दि.१५ मार्च २०२६ ला असलेल्या मान्यवर कांशिराम साहेबांच्या ९२ व्या जयंती निमित्त लेख .
दि.१५ मार्च २०२६ ला असलेल्या मान्यवर कांशिराम साहेबांच्या ९२ व्या जयंती निमित्त लेख . -------------------------------------------------- बहुजन सत्तेचे शिल्पकार मान्यवर कांशीरामजी शोषितांना सत्तेची स्वप्ने पाहायला शिकविणारे बहुजन नायक,शून्यातून विश्व निर्माण करणारे महामानव,वोट आमचा, राज तुमचे नाही चालणार! या घोषणेचे निर्माता,राजकीय क्रांतीचे प्रणेते,बहुजन सत्तेचे शिल्पकार,सायकलवरून सत्तेपर्यंत पोहोचणारे राजकारणी,एक अकल्पनीय राजकीय संघर्ष करणारे 'चाणक्य',कोट्यवधी लोकांच्या मनात स्वाभिमान जागृत करणारे, "ज्याची जेवढी संख्या भारी, त्याची तेवढी हिस्सेदारी" हा प्रेरणादायी विचार बहुजन समाजाला देणारे मान्यवर कांशीराम साहेबांना ९२ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ॥ सन - १९३४ सालातील मार्च मासाच्या १५ तारखेला जन्मलेल्या कांशीरामजींचे नाव त्यांच्या स्वकर्तृत्वाने बहुजन समाजातील बहुजन रत्न समाजरत्न,बहुजन नायक म्हणून भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिल्या गेले. त्यांचा जन्म पंजाबमधील रोपड जिल्ह्...