डॉ. म.सु.पगारे यांच्या सुवर्ण महोत्सवी पुस्तक सोहळा निमित्ताने परियत्ती या ग्रंथाचे भिक्खू ज्ञानज्योती महाथेरो यांच्या हस्ते प्रकाशन


डॉ. म.सु.पगारे यांच्या सुवर्ण महोत्सवी पुस्तक सोहळा निमित्ताने परियत्ती या ग्रंथाचे भिक्खू ज्ञानज्योती  महाथेरो यांच्या हस्ते प्रकाशन 

डॉ.म.सु.पगारे यांच्या सुवर्ण महोत्सवी पुस्तक सोहळ्याच्या निमित्ताने एकूण 50 पुस्तकांचे जे निर्माण कार्य झालेले आहे त्यानिमित्ताने ग्रंथ प्रकाशन सोहळा करण्यात आलेला आहे. यानिमित्ताने
परियत्ती पटीपत्ती आणि पटीवेधन या तीन संकल्पना बुद्ध धम्मामध्ये ज्ञान संवर्धक म्हणून अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात. त्यामध्ये परियत्ती या संकल्पनेच्या निमित्ताने  सूक्ष्मपणाने ज्ञान ग्रहण करणे व सत्याच्या आधारावरती तपासलेले हे ज्ञान आचरणामध्ये आणून त्याला विकसित करण्याची प्रक्रिया करणे याला अत्यंत महत्त्व आहे त्यामुळे प्रज्ञाच्या वाटचालीसाठी परियत्तीची अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका आपल्या लक्षात येते.

 या ग्रंथाच्या माध्यमातून बुद्ध धम्माच्या अभ्यासकांना चांगल्या पद्धतीने आचरणातील अभ्यास करता यावा यासाठी  सुप्रसिद्ध लेखक, मानवतावादी विचारवंत डॉ.म.सू.पगारे यांचा परियत्ती हा ग्रंथ सिद्ध झालेला आहे.  या ग्रंथाचे प्रकाशन ताडोबा अभयारण्यामध्ये वाघ चित्ता सर्प अशा प्राण्यांसोबत मंगलमैत्रीने राहाणारे धुतांगधारी भिक्खू ज्ञानज्योती महाथेरो यांच्या हस्ते  झालेले आहे त्यांच्यासोबत अध्यक्षस्थानी बडा भंते म्हणून आदराने सिनिअर भिकू आनंद भंते यांचा आदरानेउल्लेख केला जातो ते अध्यक्षस्थानी होते.तसेच भिक्खूसंघ देखील या प्रकाशन सोहळ्यामध्ये सहभागी झालेला होता 

परियत्ती या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने भिक्खू ज्ञानज्योती महाथेरो म्हणाले की शुद्धी ही अत्यंत महत्त्व महत्त्वाची आहे. शीलशुद्धीच्या माध्यमातून एकाग्रता समाधी आणि ज्ञानसंवर्धन हे अत्यंत महत्त्वाचे ठरते. तथागत भगवान बुद्धांनी जे लोकोत्तर ज्ञानाचे संशोधन अडीच हजार वर्षांपूर्वी केलेले आहे, त्या अनुषंगाने थोड्या थोड्या प्रमाणात अलीकडे  वैज्ञानिक संशोधन करताना दिसत आहेत. परंतु लोकोत्तर ज्ञानाचे संशोधन अजून पर्यंत देखील वैज्ञानिकांना करता येत नाही. परियत्ती या ग्रंथामधील कलाप ही संकल्पना लोकोत्तर ज्ञानाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची आहे.डॉ.म.सु. पगारे यांनी या ग्रंथांमध्ये बुद्ध धम्म अतिशय सूक्ष्म पद्धतीने समजावून सांगण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केलेले आहे.

 यावेळी अध्यक्षपदावरून विवेचन करताना एन आनंद महाथेरो यांनी सांगितले की परियत्ती हा ग्रंथ अत्यंत महत्त्वाचा असून बुद्ध धम्मा मधील धम्म समजून घेण्याची ही अत्यंत महत्त्वपूर्ण प्रक्रिया मानता येईल. त्या अनुषंगाने डॉ. म.सु. पगारे यांनी केलेले हे लेखन जे आहे ते सर्वच अभ्यासकांनी बारकाईने वाचणे आणि आचरणात आणणे गरजेचे आहे अन्यथा आचरणात न आणलेले आणि समजून न घेतलेले लेखन हे विकसित करणारे कसे ठरू शकेल बुद्ध आणि त्यांचा धम्म हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला जो ग्रंथ आहे त्या ग्रंथातील असणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टी यादेखील वाचून सूक्ष्म पद्धतीने करून आचरणात आणल्या पाहिजेत. त्यातील काही प्रमाणातल्या असणाऱ्या धम्माच्या समजून घेणाऱ्या अर्थच्छटा या ग्रंथामध्ये देखील आहेत. त्यामुळे अतिशय महत्त्वपूर्ण लेखन केलेला हा ग्रंथ डॉक्टर मसु पगारे यांनी जो सिद्ध केलेला आहे तो चांगल्या पद्धतीने समजून घेऊन आपल्या आचरणामध्ये आणण्याचा प्रयत्न केला तर तो अधिक लाभदायी आणि फलदायी होणारा ठरतो 

यावेळी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनेक भिक्खूगण आणि उपासक-उपासिका  उपस्थित होते. ताडोबा अभयारण्यातील धम्मचेती भंते जळगाव येथील धम्मदर्शी भंते तसेच भागवत सपकाळे चेतन नन्नवरे दीपंकर पगारे कैलास पाटील अशा अनेक अभ्यासू उपासकांची उपस्थिती या कार्यक्रम प्रसंगी आणि यशस्वीतेसाठी लाभलेली होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !