अजातशत्रू व्यक्तिमत्व भाऊसाहेब डी.जी.पाटील साहेब
अजातशत्रू व्यक्तिमत्व भाऊसाहेब डी.जी.पाटील साहेब
धरणगावच्या मातीतून उगम पावलेली एक तेजस्वी आणि विधायक ज्योत, जी आज अखंडपणे समाज, जनसामान्य आणि पक्षकार्यात झगमगते आहे. त्या म्हणजे भाऊसाहेब डी.जी. पाटील. जिथे मतभेद असतात, तिथे मनभेद नसावेत, हा जीवन दृष्टिकोन अंगीकारणारे, प्रत्येकाला आपलेसे करणारे आणि पक्षीय सीमा ओलांडून थेट लोकांच्या मनात स्थान मिळवणारे एक अजातशत्रू व्यक्तिमत्त्व म्हणजेच भाऊसाहेब.
सर्व सामान्य कार्यकर्त्यावर विश्वास ठेवणारे, प्रत्येकाच्या सुख-दुःखात सहभागी होणारे आणि सत्तेच्या सर्वोच्च पायऱ्यांवर असताना ही जमिनीशी नाळ जुळवून ठेवणारे नेते आज दुर्मिळ झाले आहेत. अशा नेत्यांमध्ये भाऊसाहेबांचे नाव आदरपूर्वक घेतले जाते. त्यांची नम्र, सौम्य भाषा, संयमी व्यक्तिमत्त्व, आणि गरजूंसाठी नेहमी तत्पर राहणारी मदतीची भावना हेच त्यांचे खरे वैशिष्ट्य.
त्यांच्यासाठी राजकारण म्हणजे केवळ सत्तेचा खेळ नव्हे, तर ती एक निस्वार्थ सेवा आहे. लोकांसाठी झिजणं, त्यांच्या अडचणी आपल्या अडचणी मानून त्यावर उपाय शोधणं, हीच त्यांच्या आयुष्यातील खरी तळमळ आहे. भाऊसाहेब हे असे व्यक्तिमत्त्व आहेत, जे कोणाच्या ही मनात द्वेषाची भावना निर्माण करत नाहीत. म्हणूनच, त्यांच्या नावाचा उच्चार झाला की विरोधकांच्या ही मनात आपसूकच आदर निर्माण होतो.
धरणगावच्या सर्वांगीण विकासामध्ये त्यांनी दिलेले योगदान अत्यंत मोलाचे आहे. शहराच्या प्रत्येक गल्लीत, प्रत्येक भागात त्यांच्या कार्याचा ठसा आज ही उठून दिसतो. या सर्व मागे आहे एक विशाल हृदय, माणुसकीने भरलेली अंत:करणाची जाणीव आणि समाजासाठी काहीतरी करून दाखवण्याची सखोल भावना.
भाऊसाहेबांचा वाढदिवस म्हणजे केवळ त्यांचा जन्मदिन नव्हे, तर धरणगाव शहरातील सामाजिक जाणीव, निष्ठा आणि माणुसकीच्या मूल्यांचा साजरा करणारा एक महत्त्वाचा दिनविशेष आहे.
अशा या दिलदार मनाच्या भाऊसाहेबांना वाढदिवसानिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा.
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा