जिंकलो तरी इतिहास हरलो तरी इतिहास....!

जिंकलो तरी इतिहास हरलो तरी इतिहास....!

स्वतःचा स्वाभिमान, स्वतःचा आत्मसन्मान ही माणसाच्या आयुष्याची खरी ओळख असते.माणूस किती श्रीमंत आहे, किती यशस्वी आहे, किती लोक त्याच्या भोवती आहेत… यापेक्षा तो स्वतःच्या नजरेत किती उंच आहे, हे जास्त महत्त्वाचं असतं. कारण जग आपल्याला आपल्या कर्तृत्वाने ओळखतं; पण आपण स्वतःला आपल्या स्वाभिमानाने ओळखतो.

स्वाभिमान म्हणजे अहंकार नाही.स्वाभिमान म्हणजे स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव.आत्मसन्मान म्हणजे स्वतःवर ठेवलेला विश्वास.

जीवनाच्या वाटेवर चालताना अनेक अडचणी येतात. कधी परिस्थिती आपल्याला गुडघ्यावर आणते, कधी माणसं शब्दांनी जखमा करतात, कधी अपयश मनाचा कणा मोडून टाकतं. पण त्या क्षणी जर आपण स्वतःला विसरलो, स्वतःचाच आदर करायला सोडलं. तर खरी हार तिथेच होते.

जिद्दीने उभं राहणं म्हणजे प्रत्येक वेळी जिंकणं नाही.
जिद्दीने उभं राहणं म्हणजे पडून ही पुन्हा उभं राहण्याची तयारी ठेवणं.जगातील कुठलीही अडचण तुम्हाला हरवू शकत नाही,जो पर्यंत तुम्ही स्वतःला हरू देत नाही.

आयुष्यात स्वतःला कधीही "उध्वस्त" होऊ देऊ नका.
कारण जग खूप व्यावहारिक आहे.ढासळलेल्या घराच्या वीटा सुद्धा लोक सोडत नाहीत,मग तुटलेल्या माणसाला कोण विचारणार? म्हणून संकट आलं की तुटून पडायचं नाही,तर तुटूनही अधिक मजबूत व्हायचं.

वादळ आलं तर झाडासारखं थोडं वाकायचं,पण मुळं कधीही सोडायची नाहीत.कारण मुळं म्हणजे तुमचा स्वाभिमान…आणि खोड म्हणजे तुमचा आत्मविश्वास.

लक्षात ठेवा.जीवन ही एक लढाई आहे.इथे प्रत्येक जण आपल्या आपल्या रणांगणावर लढत असतो.कोणी पैशासाठी, कोणी नात्यांसाठी, कोणी स्वप्नांसाठी…
पण खरी लढाई असते स्वतःशी भीतीशी, न्यूनगंडाशी, अपयशाशी.संकटावर अशा प्रकारे तुटून पडा की जिंकलात तर इतिहास घडला पाहिजे,आणि हरलात तरी इतिहास घडला पाहिजे.

कारण जिंकणं म्हणजे केवळ यश नाही,तर हरून ही पुन्हा उभं राहणं हीच खरी क्रांती आहे.जगात मोठं होण्यासाठी मोठी पदवी लागत नाही,मोठं मन लागतं.मोठी संपत्ती लागत नाही,मोठा स्वाभिमान लागतो.

तुमच्या आयुष्यात किती वेळा अपयश आलं यापेक्षा
तुम्ही किती वेळा स्वतःला सावरलं,हे जास्त महत्त्वाचं आहे.म्हणून स्वतःवर प्रेम करा.स्वतःचा आदर करा.
स्वतःच्या स्वप्नांना कधी कमी लेखू नका.

तुम्ही खास आहात, कारण तुमच्यासारखा दुसरा कोणी नाही.तुमचं आयुष्य ही एक कथा आहे.ती अशी जगा की
तुमच्या संघर्षाला लोक सलाम करतील.

जिद्दीने उभे रहा.स्वाभिमानाने जगा.आत्मसन्मानाने निर्णय घ्या.आणि लक्षात ठेवा.तुम्ही कधीच उध्वस्त होत नाही,जो पर्यंत तुमचा आत्मविश्वास जिवंत आहे.
जिंकलात तर इतिहास घडवा…आणि हरलात तरी इतिहास घडवून दाखवा.

© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !