हसऱ्या मनाचा दिलदार माणूस – पंकज पाटील !
हसऱ्या मनाचा दिलदार माणूस – पंकज पाटील !
माणूस मोठा असतो त्याच्या पदाने, पैशाने नाही…
तो मोठा असतो त्याच्या मनाने, त्याच्या स्वभावाने, त्याच्या दिलदारीने…
आणि हाच आदर्श उभा करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे – पंकज पाटील!
कासोदा येथील कारखाना परिसरात लहानपणापासून वाढलेला पंकज, आज अनेकांच्या मनात एक हसरा, प्रेमळ आणि दिलदार माणूस म्हणून ओळखला जातो. त्याचे वडील त्या कारखान्यात काम करत होते. कष्ट, प्रामाणिकपणा आणि सचोटी हेच त्यांच्या घरातील संस्कारांचे मूळ. तेच संस्कार पंकजभाऊंच्या व्यक्तिमत्त्वात आज ही जिवंत आहेत.
कारखाना बंद झाला… परिस्थिती बदलली… पंकजने आपला गाव गाठल पण त्याची हसरी मुद्रा, मनातली माणुसकी, आणि साऱ्यांना हासवण्याची ताकद तशीच टिकून राहिली.
त्याने कधी ही परिस्थितीवर रडणं शिकलं नाही, तर ती हसत-हसत झेलणं शिकवलं.
कोणी दुःखी असेल, चिंतेत असेल तर पंकज पाटील त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणतो, “चिंता करू नको मित्रा, आपण आहोत ना!”
अशा या सर्वांचा लाडका, हास्यविनोदात रमणारा, मनमिळावू, आणि लोकांच्या मनात घर करून राहणाऱ्या पंकज पाटील यांच्या वाढदिवसाचं निमित्त हे फक्त एक औपचारिक क्षण नाही, तर त्यांचं आयुष्य साजरं करण्याचा, त्यांच्या माणुसकीला सलाम करण्याचा एक सुंदर योग आहे.
पंकजभाऊ,
तुमचं आयुष्य असंच आनंदात, आरोग्यात आणि माणुसकीच्या ओलाव्यात फुलावं,
तुमचं हास्य कायम साऱ्यांच्या चेहऱ्यावर उमटत राहो,
आणि तुमच्या दिलदार स्वभावाची झलक सतत समाजात प्रेरणा ठरो!
आपणास वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा!
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा