सकाळची किरणे आणि स्वप्नांचा पाठलाग...!
सकाळची किरणे आणि स्वप्नांचा पाठलाग...!
उजेडणारी प्रत्येक सकाळ आपल्यासमोर दोन दरवाजे उघडून ठेवते.एक, गोड झोपेत हरवून स्वप्न पाहण्याचा,
आणि दुसरा, धैर्याने उभे राहून त्या स्वप्नांच्या मागे पाऊल टाकण्याचा.
स्वप्नं मोहक असतात. त्या रंगीत, सुंदर जगात आपण कोणताही त्रास, कोणताही अपयश अनुभवत नाही. आपल्याला वाटतं, “थोडं झोपून राहू, उद्याचं दिवस बघू…” पण खरं तर प्रत्येक उशिरा घालवलेली सकाळ आपल्याला आपल्या स्वप्नांपासून थोडं दूर नेत असते.
उठण्याचा निर्णय सोपा नसतो. रस्ता कठीण असतो.
अपयशाची भीती, थकवा, जगाची टिंगल सर्व काही डोक्यावर येतं. पण हा तोच रस्ता आहे जो आपल्याला स्वप्नांच्या जवळ नेतो. पायरी-पायरी चढत जाताना आपण फक्त आपले स्वप्न पूर्ण करत नाही, तर स्वतःच घडत जातो. आपण अधिक मजबूत होतो, अधिक धैर्यवान होतो, आणि जगण्याची खरी कला शिकतो.
सकाळची किरणं आपल्याला हे सांगतात.तुम्ही निवड करू शकता. तुमच्या हातात आहे की तुम्ही पुन्हा झोपेत हरवाल की स्वप्नांना प्रत्यक्षात बदलण्यासाठी उठाल.
स्वप्न पाहणे सोयीचे आहे, पण स्वप्न पूर्ण करणे.अद्भुत.
त्या एक पावलाही विसरू नका, जे तुम्हाला स्वप्नांच्या जवळ घेऊन जातात. थोडा त्रास, थोडा संघर्ष, पण तोच सुखाचा मार्ग आहे. कारण इतिहास घडवणारे फक्त तेच लोक असतात जे झोप सोडतात आणि स्वप्नांचा पाठलाग करतात.
उजेडणारी सकाळ पुन्हा येईल, पण प्रत्येक सकाळची ती एकच संधी आहे.स्वप्नांच्या मागे पाऊल टाका,आणि स्वतःला जगात तुमच्या प्रकाशात दाखवा.
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा