गाईच्या पाच लिटरचा पैशांतून दिसलेली माणुसकी...!
गाईच्या पाच लिटरचा पैशांतून दिसलेली माणुसकी...!
आजच्या धावपळीच्या आणि स्वार्थी जगात जिथे माणुसकी, इमानदारी आणि विश्वास हळूहळू कमी होत चालला आहे, तिथे काही व्यक्ती अशा असतात की त्यांच्या वागण्यातून माणुसकी अजून जिवंत आहे याची खात्री पटते. बिलखेडे येथील सचिनभाऊ पाटील हे असेच एक प्रामाणिक, दिलदार आणि विश्वासू व्यक्तिमत्त्व आहे.
बिलखेडे परिसरातील लोकांचे दूध संकलन करून ते जळगाव येथील विकास दूध डेअरी येथे नियमितपणे पोहोचवण्याचे काम सचिनभाऊ अतिशय जबाबदारीने करतात. हे काम करताना केवळ व्यवसाय म्हणून नाही, तर प्रत्येक शेतकरी, प्रत्येक दूध उत्पादक हा आपलाच माणूस आहे या भावनेने ते काम करतात.
एका साध्या पण खूप मोठा अर्थ असलेल्या घटनेने त्यांच्या इमानदारीचा खरा चेहरा समोर आला. एका दिवसाचे गाईचे पाच लिटर दूधाचे पैसे मला मिळायचे होते. कोणतीही आठवण करून न देता, कोणताही आग्रह नसताना, सचिनभाऊंनी स्वतःहून फोन पे द्वारे ते पैसे मला घरपोच पाठवले. आजच्या काळात जिथे आपले हक्काचे पैसे मिळवण्यासाठीही मागण्या कराव्या लागतात, तिथे असा प्रामाणिक माणूस भेटणे हे खरंच भाग्याचे आहे.
ही केवळ पैशांची बाब नव्हती, तर ती विश्वासाची, नात्यांची आणि माणुसकीची जाणीव करून देणारी गोष्ट होती. “आपले नाही ते घेऊ नये आणि आपले आहे ते वेळेवर द्यावे” हा संस्कार सचिनभाऊंच्या प्रत्येक कृतीतून दिसून येतो.
सचिनभाऊ पाटील हे फक्त दूध संकलक नाहीत, तर ते शेतकरी आणि डेअरी यांच्यातील विश्वासाचा मजबूत दुवा आहेत. त्यांची इमानदारी, प्रामाणिकपणा आणि दिलदारपणा आजच्या पिढीसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.अशा व्यक्तींमुळेच समाजात अजूनही चांगुलपणा, विश्वास आणि माणुसकी टिकून आहे. सचिनभाऊ पाटील यांना मनापासून सलाम…तुमच्यासारख्या इमानदार माणसांमुळेच जग अजून सुंदर वाटते.
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा