प्रसिद्धीचा प्रवास संघर्षाशिवाय मिळत नाही....!


प्रसिद्धीचा प्रवास संघर्षाशिवाय मिळत नाही....!

प्रसिद्ध व्यक्ती होण्यासाठीचा अखंड संघर्ष प्रसिद्ध व्यक्ती होणं म्हणजे एका दिवसात मिळालेलं यश नाही..
त्यामागे असतो आयुष्याच्या प्रत्येक क्षणात दिलेला संघर्ष,प्रत्येक श्वासाबरोबर जपलेलं स्वप्न,आणि कोणत्यातरी एका क्षेत्रात स्वतःला पूर्णपणे झोकून देण्याची तयारी.आयुष्याचा प्रत्येक क्षण आपल्याला परीक्षा घेतो.

इतर लोक थांबतात, विश्रांती घेतात,पण स्वप्न पाहणारा माणूस मात्र सातत्याने उगळत राहतो.कारण त्याला माहीत असतं.आज थांबलो, तर उद्याचं स्वप्न दूर जाईल.क्षण न क्षण उगळणं म्हणजे केवळ मेहनत नाही,ती असते स्वतःवरची निष्ठा.

अपयश आलं तरी न खचता,त्यातून शिकत पुढे जाण्याची जिद्द राखणं,लोकांच्या टोमण्यांपेक्षा स्वतःच्या ध्येयाचा आवाज मोठा ठेवणं हेच खऱ्या यशाचं लक्षण आहे.

आयुष्य आपल्याला थांबायला अनेक कारणं देतं थकवा, अपयश, लोकांची मतं, परिस्थिती…पण जो माणूस या सगळ्यांवर मात करून पुन्हा उभा राहतो,तोच खऱ्या अर्थाने स्वतःचं भविष्य घडवतो.कारण यशाला वेग नाही,ते सातत्य मागतं.

क्षण न क्षण उगळणं म्हणजे केवळ मेहनतीचा भार नाही,
ती असते स्वप्नांशी केलेली प्रामाणिकता.अपयश आलं तरी त्या वेदनेतून नवी ताकद शोधणं,आणि पुन्हा त्याच ध्येयाकडे अजून ठाम पावलांनी चालणं हेच यशस्वी माणसाचं खरं सामर्थ्य आहे.प्रसिद्धी ही अंतिम ध्येय नसते,ती तर प्रवासात मिळालेली ओळख असते.खरं यश असतं स्वतःच्या अंतःकरणाला उत्तर देता येण्यात“मी माझ्या स्वप्नाशी कधी दगा दिला नाही.”

जो माणूस एका क्षेत्रात स्वतःला सतत झोकून देतो,जो प्रत्येक क्षणाला संधी मानतो,तो एक दिवस केवळ प्रसिद्ध होत नाही,तर असंख्य लोकांच्या आयुष्याला दिशा देणारा प्रकाश बनतो.कारण इतिहास लक्षात ठेवतोते झळकणारे चेहरे नाहीत,तर शांतपणे, सातत्याने स्वतःला उगळत राहणारी जिद्दी माणसं… 

© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !