"दिलदार व्यक्तिमत्त्व – परेश भाऊ बिर्ला"

"दिलदार व्यक्तिमत्त्व – परेश भाऊ बिर्ला"

आजचा दिवस अत्यंत खास आहे... कारण आज जन्मदिवस आहे अशा व्यक्तिमत्त्वाचा, जो केवळ नावापुरता माणूस नाही, तर हजारो मनांतील एक सजीव प्रेरणा आहे.

परेश भाऊ बिर्ला हे नाव उच्चारलं तरी मनात आपुलकी, आदर आणि स्नेह यांचा उगम होतो. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात एक वेगळीच जादू आहे. ती म्हणजे सौम्य वाणी, संयमी वृत्ती आणि अभ्यासपूर्ण विचारसरणी. किती ही कठीण प्रसंग असला, तरी आत्मसंयम आणि नम्रतेचा समतोल न ढळता राखणारे हे व्यक्तिमत्त्व आज अनेकांच्या मनात आपलं अढळ स्थान निर्माण करून आहे.

ते केवळ निष्ठावान शिवसैनिक म्हणून ओळखले जात नाहीत, तर मा.आमदार अमोलदादा चिमणरावजी पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून कार्यकर्त्यांच्या मनात श्रद्धेचे आणि विश्वासाचे स्थान मिळवले आहे. त्यांच्या कार्याची दिशा पक्षाशी जरी जोडलेली असली, तरी त्या मागील भावना नेहमीच समाजाभिमुख आणि लोकहितवादी असते.

परेश भाऊंच्या व्यक्तिमत्त्वाचा खरा ठसा त्यांच्या कृतीतून उमटतो. त्यांनी कधी ही आपल्या मोठेपणाचा गाजावाजा केला नाही, पण गरज पडल्यावर कुणाच्या मदतीसाठी सदैव पुढे सरसावले. कुणी अडचणीत असेल, संकटात असेल, तर ते आपल्या वेळेचा, मनाचा आणि संसाधनांचा उगम न करताच, त्या व्यक्तीसाठी धावून जातात. हाच त्यांचा खरा मोठेपणा.

त्यांची मैत्री ही केवळ भेटीगाठींची नसून, वेळेच्या कसोटीवर खरी ठरलेली असते. म्हणूनच त्यांच्या बाबत नेहमी म्हटलं जातं,"दिलदार मित्रांचे दिलदार मित्र म्हणजेच परेश भाऊ बिर्ला."

त्यांच्या मित्रांच्या डोळ्यांत त्यांच्या बद्दलचा आदर आणि हृदयात असलेलं प्रेम हे कायम ओसंडून वाहत असतं.

ते कोणत्या ही प्रसंगी असोत एखाद्या छोट्या कार्यक्रमात किंवा मोठ्या राजकीय व्यासपीठावर त्यांची वाणी नेहमी संयमी, शांत आणि माणूसकीने ओथंबलेली असते. त्यांनी कधीच आक्रमक भाषेचा वापर न करता, सौम्य पण प्रभावी संवादातून मन जिंकले आहे.

आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त, त्यांच्या कार्यकर्त्यांपासून ते हितचिंतकांपर्यंत, कुटुंबीयांपासून ते सर्वसामान्यांपर्यंत प्रत्येकाच्या मनात एकच भावना आहे :
"आम्ही खरोखरच भाग्यवान आहोत, की आमच्या
आयुष्यात परेश भाऊ आहेत."

त्यांचे आयुष्य हे केवळ एका यशस्वी राजकीय व्यक्तीचे नसून, ते एका यशस्वी माणसाचे जिवंत उदाहरण आहे. त्यांच्या विचारांत ठामपणा आहे, परंतु भाषेत नेहमी नम्रता आहे. त्यांच्या वागण्यात आपलेपणा आहे, पण अहंकार नाही.

आज त्यांचा वाढदिवस हा केवळ एक औपचारिक दिनविशेष नसून, त्यांच्या बद्दल असलेल्या आदरभावना व्यक्त करण्याचं एक सुंदर कारण आहे.

परेश भाऊ, आपणास आरोग्य, यश, समाधान आणि दीर्घायुष्य लाभो, हीच मनःपूर्वक प्रार्थना.
आपलं कार्य असंच तेजस्वी आणि लोकाभिमुख राहो, हीच सदिच्छा.

आपल्या जीवनात अशा शांत, संयमी आणि दिलदार व्यक्ती फार विरळच भेटतात. पण एकदा का त्या भेटल्या, की त्या आयुष्यभर मनाच्या कोपऱ्यात घर करून राहतात.

वाढदिवसाच्या मनःपूर्वक, प्रेमळ आणि हृदयस्पर्शी शुभेच्छा परेश भाऊ!
आपल्या आयुष्यात सदैव आनंद, यश आणि समाधानाचीच साथ लाभो!

© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !