इतिहासाला स्पर्श करणारी साळवे इंग्रजी विद्यालयाची शैक्षणिक सहल....!


इतिहासाला स्पर्श करणारी साळवे इंग्रजी विद्यालयाची शैक्षणिक सहल....!

विद्यार्थ्यांच्या जीवनातील शैक्षणिक सहल म्हणजे केवळ प्रवास नसून तो ज्ञान, संस्कार आणि अनुभवांचा आनंदोत्सव असतो.हाच आनंदोत्सव साळवे ता.धरणगाव येथील साळवे इंग्रजी विद्यालयाची शैक्षणिक सहल यशस्वीपणे आणि उत्साहात पार पडली.

या सहलीदरम्यान विद्यार्थ्यांनी कालीमठ, घृष्णेश्वर, वेरूळ येथील कैलास मंदिर, देवगिरी किल्ला, सिद्धार्थ गार्डन, प्राणी संग्रहालय, मत्स्यालय, बीबी का मकबरा तसेच पैठण येथील कारंजा या ऐतिहासिक, भौगोलिक आणि धार्मिक स्थळांना भेटी दिल्या. पुस्तकात वाचलेली इतिहासाची पाने प्रत्यक्ष डोळ्यांसमोर उलगडताना विद्यार्थ्यांच्या मनात कुतूहल, आनंद आणि अभिमान दाटून आला. किल्ल्यांचे घाट, प्राचीन वास्तूंची भव्यता आणि धार्मिक स्थळांचे पावित्र्य अनुभवताना इतिहास जणू जिवंत झाल्याचा भास होत होता.

या ठिकाणी विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक वास्तूंचे सरांना व भौगोलिक स्थळांचे बारकाईने निरीक्षण केले आणि त्यांची माहिती नोंदवली. प्रत्यक्ष अनुभवातून इतिहास व संस्कृतीचे सखोल ज्ञान मिळाल्याने विद्यार्थी अत्यंत उत्साही आणि भारावून गेले. ऐतिहासिक स्थळांना भेट देत इतिहास प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी मिळाल्याने त्यांच्या शिकण्याला नवे परिमाण प्राप्त झाले.

या शैक्षणिक सहलीचे यशस्वी आयोजन सहल प्रमुख एस. पी. तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. त्यांच्यासह ज्येष्ठ शिक्षक जी. व्ही. नारखेडे, शिक्षिका प्रतिभा पाटील, वर्षा नेहेते आदी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रत्येक ठिकाणी मार्गदर्शन केले. शिक्षकांचे प्रेमळ लक्ष, संयम आणि काळजीमुळे ही सहल शिस्तबद्ध, सुरक्षित आणि आनंददायी ठरली.

ऐतिहासिक अभ्यासपूर्ण शैक्षणिक सहलीतून परतलेल्या विद्यार्थ्यांचे ग्रां सु मंडळाचे चेअरमन डॉ. गिरीश नारखेडे, खजिनदार डॉ. चंद्रकांत नारखेडे, शालेय समितीचे चेअरमन डॉ. शशिकांत नारखेडे, सचिव रमेश बोरोले व कार्यकारणीचे सर्व सदस्य, तसेच मुख्याध्यापक एस. डी. मोरे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मनापासून कौतुक केले, अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या.

ही शैक्षणिक सहल विद्यार्थ्यांसाठी ज्ञानवर्धक तर होतीच, पण त्याहीपेक्षा अधिक आनंददायी, प्रेरणादायी आणि आयुष्यभर स्मरणात राहणारी ठरली. अशा सहलींमधूनच विद्यार्थ्यांच्या मनात इतिहासाविषयी आदर, संस्कृतीविषयी अभिमान आणि शिक्षणाविषयी प्रेम निर्माण होते. साळवे इंग्रजी विद्यालयाची ही शैक्षणिक सहल निश्चितच विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक सुवर्णक्षण ठरली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !