पोस्ट्स

जखमी पावलांतून उमललेली इमानदारी....!

इमेज
जखमी पावलांतून उमललेली इमानदारी....! काटे त्यांच्याच पायात रुततात जे अनवाणी चालतात. कारण त्यांनी खोट्याचं पादत्राण घातलेलं नसतं. त्यांच्या पावलांना संरक्षण नसतं, पण त्यांच्या मनाला खोटेपणाचं ओझंही नसतं. ते चालतात उघड्या जमिनीवर, वेदना सहन करत, पण मान खाली न घालता. कारण त्यांना माहीत असतं.जखमा शरीरावर होतात, पण खोटेपणा आत्म्याला जखमी करतो. इमानदारीनं वागणारा माणूस नेहमीच सोप्या वाटेवर नसतो. त्याचा मार्ग काट्यांनी भरलेला असतो. तो प्रत्येक टोचणी अनुभवतो, प्रत्येक वेदना सहन करतो. कारण त्याच्याकडे लपवण्यासाठी काहीच नसतं. त्याचं आयुष्य उघडं असतं.मनासारखंच पारदर्शक. म्हणूनच त्रास त्यालाच होतो, आरोप त्याच्यावरच येतात, आणि प्रश्नही त्यालाच विचारले जातात. सरळ माणूस सगळं सहन करतो. तो गप्प राहतो, कारण त्याला भांडण नको असतं. तो माघार घेतो, कारण त्याला कोणाला दुखवायचं नसतं. पण त्याचा हा संयम कमकुवतपणाचं लक्षण नसतं; ती त्याच्या अंतःकरणातली ताकद असते. फसवणूक करणारे सुखात चालतात, मऊ चपलांतून, पण त्यांची पावलं कधीच ठाम नसतात. कारण त्यांना माहीत असतं.ही जमीन आपली नाही. प्रामाणिक माणूस मात्र ज...

मनाने मोजली जाणारी श्रीमंती.....!

इमेज
मनाने मोजली जाणारी श्रीमंती.....! श्रीमंती म्हणजे फक्त नोटांची जाडी किंवा बँक खात्यातील आकडे नाहीत; श्रीमंती ही माणसाच्या विचारांत, त्याच्या संवेदनशीलतेत आणि वागणुकीत ओळखली जाते. पैसा हातात असू शकतो, पण मन संकुचित असेल तर ती श्रीमंती अपुरी, कोरडी आणि पोकळ ठरते. कारण खऱ्या अर्थाने श्रीमंत तोच असतो, ज्याच्या आयुष्यात समाधान, शांती आणि माणुसकी यांची संगत असते. आजच्या धावपळीच्या जगात अनेक जण श्रीमंतीचा अर्थ फक्त दिखाव्यात शोधतात. पण दिखावा करणं ही श्रीमंती नसून आतल्या असुरक्षिततेची खूण असते. स्वतःवर, स्वतःच्या अस्तित्वावर विश्वास असणारा माणूस कधीच बाह्य चमकधमक मागत नाही. ज्याचं मन शांत आहे, तो साधेपणात ही तेजस्वी दिसतो. खरी संपत्ती साठवून ठेवण्यात नाही, तर गरजेच्या वेळी देण्यात आहे. गरज नसताना गोळा करणं हे स्वार्थाचं लक्षण असू शकतं, पण गरजेच्या वेळी कोणासाठी तरी उभं राहणं, मदतीचा हात पुढे करणं, हीच खरी श्रीमंती आहे. पैसा माणसाला मोठं करतो, समाजात नाव देतो; पण विचार त्याला उंचीवर नेतो, माणूस म्हणून घडवतो. ज्याच्याकडे कृतज्ञतेचं भांडार आहे, तो कधी ही गरीब राहत नाही. कारण त्याला ज...

हसण्यामागे लपलेली वेदना.....!

इमेज
हसण्यामागे लपलेली वेदना.....! सगळ्यासमोर हसणारी माणसं पाहिली की वाटतं, यांना कसलंच दुःख नसावं.आयुष्य किती सहज घेत असतील, किती आनंदात असतील! पण खरं तर हे हसू अनेकदा आनंदाचं नसतंच. ते असतं वेदना लपवण्यासाठी घातलेलं एक शांत कवच. ही माणसं आपलं दुःख कधीच ओरडून सांगत नाहीत. कुणाला त्रास होऊ नये, कुणावर ओझं पडू नये म्हणून ती स्वतःला मजबूत दाखवतात. आतून रडायचं असतं, मन भरून आलेलं असतं, तरी ओठांवर हसू ठेवतात. कारण तक्रार करणं त्यांना जमत नाही. “आपणच सावरायचं” ही सवय त्यांना लवकर शिकवलेली असते. ती सगळ्यांशी बोलतात, सगळ्यांसोबत हसतात, प्रत्येकाला आपलंसं करतात. पण स्वतःबद्दल बोलायची वेळ आली की थांबतात. कुणासमोरही पूर्णपणे उघडत नाहीत. कारण त्यांना वाटतं, आपलं दुःख कुणाला समजणारच नाही. त्यांचा संघर्ष खूप शांत असतो. शब्दांशिवाय,आवाजांशिवाय. म्हणूनच तो कुणाला दिसत नाही. अशा माणसांना खरंतर सर्वात जास्त गरज असते. आधाराची, समजुतीची, मायेच्या एका साध्या शब्दाची. पण तेच लोक तो आधार कधीच मागत नाहीत. कारण मदत मागणं म्हणजे कमजोरी नाही, हे मान्य करायला त्यांना वेळ लागतो. हसण्यामागे थकवा दडलेला असतो...

अपेक्षांपलीकडचं सुख....!

इमेज
अपेक्षांपलीकडचं सुख....! आयुष्य आपल्याला रोज काहीतरी शिकवत असतं. कधी माणसांच्या रूपात, कधी अनुभवांच्या, तर कधी न बोलता निघून जाणाऱ्या क्षणांच्या रूपात. पण सगळ्यात महत्त्वाचा धडा तोच असतो.जे आपल्या हिशोबात बसत नाही, त्याचा सतत विचार करून स्वतःला त्रास करून घेण्याची गरज नसते. आपण अनेकदा असा गैरसमज करून घेतो की, आयुष्यात भेटलेली प्रत्येक गोष्ट आपल्यासाठीच असते. प्रत्येक नातं टिकायलाच हवं, प्रत्येक व्यक्ती आपल्या प्रवासाचा भाग असायलाच हवा. पण खरं पाहिलं तर काही वस्तू आपल्या उपयोगाच्या नसतात आणि काही माणसं आपल्या प्रवासाची नसतात. हे स्वीकारणं कठीण असतं, कारण आपलं मन आठवणींना घट्ट धरून ठेवतं. पण वास्तव स्वीकारल्याशिवाय शांतता मिळत नाही. जिथे जुळवून घेण्यासाठी आपलीच किंमत कमी करावी लागते, जिथे आपलं मत, आपली भावना, आपला आत्मसन्मान बाजूला ठेवावा लागतो, तिथे थांबणं शहाणपणाचं ठरत नाही. कारण अशा ठिकाणी आपण हळूहळू आपल्याच अस्तित्वापासून दूर जातो. सगळ्यांना सोबत ठेवण्याच्या नादात आपण स्वतःलाच हरवतो, आणि शेवटी उरतं ते फक्त थकलेलं मन. जी गोष्ट आपल्याला शांतता देत नाही, जे नातं मनात सतत अस्...

जर आवाज मोठा असेल तर….!

इमेज
जर आवाज मोठा असेल तर….! जर आवाज मोठा असेल, तर तो नेहमीच सत्याचा असेल असं नाही. कधी कधी तो फक्त आतल्या असुरक्षिततेचा गोंगाट असतो. मनातली भीती, शंका, अपूर्णता झाकण्यासाठी माणूस आवाज वाढवतो. कारण ज्याचं मन शांत असतं, त्याला स्वतःला सिद्ध करण्यासाठी ओरडावं लागत नाही. शांत राहणारा माणूस कमकुवत नसतो, तो स्वतःवर विजय मिळवलेला असतो. राग, अपमान, वेदना या सगळ्यांवर नियंत्रण ठेवण्याची ताकद त्याच्याकडे असते. ओरडणं सोपं असतं, पण त्या क्षणीही शांत राहणं ही खरी हिंमत आहे. शांत माणूस हरत नाही, तो फक्त गोंगाटापेक्षा समजूत निवडतो. ओरडून कदाचित वाद जिंकता येतो, पण नातं हरवतं. समजून बोलल्यावर मात्र मन जिंकता येतं. मोठा आवाज क्षणिक प्रभाव टाकतो, तो क्षणापुरता धडकी भरवतो. पण शांत शब्द हळूच मनात उतरतात आणि कायमचा परिणाम करून जातात. ते मनाला जखम देत नाहीत, उलट मन जोडतात. ज्याला स्वतःवर विश्वास असतो, त्याला आपला मुद्दा पटवून देण्यासाठी आवाज वाढवावा लागत नाही. त्याचे विचार ठाम असतात, म्हणून त्याचे शब्द आपोआप प्रभावी ठरतात. अहंकारातून आलेला आवाज नातं तोडतो, दुरावा वाढवतो. पण संयमातून आलेला शब्द नातं ...

दुसऱ्याच्या चुकीची शिक्षा स्वतःला नको....!

इमेज
दुसऱ्याच्या चुकीची शिक्षा स्वतःला नको....! आपली चूक नसताना स्वतःला त्रास करून घेणं म्हणजे दुसऱ्याच्या चुकीची शिक्षा स्वतःलाच देणं असतं. हे वाक्य ऐकायला सोपं वाटतं, पण जगताना त्याची जाणीव फार उशिरा होते. मन संवेदनशील असतं तेव्हा ते इतरांच्या शब्दांना, वागणुकीला जास्त खोलवर घेतं. आणि मग नकळत आपण स्वतःलाच दोषी ठरवायला लागतो. खरं तर सगळंच आपल्या हातात नसतं. प्रत्येक माणूस, प्रत्येक नातं, प्रत्येक परिस्थिती आपल्या अपेक्षांप्रमाणे वागेलच असं नाही. हे स्वीकारणं कठीण असतं, पण हेच स्वीकारणं परिपक्वतेचं आणि शहाणपणाचं लक्षण आहे. लोक जेव्हा चुकीचं वागतात, तेव्हा त्या वागणुकीमागे आपला स्वभाव नसतो, तर त्यांच्या विचारांची मर्यादा असते. पण तरीही आपण आरशात पाहून स्वतःलाच प्रश्न विचारतो.“मी वेगळं वागायला हवं होतं का?” प्रत्येक गोष्टीसाठी स्वतःलाच जबाबदार धरणं मनाला हळूहळू थकवतं. आपण प्रामाणिक असतो, मनापासून वागतो, कुणाचं वाईट नको असतं.मग अशा वेळी मन शांत ठेवण्याचा हक्क आपलाच असतो. तरीही आपण तो हक्क स्वतःकडूनच हिरावून घेतो. सगळ्यांना समजावून सांगण्याच्या नादात आपण स्वतःला विसरतो. पण खरं सांगा...

न बोललेल्या शब्दांत हरवलेली नाती...!

इमेज
न बोललेल्या शब्दांत हरवलेली नाती...! नाती सहसा एका दिवसात तुटत नाहीत. ती तुटतात हळूहळू… अगदी नकळत. मोठे वाद, जोराचे भांडण किंवा कठोर शब्द हे कारण नसतात; खरी सुरुवात होते ती दुर्लक्षातून. बोलणं कमी होतं, भेटी टाळल्या जातात आणि “नंतर पाहू” म्हणत भावना मागे ढकलल्या जातात. तेव्हाच नात्याच्या मुळाशी एक सूक्ष्म तडा जातो. अहंकार त्या तड्याला वाढवतो.“मला काय फरक पडतो” हे शब्द जरी सहज निघाले, तरी ते नात्यांवर खोल ओरखडे उमटवतात. संवाद थांबतो आणि त्या शांततेत गैरसमज आपोआप जन्म घेतात. न बोललेली दुःखं, न समजलेल्या भावना आणि अपूर्ण अपेक्षा या सगळ्यांचा भार नातं हळूहळू पेलू शकत नाही. जेव्हा समजून घेण्याऐवजी जिंकण्याची हाव लागते, तेव्हा प्रेम मागे पडतं. नातं मग स्पर्धा बनतं.कोण बरोबर, कोण चूक याचा हिशोब सुरू होतो. माफी मागणं कमीपणाचं नसतं, पण अहंकार ते मान्य करू देत नाही. “मीच का वाकायचं?” या एका प्रश्नात कितीतरी नाती अडकून पडतात. एकदा मनात अंतर पडलं की ते दिसत नसतानाही सतत जाणवत राहतं. समोर बसूनही दूर वाटणं, शब्द असूनही संवाद न होणं, आणि हसण्यातही पोकळपणा जाणवणं हेच त्या अंतराचं अस्तित्व ...

हसऱ्या चेहऱ्यामागची फसवी साथ....!

इमेज
हसऱ्या चेहऱ्यामागची फसवी साथ....! आयुष्याच्या प्रवासात अनेक लोक आपल्या सोबत चालताना दिसतात. गर्दीत आपण कधी एकटे आहोत याची जाणीवही होत नाही. पण अनुभव सांगतो. सोबत असणं आणि खरी साथ देणं यात फार मोठा फरक असतो. काही माणसं बाहेरून इतकी आपलीशी वाटतात की त्यांच्या शब्दांवर, हसण्यावर, काळजीवर सहज विश्वास बसतो. पण त्या आपुलकीच्या आड स्वार्थाची थंड गणितं सुरू असतात. त्यांचं हसणं मनापासून नसतं, ते गरजेपुरतं असतं. त्यांचे शब्द गोड असतात, कारण त्यामागे भावना नसून उद्देश लपलेला असतो. काही चेहरे मुखवटे असतात, तर काही शब्द अलगद अडकवणारे सापळे. खोटी साथ कधीच थेट दुखावत नाही. ती आधी मनात घर करते. तुमचा विश्वास जिंकते, तुमच्या भावना ओळखते, तुमच्या कमकुवत जागा शोधते. त्यांना माहीत असतं. जवळीक जितकी वाढेल तितका घाव खोल बसेल. म्हणूनच ते जास्त गोड बोलतात, जास्त काळजी दाखवतात, कारण विश्वास हा त्यांचा सर्वात मजबूत शस्त्र असतो. अशा लोकांना तुमचं यश सहन होत नाही. कारण यश तुम्हाला स्वावलंबी बनवतं. पण तुमची कमजोरी त्यांना हवी असते कारण तिथेच त्यांचा फायदा असतो. तुमच्या मनात जागा मिळवणं हा त्यांचा पहिला...

जनतेच्या हृदयात घर केलेलं नेतृत्व....!

इमेज
जनतेच्या हृदयात घर केलेलं नेतृत्व....! नेतृत्व म्हणजे केवळ पदाची उंची नाही, तर माणुसकीची खोली असते. जनतेच्या दुःखात धावून जाणं, त्यांच्या प्रश्नांना आपले मानून उत्तर शोधणं आणि कुठलाही भेदभाव न करता सर्वांना सोबत घेऊन चालणं.हेच खऱ्या नेतृत्वाचं लक्षण. अशा नेतृत्वाचं नाव म्हणजे मा. आबासो. पी. सी. पाटील साहेब. साहेब म्हणजे साधेपणा, स्पष्टपणा आणि संवेदनशीलता यांचं सुंदर मिश्रण. मोठं पद असून ही त्यांचं वागणं नेहमीच सर्वसामान्यांसारखं, आपुलकीनं बोलणं आणि प्रत्येकाला वेळ देणं यामुळेच ते “आपल्यातले” वाटतात. त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू आणि मनातली माणुसकी अनेकांसाठी आधार बनली आहे. मा. शिक्षण व बांधकाम सभापती म्हणून त्यांनी जि. प. जळगावमध्ये शिक्षणव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी, शाळांच्या भौतिक सुविधा वाढवण्यासाठी आणि विकासकामांना गती देण्यासाठी जे कार्य केलं आहे, ते दूरगामी परिणाम करणारे आहे. शिक्षण हेच समाजाचं भविष्य आहे, हा विचार त्यांनी कृतीतून दाखवून दिला. भाजपा जळगाव जिल्हा उपाध्यक्ष या भूमिकेतून त्यांनी संघटन मजबूत केलं, कार्यकर्त्यांना बळ दिलं आणि पक्षाला जनतेशी अधिक घट्ट जोडण्य...

वागणूक कधीही खोटं बोलत नाही…..!

इमेज
वागणूक कधीही खोटं बोलत नाही…..! माणसाच्या आयुष्यात अनेक चेहरे भेटतात. काही हसरे, काही गोड बोलणारे, तर काही फारच आपुलकीने जवळ येणारे. पण या सगळ्या चेहऱ्यांच्या मागे दडलेली खरी ओळख शब्दांत नसते, ती असते वागणुकीत. कारण शब्द बोलताना माणूस सजग असतो, पण वागताना तो स्वतःला उघड करत असतो. बोलायला प्रत्येकजण गोड बोलतो. “तू माझा आहेस”, “मी नेहमी तुझ्यासोबत आहे” असे शब्द कानावर पडले की मनाला आधार मिळतो. पण शब्दांना वजन देणं जितकं सोपं असतं, तितकंच ते निभावणं कठीण असतं. वेळ आली की तीच माणसं बदललेली दिसतात. तेव्हा कळतं, की शब्द फक्त ऐकायला सुंदर होते, त्यामागे खरं मन नव्हतं. म्हणूनच फक्त बोलण्यावर कधीही विश्वास ठेवायचा नसतो. खरा माणूस ओळखायचा असेल तर तो अडचणीत कसा उभा राहतो, हे पाहिलं पाहिजे. तुमच्याकडे काहीच नसताना, तुम्हाला काहीच देता येत नसताना जो तुमच्यासोबत राहतो, तोच खरा आपला असतो. गरज नसताना जो जवळ असतो, तो नातं निभावत असतो. स्वार्थी माणूस उपयोग असेपर्यंतच गोड वागतो. तो तुमच्या यशात आनंदी दिसतो, पण अपयशात दुरावतो. काम संपलं की त्याची वागणूक थंड होते. हळूहळू शब्द आणि कृती यामधला फर...

चाफलूसी करणारा माणूस…..!

इमेज
चाफलूसी करणारा माणूस…..! चाफलूसी करणारा माणूस समोर गोड बोलतो, पण त्या गोड शब्दांमध्ये माणुसकीपेक्षा स्वार्थ जास्त दडलेला असतो. त्याची भाषा मधाळ असते, वागणूक आपुलकीची वाटते, पण त्या आपुलकीला खोलवर मुळं नसतात. तो तुमचं कौतुक मनापासून करत नाही, तर स्वतःच्या फायद्याचा हिशेब मांडत असतो. म्हणूनच त्याच्या प्रत्येक वाक्यामागे एखादी अपेक्षा, एखादा हेतू शांतपणे लपलेला असतो. अशा लोकांना तुमची किंमत नसते, त्यांना फक्त तुमची गरज असते. तुम्ही उपयोगी आहात तो पर्यंत ते तुमच्या भोवती असतात, तुमचं महत्त्व वाढवतात, तुमच्या कानावर गोड शब्दांची बरसात करतात. पण ज्या दिवशी ती गरज संपते, त्या दिवशी त्यांचं बोलणं बदलतं, वागणूक बदलते आणि शेवटी ते आपोआप दूर जातात. ते निघून जातात तेव्हा फक्त एक पोकळी उरते.कारण आपल्याला कळतं की आपली साथ नव्हे, तर आपला उपयोगच महत्त्वाचा होता. चाफलूसी क्षणभर समाधान देते.मन सुखावतं, अहंकाराला थोडं बळ मिळतं. पण हे समाधान क्षणिक असतं.कारण जिथे खोट्या शब्दांचा आधार असतो, तिथे विश्वास टिकत नाही. विश्वास हा वेळ, प्रामाणिकपणा आणि कठीण प्रसंगातून तयार होतो.गोड बोलण्यातून नाही. ख...

बोललेले शब्द आणि सोडलेली साथ....!

इमेज
बोललेले शब्द आणि सोडलेली साथ....! वेळ… तो थांबत नाही. आज जे आपल्यासोबत आहे, तेच उद्या वेगळं होऊन जाईल. आजच्या क्षणांची गोडी आपण अनुभवतो, पण तोच क्षण काळाच्या ओघात बदलतो, नवे रंग घेऊन येतो. माणसं येतात, जातात; नाती बदलतात, परिस्थिती बदलते… पण काही गोष्टी आहेत ज्या काळाच्या ओघानेही धुसर होत नाहीत. तुम्ही जे बोललेले शब्द, ते क्षणभरात आले तरी मनावर घर करतात. आनंदात दिलेले हास्य, दुःखात दिलेले आधाराचे शब्द, विश्वासाने दिलेले वचन हे शब्द फक्त ऐकले जात नाहीत, ते हृदयात जिवंत राहतात. आणि ज्या वेळी रागात किंवा विसराने एखादे शब्द उडतात, ती आठवणही काळानं मिटत नाही; ती मनात खोलवर ठसा उमटवते. साथ… ती फक्त शारीरिक उपस्थिती नाही, ती माणूस आपल्या आयुष्यात किती महत्वाचा होता याची जाणीव आहे. एखाद्या अडचणीच्या क्षणी दिलेली साथ, किंवा नुसती हसत हसत दिलेली वेळ, किंवा अचानक सोडलेली साथ ही सगळी आठवण जिवंत राहते. काही साथ आपल्या जीवनातून निघून गेली तरी ती हृदयात कायम राहते, कधी दुःख देते, कधी स्मित करून जाते. कदाचित म्हणूनच म्हणतात वेळ बदलतो, पण काही गोष्टी मनात कोरल्या जातात. आजची माया, आजचे शब्द...

जवखेडे खुर्द : ऐतिहासिक व सामाजिक पार्श्वभूमी

इमेज
जवखेडे खुर्द : ऐतिहासिक व सामाजिक पार्श्वभूमी अंजनी नदीच्या काठावर वसलेले जवखेडे खुर्द हे गाव ऐतिहासिक, सामाजिक व सांस्कृतिक वारशाने समृद्ध आहे. निसर्गरम्य परिसर, सुपीक जमीन व मुबलक पाणी यांमुळे हे गाव प्राचीन काळापासून मानवी वस्तीला अनुकूल ठरले आहे. इ.स. १६१३ मध्ये जसवंतसिंह देवडा (देवरे) यांनी जवखेडे खुर्द येथे आगमन करून मारुती गढीची उभारणी केली व गावाची अधिकृत स्थापना केली. त्यापूर्वीही विविध समाजांचे लोक या परिसरात वास्तव्यास होते; मात्र त्यांची वस्ती स्थायी स्वरूपाची नव्हती. जसवंतसिंह यांच्या आगमनानंतर गावाला संघटित स्वरूप प्राप्त झाले. जवखेडे खुर्द हे गाव जसवंतसिंह यांना वतनदारी स्वरूपात प्राप्त झालेले होते, त्यामुळे हे गाव जिल्ह्यात जमीनदारीसाठी प्रसिद्ध झाले. एक काळ असा होता की येथील एक शेतकरी तब्बल दोन हजार एकर जमिनीचा शेतसारा भरत असे, ही बाब गावाच्या समृद्धीची साक्ष देणारी होती. शैक्षणिक क्षेत्रातही या गावाने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. जुन्या काळात पुणे येथील फर्ग्युसन कॉलेजमध्ये भारताचे माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंह राव यांच्या समकालीन शिक्षण घेतलेले  व...

होतकरू मेहनतीचा विजय....!

इमेज
होतकरू मेहनतीचा विजय....! विशाल शिवनारायण पाटील यांना हार्दिक अभिनंदन! स्वप्न पाहण्याचे धाडस आणि ती पूर्ण करण्याची जिद्द असेल, तर परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी यश दूर राहत नाही.हे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे एकलग्न, ता. धरणगाव येथील विशाल शिवनारायण पाटील यांनी. महावितरणमध्ये विद्युत सहाय्यक म्हणून कार्यरत असताना, आपल्या प्रामाणिक मेहनतीच्या जोरावर त्यांनी टेक्निशियन या पदावर निवड मिळवली आहे. हा केवळ पदोन्नतीचा टप्पा नाही, तर तो आहे अनेक वर्षांच्या कष्टांचा, संयमाचा आणि न डगमगणाऱ्या इच्छाशक्तीचा गौरव. सध्या रिंगणगाव येथे कार्यरत असलेले विशाल हे अत्यंत होतकरू व चिकाटीचे कर्मचारी म्हणून परिचित आहेत. घरची परिस्थिती बेताची होती. अडचणी होत्या, मर्यादा होत्या, पण मनात असलेली आशा आणि मेहनतीवरील विश्वास कधीच कमी झाला नाही. “आपण करून दाखवू शकतो” हा आत्मविश्वास त्यांनी कधीही सोडला नाही. आणि आज त्यांनी ते करूनच दाखवले आहे. दिवसभर कष्टाचे काम, जबाबदाऱ्यांचा ताण आणि तरीही स्वतःला पुढे नेण्याची सततची धडपड—हा त्यांचा रोजचा संघर्ष होता. कोणतीही गोष्ट सहज मिळाली नाही, पण त्यांनी प...

गाईच्या पाच लिटरचा पैशांतून दिसलेली माणुसकी...!

इमेज
गाईच्या पाच लिटरचा पैशांतून दिसलेली माणुसकी...! आजच्या धावपळीच्या आणि स्वार्थी जगात जिथे माणुसकी, इमानदारी आणि विश्वास हळूहळू कमी होत चालला आहे, तिथे काही व्यक्ती अशा असतात की त्यांच्या वागण्यातून माणुसकी अजून जिवंत आहे याची खात्री पटते. बिलखेडे येथील सचिनभाऊ पाटील हे असेच एक प्रामाणिक, दिलदार आणि विश्वासू व्यक्तिमत्त्व आहे. बिलखेडे परिसरातील लोकांचे दूध संकलन करून ते जळगाव येथील विकास दूध डेअरी येथे नियमितपणे पोहोचवण्याचे काम सचिनभाऊ अतिशय जबाबदारीने करतात. हे काम करताना केवळ व्यवसाय म्हणून नाही, तर प्रत्येक शेतकरी, प्रत्येक दूध उत्पादक हा आपलाच माणूस आहे या भावनेने ते काम करतात. एका साध्या पण खूप मोठा अर्थ असलेल्या घटनेने त्यांच्या इमानदारीचा खरा चेहरा समोर आला. एका दिवसाचे गाईचे पाच लिटर दूधाचे पैसे मला मिळायचे होते. कोणतीही आठवण करून न देता, कोणताही आग्रह नसताना, सचिनभाऊंनी स्वतःहून फोन पे द्वारे ते पैसे मला घरपोच पाठवले. आजच्या काळात जिथे आपले हक्काचे पैसे मिळवण्यासाठीही मागण्या कराव्या लागतात, तिथे असा प्रामाणिक माणूस भेटणे हे खरंच भाग्याचे आहे. ही केवळ पैशांची बाब नव...