“विद्येच्या विश्वात कु. आराध्याचा राष्ट्रीय सन्मान”


“विद्येच्या विश्वात कु. आराध्याचा राष्ट्रीय सन्मान”

विद्येचे गगन गाठण्यासाठी जिद्द, कष्ट आणि योग्य संस्कारांची साथ मिळाली तर लहानग्यांची झेप राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचणे सहज शक्य होते, हेच पुन्हा एकदा सिध्द झाले आहे! अशाच एका प्रेरणादायी यशोगाथेचे साक्षीदार आपण सध्या एरंडोल न्यू इंग्लिश मेडियम स्कूल मधून झाले आहे. या शाळेतील अत्यंत हुशार, जिद्दी आणि गुणी विद्यार्थिनी कु. आराध्या कृष्णा महाजन हिने राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आलेल्या प्रतिष्ठित सर्वोदय अवॉर्ड स्कॉलरशिप परीक्षा 2024/25 मध्ये आपली चमकदार छाप उमटवली आहे. या लेकीने राष्ट्रीय स्तरावर पाचवा क्रमांक पटकावत केवळ आपल्या शाळेचंच नव्हे तर कुटुंबाचे आणि गावाचे नाव राष्ट्रीय पातळीवर उजळवले आहे.

कालिकत, केरळ येथे आयोजित या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेत कु. आराध्याने आपल्या मेहनत, जिद्द आणि अखंड प्रयत्नांच्या जोरावर मेरिटमध्ये स्थान प्राप्त केले आहे. या घवघवीत यशाचा सन्मान म्हणून तिला प्रमाणपत्र, गोल्ड मेडल आणि रोख रक्कम अशा सन्मानाचा बहुमान प्रदान करण्यात आला आहे. या लेकीचं हे मोठं यश साजरं करताना शाळेचे आदरणीय प्रिन्सिपल श्री. हॅरी जॉन सर, व्हाइस प्रिन्सिपल सौ. सरला पाटील मॅडम, वर्गशिक्षक सौ. अश्विनी महाजन मॅडम या साऱ्या गुरुजनांनी तिला शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. लेकीचं हे यश म्हणजेच या साऱ्या गुरुजनांच्या श्रमाचा, समर्पणाचा आणि योग्य मार्गदर्शनाचा विजय आहे.
या सोबतच या लेकीचं अभिनंदन करणारे तिचे आईवडील श्री. कृष्णा अरुण महाजन व सौ. देवयानी महाजन, आजी कल्पना खुणेपिंप्रे, पणजी तुळसाबाई खुणेपिंप्रे, आजी-आजोबा सौ. हेमलता महाजन व श्री. भगवान नारायण महाजन, काका मनोहर महाजन, काका महेश महाजन, मामी कविता महाजन, मामा प्रशांत महाजन या साऱ्या आप्तस्वकीयांच्या डोळ्यांत लेकीचं हे घवघवीत यश पाहून अभिमानाचा आनंददिप उजळून आला आहे. या साऱ्या आप्तस्वकीयांच्या साक्षीने लेकीचं हे घवघवीत यश म्हणजेच परिवाराच्या संस्कारांचा, जिद्दीचा आणि पाठिंब्याचा सुंदर साक्षात्कार आहे.

कु. आराध्या महाजन ही विखरण येथील रहिवासी आहे. जिद्द, चिकाटी, कष्टाची तयारी आणि संस्कारांची लेक म्हणूनच तिने आपली वेगळी ओळख घडवली आहे. विशेष म्हणजेच ती सामाजिक कार्यकर्ते कै. अरुण ओंकार खुणेपिंप्रे यांची नात आहे, त्यामुळेच या लेकीने आपल्या परिवाराचा सांस्कृतिक, सामाजिक आणि शैक्षणिक वारसा राष्ट्रीय स्तरावर सन्मानाने सादर केला आहे.

लहान वयातच मोठे यश प्राप्त करून या लेकीने दाखवून दिले आहे की जिद्द, कष्ट, योग्य संस्कार, गुरुजनांचे मार्गदर्शन आणि आप्तस्वकीयांचा स्नेह व पाठिंबा असेल तर कोणतीच परीक्षा अवघड नाही! या लेकीचं हे घवघवीत यश म्हणजेच प्रत्येक लहानग्यासाठी एक आदर्श आहे. एक दीपस्तंभ आहे जो दाखवतो की जिद्द असेल तर कोणतं ही शिखर गाठणं शक्य आहे.

कु. आराध्या महाजन या लेकीचं भवितव्य अजूनच उज्वल होवो, तिने अजून मोठे शिखर गाठावेत, आपला परिवाराचा, शाळेचा, गावाचा आणि अखंड देशाचा सन्मान वाढवावा, अशीच समस्त आप्तस्वकीयांची, शिक्षकवर्गाची आणि समस्त गावकऱ्यांची सदिच्छा आहे! 

© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा 
   

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !