एका शिक्षकाचा प्रेरणादायी प्रवास डॉ. विजय शास्त्री...!
एका शिक्षकाचा प्रेरणादायी प्रवास डॉ. विजय शास्त्री...!
आजच्या या खास दिवशी, डॉ. विजय शास्त्री यांचे जीवन आणि कार्य मनाच्या कोपऱ्यातून उलगडून पाहताना एकच भावना येते. आदर, प्रेरणा आणि कृतज्ञता. फार्मसी शिक्षण क्षेत्रात त्यांनी जे योगदान दिले आहे, ते केवळ एक शिक्षक म्हणून नाही तर एक मार्गदर्शक, आदर्श आणि प्रेरणास्त्रोत म्हणून ही अतुलनीय आहे.
१९९३ मध्ये बी. फार्मसीपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास, १९९५ मध्ये एम. फार्मसी पर्यंत पोहोचला, पण त्यांचा शिकण्याचा, शिकवण्याचा आणि समाजसेवेचा उत्साह कधीही कमी झाला नाही. विविध फार्मसी महाविद्यालयांमध्ये सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापक, पीजी गाईड आणि पीएचडी गाईड म्हणून त्यांनी निपुणतेने जबाबदाऱ्या पार पाडल्या. युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन (UGC) आणि इतर मान्यताप्राप्त संस्थांकडून त्यांना मान्यता मिळणे हे त्यांची कष्ट आणि गुणवत्ता याचे प्रमाणपत्र आहे.
फार्मसीशिवाय त्यांनी सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातही असामान्य कार्य केले आहे. PCI, MSBTE, DBATU, KBCNMU यांसारख्या महत्त्वाच्या संस्थांमध्ये इन्स्पेक्टर म्हणून त्यांनी पारदर्शकता आणि प्रामाणिकपणा राखला. त्यांनी जळगावमध्ये ‘रोटरी युफोरिया IFRM’ या सामाजिक संस्थेची स्थापना करून संगीताची साधना सुरू केलेली आहे. आणि त्या चॅरिटी मधून जमा राशी ते गरजू लोकांना मदत म्हणून देतात. मग त्यात अंध कलाकारांना संगीत साहित्य उपलब्ध करुन देणे असो किंवा तरुणांसाठी संगीत स्पर्धा आयोजित करणे यासारखे असंख्य सामाजिक कार्य ते करीत असतात.
संगीताच्या क्षेत्रात त्यांनी जे यश संपादन केले, ते त्यांच्या बहुमुखी प्रतिभेचा साक्षीदार आहे. राज्यस्तरीय रोटरी सुपरस्टार स्पर्धा दोन वर्षे सलग जिंकून, तिसऱ्या वर्षी आपले नाव इतर स्पर्धकांसाठी बाजूला ठेवणे म्हणजेच त्यांचा खरा स्नेह आणि दिलदारपणा. मल्हार संगीत प्रतिष्ठानची स्थापना त्यांच्या साथीदारांसह करून त्यांनी संगीत प्रेमींसाठी नवा प्रेरणास्त्रोत निर्माण केला.
त्यांचा आवाज म्हणजे किशोर कुमारांच्या आवाजाचा एक अद्भुत ठेवा आहे. जेव्हा ते बोलतात किंवा गातात, तेव्हा जणू किशोरच पुन्हा एकदा आपल्या सुरांनी जीवंत होतो. त्यांच्या आवाजात तोच गोडसरपणा, तोच भाव, आणि त्याचं मखमली सारखं स्पर्श असतो, ज्यामुळे लोकं त्यांना ‘व्हॉईस ऑफ किशोर’ म्हणून ओळखतात.
ही ओळख ही केवळ एक नाव नाही, तर एक भावना आहे, एक आठवण आहे ज्यात किशोरच्या संगीताने दिलेला जादू अजूनही जीवंत आहे. त्यांच्या आवाजातून जेव्हा तो किशोर कुमारांचा मोलक आवाज उमटतो, तेव्हा प्रत्येक शब्द, प्रत्येक सूर मनाला खोलवर भिडतो.
लोकांच्या हृदयात त्यांचा आवाज किशोरसारखा असल्याने, त्यांना ‘व्हॉईस ऑफ किशोर’ म्हणणं ही एक वेगळीच सन्मानाची आणि प्रेमाची ओळख आहे, जी त्यांच्या आवाजाला आणि त्याच्या प्रेमाला पुढे नेते.
२०१८ मध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळावे यासाठी एरंडोल येथे शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीची स्थापना करणे हे त्यांच्या सामाजिक जबाबदाऱ्यांचे उत्तम उदाहरण आहे. महाविद्यालयाला महाराष्ट्र शासन, MSBTE कडून चौथ्यांदा सर्वोत्तम मानांकन मिळणे हे त्यांच्या कष्टाचे आणि नेतृत्वाचे फलित आहे.
डॉ. विजय शास्त्री म्हणजे फक्त एक शिक्षक नाही, तर एक दिलदार माणूस आहे जो आपले ज्ञान, अनुभव आणि प्रेम वाटून देण्यात खूप आस्तित्वाने विश्वास ठेवतो. ज्या प्रत्येक विद्यार्थ्याला त्यांची साथ मिळाली, तो नक्कीच आयुष्यात एक अमूल्य भेट मानतो. त्यांच्या जीवनातली साधेपणा, प्रामाणिकपणा आणि समाजसेवा करण्याची निष्ठा प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे.
आज त्यांचा वाढदिवस आहे आणि हा दिवस आपण सगळे त्यांना मनापासून धन्यवाद म्हणण्याचा आहे. त्यांच्या आशीर्वादाने आणि मार्गदर्शनानेच अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य उजळले आहे, अनेक युवकांना जीवनातील योग्य वाट सापडली आहे.
डॉ. विजय शास्त्री, तुमच्या आयुष्यातील हा नवीन वर्ष आपल्यासाठी आरोग्यदायी, आनंदी आणि यशस्वी ठरावा, अशी मनःपूर्वक शुभेच्छा! तुमच्या दिलदार मनाने आणि सेवाभावाने आपण नेहमीच समाजात दीपस्तंभ राहाल.
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा