दुसऱ्याच्या चुकीची शिक्षा स्वतःला नको....!
दुसऱ्याच्या चुकीची शिक्षा स्वतःला नको....! आपली चूक नसताना स्वतःला त्रास करून घेणं म्हणजे दुसऱ्याच्या चुकीची शिक्षा स्वतःलाच देणं असतं. हे वाक्य ऐकायला सोपं वाटतं, पण जगताना त्याची जाणीव फार उशिरा होते. मन संवेदनशील असतं तेव्हा ते इतरांच्या शब्दांना, वागणुकीला जास्त खोलवर घेतं. आणि मग नकळत आपण स्वतःलाच दोषी ठरवायला लागतो. खरं तर सगळंच आपल्या हातात नसतं. प्रत्येक माणूस, प्रत्येक नातं, प्रत्येक परिस्थिती आपल्या अपेक्षांप्रमाणे वागेलच असं नाही. हे स्वीकारणं कठीण असतं, पण हेच स्वीकारणं परिपक्वतेचं आणि शहाणपणाचं लक्षण आहे. लोक जेव्हा चुकीचं वागतात, तेव्हा त्या वागणुकीमागे आपला स्वभाव नसतो, तर त्यांच्या विचारांची मर्यादा असते. पण तरीही आपण आरशात पाहून स्वतःलाच प्रश्न विचारतो.“मी वेगळं वागायला हवं होतं का?” प्रत्येक गोष्टीसाठी स्वतःलाच जबाबदार धरणं मनाला हळूहळू थकवतं. आपण प्रामाणिक असतो, मनापासून वागतो, कुणाचं वाईट नको असतं.मग अशा वेळी मन शांत ठेवण्याचा हक्क आपलाच असतो. तरीही आपण तो हक्क स्वतःकडूनच हिरावून घेतो. सगळ्यांना समजावून सांगण्याच्या नादात आपण स्वतःला विसरतो. पण खरं सांगा...