डोक्यावर बर्फ, तोंडात साखर आणि मनात माणुसकी...!
डोक्यावर बर्फ, तोंडात साखर आणि मनात माणुसकी...!
काही व्यक्ती पदामुळे मोठ्या होत नाहीत, तर त्यांच्या विचारांमुळे, वागणुकीमुळे आणि कामाच्या पद्धतीमुळे त्या आपोआप उंचावतात. आदरणीय सारंग जैन सर हे अशाच व्यक्तिमत्त्वाचं जिवंत आणि सुंदर उदाहरण आहेत. शांतता आणि कुशाग्र बुद्धी यांचा दुर्मिळ संगम म्हणजे सर. नेहमी डोक्यावर बर्फ ठेवून निर्णय घेण्याची समज, तोंडात साखर ठेवून संवाद साधण्याची कला आणि मनात माणुसकी जपण्याची संवेदनशीलता हे सगळं त्यांच्या व्यक्तिमत्त्वात सहजपणे नांदताना दिसतं.फाइल असो वा फंडाचा हिशोब, प्रत्येक कामात स्पष्टता, काटेकोरपणा आणि विश्वासार्हता दिसते.
आकड्यांमागे केवळ गणित नसतं, तर त्यामागे जबाबदारी, प्रामाणिकपणा आणि दूरदृष्टी असते.हे सरांच्या कामातून नेहमी जाणवतं. बजेट कमी असो वा अपेक्षा प्रचंड, तक्रारींचा बोजा न वाढवता, हसत-हसत सगळं सांभाळण्याची ताकद फार थोड्या लोकांकडे असते, आणि सर त्यातलेच एक आहेत. अडचणींवर ताण न देता, उपायांमध्ये माणुसकी मिसळण्याची कला त्यांनी आत्मसात केली आहे.
धरणगाव ऑफिसचे सर्वेसर्वा असतानाही, सरांचा साधेपणा आणि आपुलकी कधीच बदललेली नाही. कुणालाही दडपण न देता काम करून घेणं, प्रत्येकाला विश्वासात घेणं आणि अडचणीच्या क्षणी आधार देणं हेच त्यांचं खरं नेतृत्व आहे. त्यांच्या “हो” मध्ये दिलासा असतो, तर “नाही” मध्येही स्पष्टता आणि ठोस तर्क असतो. त्यामुळे त्यांचे निर्णय केवळ मान्यच होत नाहीत, तर मनापासून स्वीकारले जातात.
कामाच्या व्यापातही माणसं विसरली जात नाहीत, याची जाणीव सर नेहमी ठेवतात. गडबडीतही कुणाच्या चेहऱ्यावरचं हास्य ओळखण्याची संवेदनशीलता, आणि गरज असेल तेव्हा खांद्यावर हात ठेवण्याची आपुलकी
हीच त्यांना वेगळं ठरवते. नेतृत्व म्हणजे फक्त आदेश देणं नव्हे, तर सगळ्यांना सोबत घेऊन चालणं, हे त्यांनी कृतीतून दाखवून दिलं आहे. म्हणूनच ते केवळ एक अधिकारी न राहता, अनेकांसाठी मार्गदर्शक, प्रेरणास्थान आणि विश्वासाचं नाव बनले आहेत.
शांततेचा गारवा, विचारांची धार आणि माणुसकीची ऊब हीच आदरणीय सारंग जैन सरांची खरी ओळख आहे. शांतपणे सगळं सांभाळत, योग्य वेळी योग्य निर्णय घेणं आणि वातावरणात सकारात्मकता टिकवून ठेवणं, ही त्यांची मोठी ताकद आहे.
आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त, अशा या हसतमुख, समंजस, तर्कशुद्ध आणि साखर-बर्फाचा सुंदर समतोल जपणाऱ्या व्यक्तिमत्त्वाला मनापासून शुभेच्छा. सरांचं आयुष्य असंच गोड, थंड डोक्याचं, आनंदाने आणि समाधानाने भरलेलं राहो. त्यांची सकारात्मक ऊर्जा, संयम आणि माणुसकी आम्हा सगळ्यांना कायम प्रेरणा देत राहो.हीच मनःपूर्वक सदिच्छा.
आदरणीय सारंग जैन सरांना वाढदिवसाच्या खुसखुशीत, हसतमुख आणि हृदयापासून हार्दिक शुभेच्छा!
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा