विचारशील नेतृत्वाचा विश्वासार्ह चेहरा विनायकभाऊ महाजन....!
विचारशील नेतृत्वाचा विश्वासार्ह चेहरा विनायकभाऊ महाजन....!
धरणगावच्या सामाजिक आणि सार्वजनिक जीवनात विनायकभाऊ महाजन हे नाव केवळ एका पदापुरते मर्यादित नसून ते सेवेचा, संयमाचा आणि विचारशील नेतृत्वाचा आदर्श आहे.
समस्त मोठा माळीवाडा समाज पंच मंडळाचे सहसचिव म्हणून समाजहित जपताना असो, संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्याचे विभागीय अध्यक्ष म्हणून युवकांना योग्य दिशा देताना असो, शेतकरी सेना शिवसेनेचे तालुका प्रमुख म्हणून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ठाम उभे राहताना असो, किंवा अखिल भारतीय ग्राहक पंचायत व समता परिषदेमधील जबाबदाऱ्या पार पाडताना असो प्रत्येक ठिकाणी विनायकभाऊंनी कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि निस्वार्थ सेवा या मूल्यांचा ठसा उमटवला आहे.
त्यांचे व्यक्तिमत्त्व अत्यंत शांत, संयमी आणि अभ्यासू आहे. कठीण प्रसंगातही घाईघाईने प्रतिक्रिया न देता, विचारपूर्वक निर्णय घेणे ही त्यांची खासियत. कमी बोलून जास्त काम करणे, स्वतः पुढे न येता इतरांना पुढे नेणे, आणि सत्तेपेक्षा सत्याला महत्त्व देणे. हे गुण आजच्या काळात दुर्मिळच म्हणावे लागतील.
विनायकभाऊंचे बोलणे साधे असते, पण त्यामागील विचार खोल असतो. त्यामुळेच समाजातील प्रत्येक घटक त्यांच्यावर विश्वास ठेवतो. त्यांच्या मार्गदर्शनात अनेक युवक घडत आहेत, अनेक प्रश्नांना योग्य दिशा मिळत आहे आणि समाजात सकारात्मक बदल घडत आहे.
आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त हे मनापासून सांगावेसे वाटते की, विनायकभाऊंसारखी व्यक्तिमत्त्वे समाजाची खरी संपत्ती असतात. त्यांचे आरोग्य उत्तम राहो, आयुष्य दीर्घ व यशस्वी होवो आणि त्यांनी घेतलेल्या प्रत्येक जबाबदारीत त्यांना समाधान व जनतेचे प्रेम लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा