विसरू नको रे आई-बापांना, झिजवली त्यांनी काया
विसरू नको रे आई-बापांना, झिजवली त्यांनी काया आई-वडील म्हणजेच परमेश्वराचे प्रत्यक्ष अवतार. त्यांच्या आपल्यावरील उपकारांचे वर्णन शब्दांत करता येणे अशक्य आहे. आपल्या बालपणापासून ते आजपर्यंत, आपल्या प्रत्येक सुखासाठी झटणारे आणि कधीच स्वतःसाठी न जगणारे आई-वडील, ही आपल्याला लाभलेली सगळ्यात मोठी संपत्ती आहे. त्यांच्या झिजलेल्या हातांतील रेषा आणि थकलेल्या पावलांतील सच्चेपणा, हे त्यांच्या त्यागाचे व कष्टाचे प्रतिक आहे. आपल्या बालपणी आपल्याला हसवत उंच उचलणारे, आपल्या लहानशा इच्छांनाही प्राधान्य देणारे, शाळेच्या फी भरण्यासाठी राबणारे हेच आपले आई-वडील. आपल्या सुखासाठी ते आयुष्यभर कष्ट करतात. आईचे वात्सल्य आणि वडिलांचा आधार यावरच आपल्या आयुष्याचा डोलारा उभा आहे. मुलांना चांगले शिक्षण मिळावे, त्यांचे जीवन उज्ज्वल व्हावे, हीच आई-वडिलांची एकमेव इच्छा असते. स्वतःच्या इच्छा बाजूला सारून, कधी स्वतःच्या पोटापाण्याचा त्याग करून, तर कधी स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करून, ते आपल्याला मोठे करतात. त्यांच्या कष्टांचे चीज झाले की त्यांच्या डोळ्यांत समाधानाचे अश्रू येतात. मात्र मुलांनी त्यांना विसरले...