"स्वस्थ नारी, सशक्त परिवार" – शिरसोलीत आरोग्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल


"स्वस्थ नारी, सशक्त परिवार" – शिरसोलीत आरोग्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल

दि. 17 सप्टेंबर 2025 रोजी, प्राथमिक आरोग्य केंद्र म्हसावद अंतर्गत उपकेंद्र शिरसोली येथे एक अविस्मरणीय व सामाजिक भान जागवणारे आरोग्य तपासणी शिबीर संपन्न झाले. मा. जिल्हाधिकारी साहेब, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम, मा. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर सरतालुका आरोग्य अधिकारी डॉ. पांढरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित हे शिबीर केवळ एक तपासणी मोहीम नसून, आरोग्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल होते.

"स्वस्थ नारी – सशक्त परिवार" या अभियानाअंतर्गत, तसेच TB मुक्त भारत, किशोरी स्वास्थ्य सेवा यांसारख्या महत्त्वाच्या विषयांना केंद्रस्थानी ठेवून या शिबिराचे आयोजन करण्यात आले. आरोग्याची खरी गरज ओळखून, गावातील तब्बल 27 गरोदर महिलांची तपासणी करण्यात आली. त्यांच्या आरोग्याच्या प्रत्येक बारकाव्यांची काळजीपूर्वक नोंद घेतली गेली. या सोबतच एकूण 280 नागरिकांची तपासणी विविध आजारांसाठी करण्यात आली.

या तपासणीमध्ये BP, डायबेटीस, डोळ्यांची तपासणी, मोतीबिंदू, सशयित क्षयरोग, तसेच लहान बाळांचे लसीकरण यासारख्या अत्यावश्यक तपासण्या करण्यात आल्या. केवळ तपासणी न करता, उपस्थित नागरिकांना किरकोळ आजार, आरोग्य शिक्षणप्रतिबंधात्मक उपाययोजना यांची माहिती ही देण्यात आली. आरोग्या बद्दल जागरूकता निर्माण करणारे हे शिबीर हे गावासाठी एक मोठे योगदान होते.

या शिबिरात मा. सरपंच साहेब, गावातील प्रतिष्ठित नागरिक, तसेच प्रा.आ. केंद्र म्हसावद येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रणव सर, डॉ. करिष्मा जैन, डॉ. प्रशांत इंगळे, डॉ. करुणा भालेराव, डॉ. फेगडे मॅडम, डॉ. सलीम पिंजारी, तसेच वाघोदे सिस्टर, श्री प्रवीण भोळे, श्री गजानन ग्यार, सर्व आशा वर्कर, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आणि महिला बचतगट यांनी आपले मोलाचे सहकार्य लाभवले.

या एकत्रित प्रयत्नांतून आरोग्याच्या दिशेने गावाने एकजूट दाखवली. गावकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहून असे जाणवले की, ग्रामीण आरोग्य हे केवळ वैद्यकीय सेवेपुरते मर्यादित नाही, तर त्यामध्ये मानवी स्पर्श, सहकार्य, आणि सामाजिक जाणीव यांचा ही मोठा वाटा असतो.

या शिबिराने केवळ शिरसोली गावातील आरोग्य तपासले नाही, तर एक स्वस्थ, सशक्त आणि जागरूक समाजनिर्मितीचा पाया घातला.

गावासाठी, समाजासाठी आणि आपल्या भावी पिढीसाठी ही एक सुरुवात आहे. स्वस्थतेच्या वाटेवरचा पहिला आत्मविश्वासू पाऊल!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !