चवदार नमकीन चव, परंपरा आणि नात्यांचा संगम...!
चवदार नमकीन चव, परंपरा आणि नात्यांचा संगम...!
एरंडोल नगरीत एक नवा दिवस उगवतो आहे. तो फक्त व्यवसायाच्या वाढीचा नाही, तर एका स्वप्नाच्या साकारतेचा, एका परंपरेच्या पुनर्जन्माचा आणि एका कुटुंबाच्या अथक श्रमांना मिळालेल्या मान्यतेचा. ‘चवदार नमकीन’ या नावामागे केवळ खमंग चव नाही, तर वर्षानुवर्षे जपलेली संस्कृती, नात्यांची ऊब आणि घरगुती सुगंधाचा अमोल ठेवा दडलेला आहे.
राजू भाऊ साळी यांनी आपल्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मेहनतीला देव मानत, चवेला प्रतिष्ठा दिली. घरच्या हातची चव ही फक्त एक कृती नाही, ती एक भावना आहे. जी मायेच्या घासासारखी असते. ती चव केवळ जिभेवर नाही, तर काळजात घर करते. त्या चवेतून आज त्यांच्या स्वप्नाला नवीन रूप दिलं जातंय जिथे जुन्या रेसिपीला नव्या पॅकेजिंगची जोड आहे, आणि मातीच्या ओलाव्याला आधुनिकतेची सजावट लाभते आहे.
ही वाटचाल काही सोपी नव्हती. यात अनेक रात्रींचं जागरण आहे, कधी संपूर्ण दिवसभराचा घाम आहे, आणि कुठेतरी मनात खोलवर रुजलेला एक विश्वास आहे.की प्रामाणिकपणानं केलेली कोणतीही गोष्ट कधीच वाया जात नाही. राजू भाऊंच्या नेतृत्वाखाली संपूर्ण साळी कुटुंबाने या व्यवसायात मन, शरीर आणि आत्मा गुंतवला आहे. एकत्र येऊन स्वप्नाला हात घालणं, हेच त्यांच्या यशाचं खरं गमक आहे.
या सगळ्या प्रवासाला आध्यात्मिक आधार देत, शनिवार, दिनांक २७ सप्टेंबर २०२५ रोजी, आश्विन शुद्ध पंचमी या अत्यंत मंगल मुहूर्तावर, सत्यनारायणाच्या पूजेनं एक नवा अध्याय सुरू होतो आहे. ही पूजा केवळ विधी नाही, तर त्या श्रद्धेचं प्रतीक आहे, जी या व्यवसायामागे सतत जागती राहिली. आणि हे उद्घाटन घडत आहे त्या पावन हातानी आई-वडिलांच्या ज्यांनी आयुष्यभर प्रेम, आशीर्वाद आणि संस्कारांची श्रीमंती आपल्या पोरात भरली.
‘चवदार नमकीन’ ही केवळ एक खाद्यपदार्थांची शृंखला नाही, ती आहे कुटुंबाच्या प्रेमाने, श्रद्धेने आणि मेहनतीने घडवलेली कहाणी. प्रत्येक पॅकेटमागे एक संघर्ष आहे, प्रत्येक चवेमागे एक आठवण आहे, आणि प्रत्येक यशामागे एक कुटुंबाची एकजूट आहे.
राजूभाऊ साळी यांनी फक्त व्यवसाय उभा केला नाही, त्यांनी चवेला, परंपरेला आणि नात्यांना एकत्र बांधून त्यातून एक जीवंत अनुभव निर्माण केला आहे. जो प्रत्येक घासात, प्रत्येक सुगंधात आणि प्रत्येक आठवणीत उमटतो.
ही सुरुवात आहे एका चविष्ट परंपरेच्या नव्या पर्वाची जिचं मूळ आहे.आपल्या मातीमध्ये, आणि भविष्य उजळणार आहे आपल्या मेहनतीच्या प्रकाशात.
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा