मनापासून शुभेच्छा… एक खास माणसासाठी…!

मनापासून शुभेच्छा… एक खास माणसासाठी…!

धरणगावच्या गल्लीबोळात जेव्हा संध्याकाळी खवय्यांची पावलं आपसूक वळतात… जेव्हा छोट्या गाड्यावरून केवळ चव नाही तर प्रेम देखील मिळतं… तेव्हा त्या सगळ्या गोड आठवणींचं एकच नाव आठवतं  राकेश आप्पा देशमुख!

आज त्यांचा वाढदिवस… फक्त तारखांचा खेळ नाही हा… हा दिवस आहे मेहनतीचा सन्मान होण्याचा… माणुसकीच्या झाडाला फुलं फुलण्याचा… आणि एक प्रेमळ हसऱ्या चेहऱ्याला आभाळभर शुभेच्छा देण्याचा.

एक साधी सुरुवात… पाणीपुरीच्या गाड्यापासून सुरू झालेला हा प्रवास… पण हळूहळू धरणगावच्या प्रत्येक घरात एक गोड आठवण होऊन रुजलेला प्रवास…
गुरुकृपा पाणीपुरी आणि दाबेली या नावाखाली फक्त पदार्थ नाही मिळाले, तर प्रेम, आपुलकी आणि समाधान देखील मिळालं. खवय्यांसाठी ती जागा पोटभर जेवणाची नसून मनभर समाधानाची बनली.

खाऊ गल्लीच्या अध्यक्ष पदावरून आप्पांनी हा संदेश दिला. व्यवसाय ही एक गरज असते, पण माणूसपण ही खरी ओळख असते.
आप्पाच्या चेहऱ्यावरचं हसणं… त्यांच्या मनातली माया… आणि प्रत्येकाला आपलंसं करून टाकणारा बोलणं… हेच आप्पांचं खरं वैभव.

आज राकेश आप्पांचा वाढदिवस… या दिवशी फक्त मेणबत्त्या नव्हे तर नात्यांचं, माणुसकीचं आणि प्रेमाचंही उजळणं होतंय.
आपल्या हातातला प्रत्येक गरम वडा, प्रत्येक तळलेली पाणीपुरी ही केवळ पदार्थ नाही, ती त्यांची मेहनत, त्यांचा संघर्ष आणि त्यांच्या स्वप्नांची गोड आठवण आहे.

धरणगावच्या मातीला अभिमान वाटावा असा मुलगा… गावाच्या गल्ल्यांना हसू फुलवणारा…
मनात आपुलकी जपणारा… आणि हृदयात सर्वांना आपलं मानणारा माणूस…
आज त्याच्या आयुष्याच्या आणखी एका सुंदर वर्षाची सुरुवात होतेय!

आप्पा… देव तुम्हाला आरोग्य देऊ दे… आयुष्यात अजून यशाची भरारी द्यावी… आणि तुमचं हसतं राहणं अखंड टिकू दे…
कारण धरणगावला तुमच्या प्रेमाची, तुमच्या हास्याची आणि तुमच्या गोडव्याची गरज आहे… नेहमी, आज… आणि उद्याही!

🎉 वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा 🎉
🎈 राकेश आप्पा देशमुख 🎈
आपण असेच हसत रहा… वाढत रहा… फुलत रहा!

© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !