्टाच्या घामाचा प्रत्येक थेंब त्यांच्या जिद्दीचं साक्ष आहे.
आज नितीन लक्ष्मण चौधरी आपल्याच कष्टाच्या जोरावर, स्वाभिमानानं उभे आहेत. त्यांच्या घामाचा प्रत्येक थेंब त्यांच्या जिद्दीचं ज्वलंत प्रमाण आहे. ज्या दिवसांत साधेपणाचं जगणंच एक लढाई होती, त्याच दिवसांतून त्यांनी आपलं भविष्य घडवलं आहे.
“स्वप्नं पाहणाऱ्यांचीच ती खरी होतात, जे त्यांना कष्टाच्या घामानं साकार करतात” या वाक्याचा अर्थ त्यांच्या प्रत्येक पावलांतून दिसून येतो.
शून्यातून आपलं विश्व घडवणाऱ्या या जिद्दी व्यक्तिमत्त्वाचा जीवनप्रवास म्हणजेच कष्ट, संयम आणि विश्वासाचा ज्वलंत आदर्श आहे. गरीबीचं जोखड तोडून आपली वेगळी ओळख घडवणारे नितीन लक्ष्मण चौधरी हे प्रत्येक तरुणाच्या हृदयी प्रेरणेचं दीप आहेत.
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा