एक दिलदार मनाचा दोस्त – गजेंद्रभाऊ परदेशी
एक दिलदार मनाचा दोस्त – गजेंद्रभाऊ परदेशी
मित्र म्हटलं की डोळ्यांसमोर काही ठराविक चेहरे येतात… पण काही चेहरे असतात, जे हृदयात घर करून राहतात. अशाच एक दिलदार मनाच्या, शब्दाला जागणाऱ्या, वेळप्रसंगी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या माणसाचं नाव म्हणजे गजेंद्रभाऊ परदेशी.
गजेंद्रभाऊ हे नाव घेताच अनेक आठवणींनी मनात गर्दी होते. एखाद्याचं दु:ख समजलं की तो स्वतःच्या मनात ते सामावून घेतो, एखाद्याच्या डोळ्यात अश्रू दिसले की स्वतःच्या डोळ्यांत ओल घेऊन त्या अश्रूंना शब्द देतो. कोणी मदतीसाठी हाक मारली की "माझं आहे" म्हणत पहिला उभा राहतो.
तो फक्त मदतीला धावून येणारा नाही, तर मनात कायम चांगुलपणा बाळगणारा "भला माणूस" आहे. शब्द दिला की त्याला प्राणपणाने पाळतो. आणि प्रसंगास अनुसरून जशाला तसं उत्तर द्यायला मागे पुढे न पाहणारा पण तरीही मनात कुठलाही अहंकार नसलेला, नम्र पण ठाम असा व्यक्तीमत्व!
त्याचं हसणं देखील मनात शांतता देतं. आणि रागावला तर समोरच्याला ही आरसा दाखवतो.पण त्याच्या रागामागेही खूप प्रेम असतं, आपलेपणाची चीड असते.
आज गजेंद्रभाऊ परदेशी यांच्या वाढदिवसाचं निमित्त आहे, पण खरंतर हा दिवस एक मित्र, एक भाऊ, एक आधारस्तंभ लाभल्याचा उत्सव आहे. तो फक्त आपल्या माणसांसाठी जगतो. त्याच्या गरजांसाठी नाही, त्यांच्या सुख-दु:खांसाठी.
त्याच्यासोबत असताना "मित्र" या शब्दाचा खरा अर्थ उमगतो. नाते हे केवळ रक्ताचं नसतं, हे त्याचं वागणं सिद्ध करतं.
आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एकच प्रार्थना
तुझं दिलदार मन असंच नितळ राहो,
तू जिथे जाशील, तिथे माणुसकीचं आणि मैत्रीचं झाड फुलत राहो.
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तू अशीच प्रेरणा देणारी सावली बनून राहो.
गजेंद्रभाऊ, तुझ्यासारखा मित्र मिळणं हे नशिबाचं नव्हे, तर देवाचं आशीर्वाद आहे.
🎉 वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.
तू जग जिंकलंस नसलंस, चालेल… पण मनं जिंकलीस, हेच खरं यश! ❤️
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा