सुदामभाऊ महाजन – एक शांत, संयमी दीपस्तंभ...


 सुदामभाऊ महाजन – एक शांत, संयमी दीपस्तंभ... 

धरणगाव हे नाव जरी उच्चारलं, तरी काही निवडक, पण हृदयाशी जुळलेली माणसं आठवतात. त्या सन्माननीय व्यक्तींपैकी एक नाव म्हणजे सुदाम भाऊ महाजन.
आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने केवळ औपचारिक शुभेच्छा नव्हे, तर अंतःकरणातून येणारा आदर, सन्मान आणि कृतज्ञतेच्या भावनांनी मन भरून येतं.

त्यांचा शांत, संयमी स्वभाव, विचारपूर्वक कृती आणि प्रत्येक कामात असलेलं मन:पूर्वक समर्पण हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे खरे द्योतक आहे.आजच्या धावपळीच्या आणि स्वार्थाने व्यापलेल्या युगात, जिथे थोडंसे सामर्थ्य ही गर्वाच्या आवरणात झाकलं जातं, तिथे सुदाम भाऊंनी नम्रता, प्रामाणिकपणा आणि निःस्वार्थ वृत्ती यांचा उत्तम संगम साधत आपली जबाबदारी लीलया पार पाडली आहे.

धरणगाव येथील होमगार्ड कार्यालयाचे प्रमुख अधिकारी म्हणून त्यांनी शिस्त, जबाबदारी आणि सेवाभाव यांचं एक अनुकरणीय उदाहरण समाजासमोर ठेवले आहे.

त्यांचं व्यक्तिमत्त्व केवळ एका अधिकाऱ्याचं नव्हे, तर एक सुसंस्कृत माणूस, एक हितचिंतक, एक योग्य मार्गदर्शक आणि संकटात खंबीर आधार देणारा आधारस्तंभ अशी त्यांची ओळख आहे.
ते नेहमी लोकांच्या अडचणीत मोलाचा आधार ठरले. कधी सल्ल्याने, तर कधी प्रत्यक्ष कृतीने. पण त्यांच्या या मदतीमध्ये कधी ही गाजावाजा नसायचा; उलट न बोलता केलेली मदत हीच त्यांची खरी ओळख बनली आहे.

आज त्यांच्या वाढदिवशी धरणगाव शहरातील प्रत्येक मनाच्या गाभाऱ्यातून एकच भावना व्यक्त होते.
"आपल्यासारखी माणसं समाजात असणं हीच खरी आशा आहे...!"

सुदाम भाऊ, आपल्याला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा.आपल्या आयुष्यात उत्तम आरोग्य लाभो, यशाची सतत भरभराट होवो, आणि समाजसेवेची ही उजळ वाटचाल यापुढे ही अशीच अविरत सुरू राहो… हीच मन:पूर्वक प्रार्थना.

आपण आहात म्हणूनच समाजात अजून ही माणुसकीवरचा विश्वास टिकून आहे... वाढदिवसाच्या मनःपूर्वक, प्रेमपूर्वक शुभेच्छा! 

© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा 
 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !