वाकटुकी येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांना ओळखपत्रांचे वाटप


वाकटुकी येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांना ओळखपत्रांचे वाटप

दिनांक १५ ऑगस्ट २०२५, शुक्रवार रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वाकटुकी (ता. धरणगाव, जि. जळगाव) येथे स्वातंत्र्य दिनाचा राष्ट्रीय सण अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, सरपंच, उपसरपंच, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, बचत गटातील महिलावर्ग, ज्येष्ठ नागरिक, माता-भगिनी, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ग्रामपंचायत समोरील ध्वजारोहण श्री. हिलाल अर्जुन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, तर शाळेसमोरील ध्वजारोहण शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. गोपाल एकनाथ पाटील यांच्या हस्ते पार पडले. यानंतर पोलीस पाटील श्री. भिका पोपट पाटील यांनी श्रीफळ अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशभक्तिपर भाषणं व सांस्कृतिक नृत्य सादर केली. यावेळी दरवर्षीप्रमाणे श्री. श्रीकृष्ण माधवराव पाटील यांच्यावतीने "आदर्श विद्यार्थी" पुरस्कारासाठी रु. १०००/- रोख रक्कम प्रदान करण्यात आली. ही रक्कम कु. सुनील शांतीराम बारेला व कु. आवणी पंडित भिलाणे या दोन विद्यार्थ्यांमध्ये विभागून देण्यात आली.

विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, गावचे पोलीस पाटील श्री. भिका पोपट पाटील यांनी दातृत्व दाखवत, स्वतःच्या खर्चाने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना व शिक्षकांना उच्च दर्जाची विद्यार्थी ओळखपत्रे (I-Card) भेट दिली. तसेच श्री. ज्ञानेश्वर रामदास पाटील यांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना व शिक्षकांना उत्कृष्ट दर्जाच्या पेनचे वाटप करण्यात आले.

ग्रामपंचायतीकडून विद्यार्थ्यांच्या भाषणासाठी प्रत्येकाला रु. १०० या प्रमाणात एकूण रु. ८००/- ची पारितोषिके वितरित करण्यात आली. याशिवाय गावातील अनेक ज्येष्ठ नागरिकांनीही विविध बक्षिसे देऊन विद्यार्थ्यांचा सन्मान केला, व ही बक्षिसे सर्वांना समप्रमाणात वाटप करण्यात आली.

शेवटी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या शाळेचे मुख्याध्यापक श्री. संभाजी बिराजदार यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानत, “गावकऱ्यांचे शाळेविषयीचे प्रेम असेच कायम राहावे व आपल्या गावातील विद्यार्थी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर गावाचे नाव उज्वल करतील,” अशी भावना व्यक्त केली. आभारप्रदर्शन सौ. रामेश्वरी बडगुजर यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !