पोस्ट्स

मार्च, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पैशांच्या झगमगाटात हरवलेले मूल्य.....!

इमेज
पैशांच्या झगमगाटात हरवलेले मूल्य.....! रंग बदलणाऱ्या माणसांत राहणे म्हणजे दररोज होळी खेळण्यासारखेच असते… पण ही होळी रंगांची नसते, ती भावनांची असते. इथे गुलाल उधळला जात नाही, तर विश्वास उधळला जातो. इथे पाण्याने रंग धुतले जात नाहीत, तर स्वार्थाने नाती धुऊन निघून जातात. प्रत्येक सकाळी आपण मनात आशेचा एक नवा रंग भरतो, आणि संध्याकाळी तोच रंग कुणाच्या खोटेपणामुळे फिका पडलेला दिसतो. आजकाल माणसं परिस्थितीनुसार रंग बदलतात. समोर गोड बोलणारे लोक मागे कटू सत्य विणत असतात. चेहऱ्यावर मैत्रीचा मुखवटा, पण मनात स्वार्थाची गणितं. अशा वातावरणात जगताना मन कायम सावध राहतं. कुणावर विश्वास ठेवावा आणि कुणापासून अंतर राखावं, हेच कळेनासं होतं.आपण मात्र नात्यांचा, प्रामाणिकपणाचा, आपुलकीचा रंग जपत राहतो.कारण आपल्याला रंग बदलता येत नाही; आपल्याला मन बदलता येत नाही. बुद्धिमान व्यक्तीच्या वाटेला पराभव तेव्हाच येतो, जेव्हा पैशांच्या जोरावर गाढवं पुढे जातात. जेव्हा गुणवत्तेपेक्षा पैशाची किंमत जास्त ठरते, जेव्हा कर्तृत्वापेक्षा ओळखींचं वजन जड ठरतं, तेव्हा खऱ्या अर्थाने मेहनत करणारा माणूस क्षणभर थांबतो. त्याच...

गैरसमजांच्या सावलीतलं सत्य....!

इमेज
गैरसमजांच्या सावलीतलं सत्य....! “आपण कुणासाठी कितीही केलं, तरी कुठेतरी कमीच पडतो… कारण सत्य चप्पल घालून तयार होईपर्यंत, खोटं गावभर हिंडून आलेलं असतं.” ही ओळ केवळ शब्दांची मांडणी नाही; ती आयुष्याच्या कटू पण निर्विवाद वास्तवाची जाणीव करून देणारी अनुभूती आहे. अनेक नाती, विश्वास, गैरसमज आणि तुटलेल्या मनांचा इतिहास या एका वाक्यात सामावलेला आहे. मनुष्य जेव्हा एखाद्यावर मनापासून प्रेम करतो, तेव्हा तो हिशोब ठेवत नाही. तो आपल्या माणसासाठी झटतो, त्याच्या अडचणी स्वतःच्या मानतो, त्याच्या आनंदात स्वतःचा आनंद शोधतो. स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवतो, स्वतःचे दुःख लपवतो, रात्री उशिरापर्यंत जागून त्याला साथ देतो. हे सर्व करताना त्याच्या मनात परतफेडीची अपेक्षा नसते; कारण आपुलकीला तोल नसतो आणि प्रेमाला अट नसते. परंतु जगाचा स्वभाव वेगळा आहे. जग ऐकलेल्या गोष्टींवर पटकन विश्वास ठेवते; पाहिलेल्या सत्याकडे मात्र अनेकदा दुर्लक्ष करते. खोटं आकर्षक असतं. त्यात रंगत असते, चटकदारपणा असतो, थोडी अतिशयोक्ती असते. एका कानातून दुसऱ्या कानात जाताना ते अधिक सजतं, अधिक फुगतं आणि लोकांच्या मनात पटकन घर करून बसतं. स...

चारित्र्यावरचा डाग आयुष्याची न पुसणारी वेदना....!

इमेज
चारित्र्यावरचा डाग आयुष्याची न पुसणारी वेदना....! “दाग” हा शब्द किती छोटा… पण त्याचा अर्थ किती खोल!कपड्यावर लागला तर कपडा बेकार होतो, आणि चारित्र्यावर लागला तर आयुष्यच बेकार होतं. कपड्यावरील डाग आपण साबणाने, पाण्याने, कष्टाने घालवू शकतो. नवीन कपडा घेऊ शकतो. वेळ गेली की तो विसरूनही जातो. पण मनावर, चारित्र्यावर लागलेला डाग? तो ना साबणाने निघतो, ना काळाने सहज पुसला जातो. तो कायम मनाच्या आरशावर उमटलेला राहतो. कपड्याचा डाग दिसतो बाहेरून; चारित्र्याचा डाग दिसतो नजरेतून. लोकांच्या नजरेत एकदा शंका निर्माण झाली की विश्वासाचं नातं तुटायला वेळ लागत नाही. आणि विश्वास… तो एकदा तुटला की त्याला जोडायला आयुष्य अपुरं पडतं. एखाद्या शुभ्र पांढऱ्या कपड्यावर काळा ठिपका किती उठून दिसतो ना? तसंच, आयुष्यभर चांगुलपणाने जगलेल्या माणसाच्या आयुष्यात एक चुकीची गोष्ट झाली, की तीच सगळ्यांना दिसते. त्याच्या हजारो चांगल्या कृतींचं मोल कमी होतं.समाजाला चांगुलपणापेक्षा चूक जास्त लवकर दिसते. चारित्र्य म्हणजे माणसाचं खरं वैभव. पैसा, प्रतिष्ठा, सौंदर्य हे सगळं क्षणभंगुर आहे. पण स्वच्छ चारित्र्य हे आयुष्यभराची क...

सेवेच्या तेजाने उजळलेले एरंडोल त्यागातून निर्मित नेतृत्वाची कहाणी.....!

इमेज
सेवेच्या तेजाने उजळलेले एरंडोल त्यागातून निर्मित नेतृत्वाची कहाणी.....! एरंडोलसारख्या छोट्याशा शहरात घडलेली एक घटना आज केवळ स्थानिक पातळीवर मर्यादित राहिलेली नाही; ती प्रत्येक संवेदनशील मनाला स्पर्श करणारी ठरली आहे. सत्तेच्या, मानधनाच्या आणि प्रतिष्ठेच्या चर्चांनी गजबजलेल्या या काळात काही व्यक्ती आपल्या शांत, निःस्वार्थ कृतीतून समाजासमोर एक जिवंत आदर्श ठेवतात. डॉ. नरेंद्र धुडकू ठाकूर आणि डॉ. गीतांजली नरेंद्र ठाकूर या दांपत्याने आपल्या वैवाहिक आयुष्याच्या वाढदिवशी घेतलेला संकल्प हा असाच एक तेजस्वी दीप आहे, जो लोकसेवेची खरी दिशा दाखवतो. लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून दरमहा मिळणारे पंधरा हजार रुपये शासकीय मानधन आणि बैठक भत्ता, तसेच नगरसेविका म्हणून मिळणारा बैठक भत्ता हे सर्व स्वतःकडे न ठेवता संपूर्ण पाच वर्षे समाजकार्यासाठी अर्पण करण्याचा त्यांनी घेतलेला निर्णय हा केवळ आर्थिक त्याग नाही; तो त्यांच्या अंतःकरणातील समाजप्रेमाचा साक्षात पुरावा आहे. स्वतःच्या कुटुंबासाठी सहज वापरता येईल अशी रक्कम त्यांनी निःसंकोचपणे समाजाच्या सेवेसाठी अर्पण केली. हा निर्णय घेताना त्यांनी लाभ-हानीचा ...

अपेक्षांच्या ओझ्यात दबलेली स्वप्नं....!

इमेज
अपेक्षांच्या ओझ्यात दबलेली स्वप्नं....! असं म्हणतात की सगळ्यांना खुश ठेवणारा माणूस कधीच खऱ्या अर्थाने पुढे जात नाही. कारण तो स्वतःच्या स्वप्नांच्या दिशेने चालत नसतो; तो लोकांच्या अपेक्षांच्या मागे धावत असतो. त्याच्या आयुष्याचा केंद्रबिंदू स्वतः नसतो, तर इतरांच्या भावना, त्यांची मते आणि त्यांचा आनंद असतो. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू फुलावं यासाठी तो झटत राहतो, पण त्याच वेळी स्वतःच्या डोळ्यातले अश्रू मात्र शांतपणे लपवत राहतो. अशा माणसाला “नाही” म्हणणं जमत नाही. त्याला भीती वाटते.कुणी रुसू नये, कुणी दूर जाऊ नये, कुणाला वाईट वाटू नये. तो नात्यांना जपण्याच्या प्रयत्नात स्वतःलाच विसरतो. सुरुवातीला त्याची ही सवय सगळ्यांना आवडते. लोक त्याचं कौतुक करतात. “किती समजूतदार आहेस!”, “तू नसतास तर काय झालं असतं!”, “तुझ्यासारखा कोणी नाही!” असे शब्द त्याच्या मनाला समाधान देतात. त्याला वाटतं की तो खरोखरच महत्त्वाचा आहे. परंतु हळूहळू हेच कौतुक अपेक्षांमध्ये बदलतं. अपेक्षा हक्कांमध्ये रूपांतरित होतात. लोकांना त्याचा होकार सवयीचा होतो. त्याची उपलब्धता गृहीत धरली जाते. त्याच्या वेळेची, त्याच्या भा...

मान्यतेपेक्षा महत्त्वाचा आत्मसन्मान....!

इमेज
मान्यतेपेक्षा महत्त्वाचा आत्मसन्मान....! “तुमची किंमत तुम्हाला स्वतःला माहिती असली की जगाकडून मान मिळवण्यासाठी धडपड करावी लागत नाही…”मान, सन्मान, कौतुक या सगळ्यांच्या शोधात माणूस आयुष्यभर धावत असतो. कुणीतरी आपल्याला ओळखावं, आपल्या कष्टांची दखल घ्यावी, आपल्याला योग्य तो सन्मान मिळावा, अशी एक हळवी अपेक्षा मनात सतत दाटून आलेली असते. परंतु कधी शांतपणे स्वतःलाच विचारलं आहे का ? जर आपल्यालाच आपल्या किंमतीची जाणीव नसेल, तर जगाकडून ती कशी अपेक्षित करणार? जगाचं मोजमाप सतत बदलत राहतं. आज कौतुक, उद्या टीका. आज टाळ्यांचा कडकडाट, तर उद्या पूर्ण शांतता. लोकांचे मतप्रवाह ऋतूंप्रमाणे बदलतात. पण या सगळ्या गोंधळात एक गोष्ट मात्र स्थिर असते.ती म्हणजे आपल्या मनातील आवाज. तो जर ठामपणे सांगत असेल, “मी पुरेसा आहे… मी सक्षम आहे… मी मौल्यवान आहे,” तर बाहेरच्या मान्यतेची गरज उरत नाही. स्वतःची किंमत ओळखणं म्हणजे अहंकार नव्हे; तो आत्मसन्मान असतो. आत्मसन्मान ही एक शांत ताकद आहे. तो दिखावा करत नाही, मोठ्याने घोषणा देत नाही; परंतु संकटांच्या क्षणी खंबीरपणे उभा राहतो. जेव्हा जग शंकेच्या नजरेने पाहतं, तेव्...

समाजसेवेतील समर्पणाचे प्रतीक अशोक मोरे...!

इमेज
समाजसेवेतील समर्पणाचे प्रतीक अशोक मोरे...! जळगाव – समाजासाठी निस्वार्थ भावनेने काम करणे ही केवळ एक कर्तव्य नाही, तर एक जीवनशैली आहे, जी समाजाच्या प्रत्येक सदस्याला प्रेरित करते. अशाच समर्पित व्यक्तिमत्त्वाला जळगावच्या भोई समाज फाउंडेशनने विशेष सन्मान दिला आहे. एरंडोल येथील नगरपालिकेचे लिपिक, पण हृदयाने समाजसेवक अशोक मोरे, यांचा हा गौरव त्यांच्या अथक समाजकार्याचे कौतुक आहे. उपमहापौर मनोज चौधरी, नगरसेवक विशाल भोळे, किरण शिवदे, अतुलभाऊ बारी, श्री सोनवणे, छोटूभाऊ भोई आणि भोई समाजाचे जिल्हा अध्यक्ष एस. ए. भोई यांच्या हस्ते अशोक मोरे यांचा सन्मान करण्यात आला. हा गौरव फक्त त्यांच्या वैयक्तिक योगदानासाठी नाही, तर भोई समाजाच्या उत्कर्षासाठी त्यांनी केलेल्या निस्वार्थ प्रयत्नांचा आदर आहे. अशोक मोरे हे फक्त नगरपालिकेतील निष्ठावंत कर्मचारी नाहीत; ते समाजाच्या प्रगतीसाठी सदैव पुढाकार घेणारे कार्यकर्ते आहेत. गरजू व्यक्तींना मदत करण्याची तत्परता, समाजातील उपक्रमांमध्ये सहभाग, आणि सामाजिक न्याय व समतेसाठी केलेले प्रयत्न हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख आहेत. अशा निष्ठावंत आणि हृदयस्पर...

मातीच्या सुगंधातून उभा राहिलेला सुवर्णवीर नीरज दिलीप चौधरी....!

इमेज
मातीच्या सुगंधातून उभा राहिलेला सुवर्णवीर नीरज दिलीप चौधरी....! धुळे जिल्ह्यातील वलवाडी या छोट्याशा गावात जन्मलेले नीरज दिलीप चौधरी हे नावाने साधे, पण कर्तृत्वाने विलक्षण आहेत. गरीब व शेतकरी कुटुंबात वाढताना त्यांनी कष्टांचे मोल लहानपणापासूनच जाणले. उन्हातान्हात शेतात राबणारे आई-वडील, मर्यादित साधनसामग्री आणि साधे राहणीमान परंतु मनात मात्र मोठी स्वप्ने आणि देशासाठी काहीतरी करून दाखवण्याची अढळ जिद्द होती. लहानपणापासूनच त्यांना खेळाची विशेष आवड होती. अनेक अडचणींवर मात करत त्यांनी मैदानात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. राज्यस्तरावर खेळताना त्यांनी तब्बल दहा पदके मिळवली. प्रत्येक पदक हे त्यांच्या अथक परिश्रमाचे आणि कुटुंबाच्या त्यागाचे प्रतीक होते. गावच्या मातीत वाढलेला हा खेळाडू स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर यशाची शिखरे सर करू लागला. त्यांची झेप केवळ राज्यापुरती मर्यादित राहिली नाही. देशाचे प्रतिनिधित्व करत परदेशात खेळताना त्यांनी भारताचा तिरंगा अभिमानाने उंचावला आणि पदक जिंकून देशाचे नाव उज्ज्वल केले. त्या ऐतिहासिक क्षणी वलवाडी गाव, धुळे जिल्हा आणि संपूर्ण समाज अभि...