एक साधा सच्चा माणूस विनायकभाऊ महाजन...!
एक साधा सच्चा माणूस विनायकभाऊ महाजन...!
विनायकभाऊ महाजन... हे नाव उच्चारताच डोळ्यांसमोर उभा राहतो एक असा तेजस्वी चेहरा, ज्यामध्ये प्रामाणिकपणाचे तेज आणि स्वाभिमानाची चमक स्पष्टपणे जाणवते. शून्यातून आपल्या आयुष्याची वाटचाल सुरू करून समाजात एक विशिष्ट ओळख निर्माण करणाऱ्या थोडक्याच माणसांमध्ये त्यांचे नाव अभिमानाने घेतले जाते.
शेतकरी सेना (शिंदे गट) चे धरणगाव तालुक्याचे तालुका प्रमुख, तसेच ग्राहक पंचायतचे तालुकाध्यक्ष ही पदे भूषवताना त्यांनी केवळ अधिकार नव्हे, तर जबाबदारी ही अधिक महत्त्वाची असते, हे कृतीतून सिद्ध केले आहे. मात्र, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख ही त्यांच्या मनाच्या विशालतेत आणि माणुसकीच्या भावनेत आहे.
विनायक महाजन यांचे संपूर्ण आयुष्य म्हणजे संघर्ष, कष्ट, जिद्द आणि निष्ठेची एक प्रेरणादायक कथा आहे. अत्यंत साध्या घरातून, खेड्यापाड्यातून आलेला हा माणूस आपल्या चिकाटीने आणि निस्वार्थ सेवाभावनेने आज समाजात एक विश्वासार्ह स्थान निर्माण करून उभा राहिला आहे.
त्यांची जीवनदृष्टी, समाजाप्रती असलेली बांधिलकी, आणि माणसांशी संवाद साधण्याची त्यांची आत्मीय शैली ही त्यांच्या लोकप्रियते मागील खरी कारणे आहेत. ते कायम म्हणतात. “माणूस मोठा होतो तो त्याच्या मनाच्या श्रीमंतीने आणि निष्ठेने.” ही निष्ठा त्यांनी माननीय नामदार गुलाबरावजी पाटील साहेब यांच्या विचारांप्रती आणि नेतृत्वाप्रती जपली असून, त्या प्रेरणेवरच आपले राजकीय आणि सामाजिक कार्य उभे केले आहे.
विनायक महाजन हे राजकारणात सक्रिय असून ही, त्यांनी आपल्या माणुसकीच्या धाग्याला कधीही विसरले नाही. समाजात वावरणारे, सामान्यांच्या सुखदुःखात सहभागी होणारे आणि प्रत्येक संकटाच्या क्षणी पाठीशी उभे राहणारे ते एक विश्वासाचं आणि आधाराचं प्रतीक बनले आहेत. त्यांच्या बोलण्यात जेवढी साधेपणा आहे, तेवढीच त्याच्या कृतीत स्पष्टता आणि निस्वार्थ सेवा आहे.
त्यांना मोठमोठ्या भाषणांचा, गाजावाज्याचा मोह नाही. त्यांच्या कार्यातूनच त्यांची खरी ओळख तयार होते. म्हणूनच धरणगाव तालुक्यात त्यांचं नाव केवळ पदांमुळे घेतलं जात नाही, तर त्यांच्या मनापासूनच्या कार्यामुळे, त्यांच्या आत्मीयतेमुळे, आणि त्यांच्या निस्वार्थी वृत्तीमुळे आदरानं घेतलं जातं.
विनायक महाजन हे खरंतर “दिलदार मित्रांचा दिलदार मित्र” म्हणूनच सर्वत्र ओळखले जातात. एकदा कोणाशी मैत्री केली, की ती नाती ते पूर्ण निष्ठेने जपतात. कोणती ही मदत असो, ती देताना कधीही हिशोब ठेवत नाहीत. त्यांच्या मनात लोकांप्रती असलेली आपुलकी ही नकळत सर्वांपर्यंत पोहोचते.
आज ही ते मोकळेपणाने सर्व सामान्यां लोकांनमध्ये मिसळतात, त्यांच्या अडचणी समजून घेतात, आणि शक्य तेवढं मार्गदर्शन, मदत करत राहतात. त्यांच्या जीवनातील प्रत्येक टप्पा तरुणांना प्रेरणा देणारा आहे.की यश पदावरून नाही, तर स्वभावातून आणि कृतीतून मिळतं.
अशा या दिलदार, सच्च्या, आणि स्वाभिमानी व्यक्तिमत्त्वाला शब्दांत बांधणं खरोखर कठीण आहे. पण जेवढं बोलता येईल, तेवढं हेच खरं विनायक महाजन हे केवळ एक नाव नाही, तर एक भावना आहे. एक प्रेरणा आहे.
ते आपल्यातीलच एक आहेत.आपल्यासारखेच साधे, आपल्या माणसांसाठी नेहमी सजग आणि समर्पित. शून्यातून सुरू केलेल्या त्यांच्या प्रवासाने आज अनेकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे, आणि आज ही ते त्याच आपुलकीने, अभिमानाने, आणि जिद्दीने पुढे चालत आहेत.समाजासाठी, आपल्या माणसांसाठी.
विनायक महाजन यांचे संपूर्ण कुटुंब राजकारण क्षेत्राशी निगडीत आहे. त्यांचे भाऊ पवन महाजन, कन्हैया महाजन आणि किरण महाजन हे तिघे ही राजकारणात सक्रिय असून, त्यांच्या कार्यात त्यांचे काका श्री. देविदास महाजन माजी उपनराध्यक्ष यांचे मार्गदर्शन अत्यंत मोलाचे ठरले आहे.
विनायक महाजन यांचे लहान सासरे, स्वर्गीय श्री. राजेंद्र किसन महाजन, हे शिवसेनेचे शहरप्रमुख म्हणून कार्यरत होते. त्यांनी मिळवलेल्या प्रतिष्ठेचा आणि नावाचा विनायक महाजन यांनी कधीही गैरवापर केलेला नाही. उलट, त्या नावाचा सन्मान राखत आणि त्यांच्या कार्यशैलीतून प्रेरणा घेत, विनायकभाऊंनी आपली स्वतंत्र राजकीय ओळख निर्माण केली आहे.
©दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा