कडू शब्द पण स्वच्छ मन....!
कडू शब्द पण स्वच्छ मन....! “फक्त तोंडापुरते गोड बोलणे किंवा शांत राहणे कधीच जमले नाही, म्हणून फटकळ स्वभावच अंतःकरण स्वच्छ ठेवतो.” प्रत्येक माणसाचा स्वभाव वेगळा असतो. काही लोक शब्दांमध्ये साखर मिसळून बोलतात, तर काही लोक मनात जे असते ते सरळ ओठांवर आणतात. काहींना समोरच्याला खुश ठेवण्यासाठी गोड बोलणे सहज जमतं, तर काहींना ते कधीच जमत नाही. कारण त्यांच्यासाठी शब्दांपेक्षा सत्य अधिक महत्त्वाचं असतं. अशा लोकांना अनेकदा “फटकळ” म्हटलं जातं. पण खरं पाहिलं तर त्या फटकळ स्वभावाच्या मागे एक वेगळीच प्रामाणिकता आणि अंतःकरणाची स्वच्छता दडलेली असते. फटकळ स्वभाव म्हणजे कठोरपणा नव्हे; तो मनात काहीही न साठवण्याची सवय असते. जे वाटतं ते स्पष्टपणे बोलून टाकण्याचं धाडस असतं. कधी कधी ते शब्द थोडे कडू वाटतात, काहींना त्यातून त्रासही होतो, पण त्या शब्दांमध्ये कपट नसतं. कारण त्या बोलण्यात बनावटपणा नसतो.फक्त मनाची पारदर्शकता असते. आजच्या जगात अनेक लोक समोर गोड बोलतात, पण मनात वेगळेच विचार ठेवतात. चेहऱ्यावर हसू असतं, पण मनात मत्सर, स्पर्धा किंवा दिखावा दडलेला असतो. शब्द गोड असतात, पण भावना मात्र तितक्या ...