अमोलदादा जनतेच्या हृदयात रुजलेले नेतृत्व....!
अमोलदादा जनतेच्या हृदयात रुजलेले नेतृत्व....!
एरंडोल पारोळा भडगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार
आदरणीय श्री. अमोल चिमणरावजी पाटील
नवतरुण, तडफदार आणि ऊर्जेने ओथंबलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे आमदार श्री.अमोलजी चिमणराव पाटील.
राजकारणाकडे त्यांनी कधीही केवळ सत्तेचे साधन म्हणून पाहिले नाही; ते त्यांनी समाजसेवेची साधना मानली. माणूस म्हणून ते जितके दिलदार, आपुलकीचे आणि माणुसकी जपणारे आहेत, तितकेच नेतृत्व म्हणून ठाम, विचारशील, दूरदृष्टी असणारे आणि लोकाभिमुख आहेत. सर्वांवर जीवापाड प्रेम करणारा स्वभाव आणि प्रत्येकाशी आपलेपणाने वागण्याची वृत्ती हीच त्यांची खरी ओळख आहे.
मोठ्या समाजसेवेचा ध्यास मनाशी बाळगून त्यांनी गावोगावी फिरत जनतेचा सखोल अभ्यास केला. प्रत्येक घर, प्रत्येक प्रश्न, प्रत्येक वेदना त्यांनी मनापासून समजून घेतली. लोकांच्या अडचणींना स्वतःच्या मानणारा हा नेता आज जनतेच्या आशेचा किरण ठरला आहे.
आबासाहेबांच्या विचारांचे मार्गदर्शन सदैव डोळ्यांसमोर ठेवत, अमोलदादांनी विकासाच्या वाटेवर सातत्याने आणि निर्धाराने चालण्याचा संकल्प केला आहे. म्हणूनच त्यांच्या पाठीशी केवळ एखादा पक्ष नाही, तर संपूर्ण जनता निखळ विश्वासाने उभी आहे.हा विश्वास शब्दांत व्यक्त करता येणार नाही, तो अनुभवांतून घडलेला आहे.
इतिहासाच्या धगधगत्या निखाऱ्यावरून चालताना त्यांनी कधीही सत्याची आणि प्रामाणिकपणाची वाट सोडली नाही. असंख्य विकासकामांची यादी असून ही प्रत्येक कामाकडे त्यांनी आपुलकीने, जबाबदारीने आणि स्वतःचेच समजून लक्ष दिले. उगवत्या सूर्याप्रमाणे तेजस्वी विचार, गरुडा सारखी आकाशाला गवसणी घालणारी झेप आणि धनुष्याच्या बाणा सारखी अचूक दिशा अमोलदादांना विकास स्पष्टपणे दिसतो. त्यांचा दृष्टिकोन दूरगामी आहे आणि त्यांची कृती नेहमीच जमिनीवर उतरणारी आहे.
रात्रीला ही पहाट करणारा, समाजासाठी सदैव धावून येणारा हा नेता तरुण वाघासारखा खंबीर आहे. संकटाच्या क्षणी मागे न हटता पुढे येणारा, लोकांच्या दुःखात स्वतःला सामावून घेणारा असा हा नेता खऱ्या अर्थाने लोकांचा आहे. लोकांच्या मनावर प्रेम करणारा, सर्वांना आपलंसं मानणारा हा हक्काचा आमदार प्रत्येकाच्या मनामध्ये खोलवर रुजलेला आहे. म्हणूनच “अमोलदादा” हे केवळ एक नाव नाही, तर एरंडोल पारोळा तालुक्याच्या जनतेच्या मनातील एक जिवंत भावना आहे.
त्यांच्या शब्दांत विश्वास आहे आणि कृतीत समाधान आहे. प्रत्येक कामासाठी तत्पर असणारे, विकासाची तोफ ठरणारे, कार्यकुशल, कृतिशील, विचारवंत, गुणवंत आणि नामवंत असे आदरणीय आमदार श्री. अमोलजी चिमणराव पाटील हे केवळ तालुक्याचेच नव्हे, तर महाराष्ट्राच्या राजकारणाचे उज्ज्वल भविष्य आहेत.
वाढदिवसाच्या या भगवामय, मंगल आणि पावन प्रसंगी, त्यांच्या हातून समाजाच्या असंख्य इच्छा पूर्ण व्हाव्यात, हीच मनापासून प्रार्थना. त्यांना दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य, अपार यश, समाधान आणि जनतेचे अखंड प्रेम लाभो. जनसेवेची प्रेरणा अखंड राहो आणि त्यांचा हा लोकाभिमुख प्रवास अधिकाधिक तेजस्वी होत जावो याच मनःपूर्वक शुभेच्छा....!
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा