जनतेच्या हृदयात घर केलेलं नेतृत्व....!
जनतेच्या हृदयात घर केलेलं नेतृत्व....!
नेतृत्व म्हणजे केवळ पदाची उंची नाही, तर माणुसकीची खोली असते. जनतेच्या दुःखात धावून जाणं, त्यांच्या प्रश्नांना आपले मानून उत्तर शोधणं आणि कुठलाही भेदभाव न करता सर्वांना सोबत घेऊन चालणं.हेच खऱ्या नेतृत्वाचं लक्षण. अशा नेतृत्वाचं नाव म्हणजे मा. आबासो. पी. सी. पाटील साहेब.
साहेब म्हणजे साधेपणा, स्पष्टपणा आणि संवेदनशीलता यांचं सुंदर मिश्रण. मोठं पद असून ही त्यांचं वागणं नेहमीच सर्वसामान्यांसारखं, आपुलकीनं बोलणं आणि प्रत्येकाला वेळ देणं यामुळेच ते “आपल्यातले” वाटतात. त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू आणि मनातली माणुसकी अनेकांसाठी आधार बनली आहे.
मा. शिक्षण व बांधकाम सभापती म्हणून त्यांनी जि. प. जळगावमध्ये शिक्षणव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी, शाळांच्या भौतिक सुविधा वाढवण्यासाठी आणि विकासकामांना गती देण्यासाठी जे कार्य केलं आहे, ते दूरगामी परिणाम करणारे आहे. शिक्षण हेच समाजाचं भविष्य आहे, हा विचार त्यांनी कृतीतून दाखवून दिला.
भाजपा जळगाव जिल्हा उपाध्यक्ष या भूमिकेतून त्यांनी संघटन मजबूत केलं, कार्यकर्त्यांना बळ दिलं आणि पक्षाला जनतेशी अधिक घट्ट जोडण्याचं काम केलं. कार्यकर्ता हा पक्षाचा आत्मा आहे, हा विश्वास त्यांच्या प्रत्येक निर्णयातून जाणवतो.
आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना आम्ही केवळ एका लोकप्रतिनिधीला नव्हे, तर एका संवेदनशील मार्गदर्शकाला, समाजभान जपणाऱ्या व्यक्तिमत्त्वाला आणि जनतेच्या मनात घर केलेल्या नेत्याला शुभेच्छा देत आहोत.ईश्वर त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि अजून अधिक जोमाने जनसेवा करण्याची शक्ती देवो, हीच मनःपूर्वक प्रार्थना.
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा