“जनतेच्या मनातलं नाव – दादासाहेब करण पवार”

“जनतेच्या मनातलं नाव – दादासाहेब करण पवार”

एखाद्या माणसाचा चेहरा पाहिला, की त्याच्या मनाचं प्रतिबिंब उमजतं…एखादं व्यक्तिमत्त्व भेटलं, की त्यातून माणुसकीचा सुगंध दरवळतो…आणि एखाद्या नेत्यानं उभं राहिलं, की मागे अख्खी तरुणाई उभी राहते!

पारोळा नगरीत असंच एक नाव, ज्याच्या उच्चाराने जनतेच्या हृदयात आपुलकीचा स्पर्श होतो. ते म्हणजे दादासाहेब श्री. करण बाळासाहेब पवार. एक अनुभवी नेतृत्व, एक दिलदार व्यक्तिमत्त्व, आणि एक असा नेता ज्याचं अस्तित्व म्हणजे "कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास."

दादासाहेब पवार हे केवळ पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष नसून, ते आज ही जनतेच्या मनात नगराध्यक्षासारखे नाही तर कुटुंबातील मोठ्या भावासारखे जपले जातात. त्यांनी पद असो वा नसो, माणूसपण जपले आणि नेतृत्व म्हणजे अधिकार नाही तर जबाबदारी हे त्यांच्या प्रत्येक कृतीतून दाखवून दिलं.

त्यांचा स्वभाव अत्यंत संयमी, पण निर्णय मात्र नेहमी स्पष्ट आणि जनहितासाठी असतो. कित्येक तरुणांना त्यांनी दिशा दाखवली, अनेकांना संधी दिली आणि त्यांच्या खांद्यावर हात ठेवून पुढे चालण्याची हिंमत दिली.

त्यांची माणसांशी बांधिलकी ही केवळ राजकीय नात्यापुरती मर्यादित नाही, ती रक्तात भिनलेली आहे. कोणती ही मदतीची हाक असो आजारी रुग्ण असो, अडचणीतले विद्यार्थी असोत की एखाद्या गरजवंताचं घरकुल दादासाहेब नेहमी ‘मी आहे’ असं ठामपणे म्हणतात.

आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त, लाखो हृदयांतून एकच प्रार्थना निघते."दादासाहेबांचे आयुष्य हे आरोग्यदायी, आनंदमय आणि यशस्वीतेने भरलेलं असावं."

 दादासाहेब करण बाळासाहेब पवार यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!तुमचं नेतृत्व असंच तेजस्वी राहो,

© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा 
 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !