आपलं आयुष्य आपल्या पद्धतीने जगा…..!


आपलं आयुष्य आपल्या पद्धतीने जगा…..!

आयुष्य म्हणजे एक प्रवास…कधी आनंदाचा, कधी अश्रूंचा, कधी यशाचा, तर कधी पराभवाचा.पण एक गोष्ट कायम खरी असते. कोणाचाच प्रवास सोपा नसतो.
आपण एखाद्याला सुखात पाहतो, हसताना पाहतो, आणि वाटतं. “काय नशिबवान आहे ना तो!”पण त्या हसऱ्या चेहऱ्यामागे किती संघर्ष, किती अश्रू, किती अपूर्ण स्वप्नं लपलेली आहेत, हे कुणाला माहीत नसतं.

म्हणूनच सांगावसं वाटतं.कधीच कोणाच्या आयुष्याची स्वतःशी तुलना करू नका.कारण प्रत्येकाचा रस्ता वेगळा, वेदना वेगळ्या, आणि शिकवण वेगळी असते.
ज्याला ठेच लागते, त्यालाच त्याच्या वेदना माहीत असतात.आपण फक्त त्यांचं यश पाहतो, पण त्यांनी झेललेली वादळं नाही पाहत.

लोक काय म्हणतील, कोणाचं आयुष्य कसं आहे.हे विचारण्यात आयुष्य वाया घालवू नका.आपलं आयुष्य आपल्या पद्धतीने जगा.कारण शेवटी जगायचं तुम्हालाच आहे, आणि उत्तर द्यायचंही तुम्हालाच.लोकांसारखं जगलात तर कदाचित सगळं ‘बरोबर’ वाटेल, पण मन कधीच शांत होणार नाही.स्वतःच्या मनासारखं जगलात, तर कदाचित जग चुकीचं म्हणेल, पण मन मात्र खुश राहील.

जे नशिबात आहे, त्यात समाधान शोधा.कारण नशिब कधीच चुकीचं देत नाही. ते फक्त योग्य वेळी देतं.कधी काही गोष्टी मिळत नाहीत म्हणून दुःख होतं, पण वेळ गेल्यावर लक्षात येतं की, त्या न मिळालेल्या गोष्टीच आपल्या भल्यासाठी होत्या.

आयुष्य सुंदर आहे, फक्त त्याकडे पाहायचा दृष्टिकोन सुंदर असावा.तुमच्याकडे जे आहे, त्यात सुख शोधा.
लहान आनंदांचा आदर करा.कारण समाधानातच खरा आनंद लपलेला आहे.

म्हणूनच…तुलना नको, तक्रार नको.आपलं आयुष्य आपल्या मनाप्रमाणे, आपल्या पद्धतीने जगा.
आणि मग बघा…जीवन खरोखर किती सुंदर आहे, हे मनापासून जाणवेल. 

© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !