जनतेचा भोलाभाऊ महाले......!
जनतेचा भोलाभाऊ महाले......!
एरंडोलच्या पवित्र मातीत अनेक रत्नं दडलेली आहेत. त्यापैकीच एक तेजस्वी रत्न म्हणजे भोलानाथ नामदेवराव महाले सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेले, परंतु असामान्य विचार आणि दूरदृष्टी असलेले एक जनतेचे खरे नेतृत्व!
घरची परिस्थिती साधी असली तरी त्यांचे मन विशाल आणि ध्येय उंच आहे. लहानपणापासूनच संघर्ष हा त्यांच्या जीवनाचा सोबती राहिला. मात्र त्या संघर्षातून त्यांनी एकच ध्यास घेतला.
“आपल्या एरंडोलसाठी काहीतरी करून दाखवायचं!”
गरिबीतून उभं राहून, प्रामाणिकपणाच्या आणि कष्टाच्या जोरावर त्यांनी आपली ओळख निर्माण केली. आज ते एरंडोलवासीयांच्या प्रेमाने आणि विश्वासाने अधिक बळकट झाले आहेत.
भोलाभाऊंनी कधीच स्वतःसाठी नाही, तर इतरांसाठी जगायचं ठरवलं. गरिबाचा हात धरायचा, दुःखात असणाऱ्याला आधार द्यायचा आणि प्रत्येकाच्या डोळ्यात आशेची ज्योत पेटवायची. हेच त्यांचं जीवनधर्म बनलं आहे.
त्यांना पदाचा मोह नाही, कारण त्यांच्याकडे मनं जिंकण्याची ताकद आहे. म्हणूनच आज जेव्हा ते एरंडोलच्या रस्त्यावरून चालतात, तेव्हा लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण एकच म्हणतात.
“हा आहे आपला भोला भाऊ!”
तरुणांसाठी ते केवळ मित्र नाहीत, तर प्रेरणास्थान आहेत.त्यांच्या आरोळीला “भोला भाऊ!” म्हणून युवकांच्या गर्दीतून उमटणारा “होकारा!” हा जनतेच्या विश्वासाचा, प्रेमाचा आणि आशेचा गजर असतो.
भोलानाथ महाले नेहमी म्हणतात.
“माझं ध्येय सत्तेचं नाही, सेवेतून समाज घडवण्याचं आहे.”
त्यांचं नाव म्हणजे प्रामाणिकपणा, मेहनत आणि लोकसंग्रह यांचं प्रतीक.धर्म, जाती, पंथ यांचा भेद न करता सर्वांना सोबत घेऊन चालणारे हे तरुण नेतेच एरंडोलला विकासाच्या नव्या वाटेवर नेऊ शकतात.
आज ते एरंडोल नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी जाहीर करण्याच्या उंबरठ्यावर उभे आहेत. मात्र त्यांच्या मनात एकच भावना आहे .
“ही निवडणूक माझ्यासाठी नाही, तर माझ्या एरंडोलच्या जनतेसाठी आहे.”
मा. भोलाभाऊंच्या डोळ्यांत एरंडोलच्या उज्ज्वल भविष्यातील स्वप्न आहे,
त्यांच्या मनात सर्वांच्या प्रगतीची आकांक्षा आहे,
आणि त्यांच्या हृदयात जनतेवरील अपार प्रेमाची भावना आहे.
भविष्यातील नगराध्यक्ष म्हणून ते केवळ दावेदार नाहीत,
तर एरंडोलच्या जनतेच्या हृदयावर राज्य करणारे खरे जनतेचे मित्र आहेत!
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा