"निलेशभाऊ परदेशी: भारतीय जनता पक्षाचा निष्ठावंत सच्चा शिलेदार"



"निलेशभाऊ परदेशी: भारतीय जनता पक्षाचा निष्ठावंत सच्चा शिलेदार"

जळगाव जिल्ह्यातील एक अतिशय आदरणीय आणि नावाजलेलं व्यक्तिमत्त्व म्हणजे निलेशभाऊ परदेशी. भारतीय जनता पक्षाचे जिल्हा चिटणीस म्हणून त्यांची ओळख आहे, आणि एरंडोल नगरीत त्यांचं एक खास स्थान आहे. निलेशभाऊ हे प्रतिष्ठित परदेशी कुटुंबाचे सुपुत्र; रमेशभैय्या परदेशी नगराध्यक्ष यांचे पुत्र आणि नगराध्यक्ष मुकुंददादा परदेशी यांचे नातू म्हणून त्यांचं एक विशिष्ट ओळख आहे. आपल्या पूर्वजांनी दिलेल्या आदर्शांचा वारसा सांभाळून, निलेशभाऊंनी आपल्या कार्यकर्तृत्वाने आणि निःस्वार्थ सेवाभावाने आपल्या गावाला आणि पक्षाला नवीन उंचीवर नेले आहे.

भारतीय जनता पक्षाच्या कार्यामध्ये निलेशभाऊंनी भारतीय युवा मोर्चाच्या शहर अध्यक्ष पदावर सुरुवात केली. साध्या कार्यकर्त्याच्या भूमिकेतून सुरु केलेला प्रवास आज जिल्हा चिटणीस या पदावर आला आहे. जिल्ह्यातील संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे गिरीशभाऊ महाजन यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणूनही त्यांचं नाव घेतलं जातं. जिल्ह्यातील नेते गिरीशभाऊ महाजन, राजु मामा भोळे, खासदार स्मिताताई वाघ, मंगेशदादा चव्हाण, अमोलदादा जावळे, जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज जडकेकर यांच्या सहवासात राहून त्यांनी पक्षासाठी मोलाचं कार्य केलं आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी गिरीशभाऊंच्या मार्गदर्शनाखाली आणि मंगेशदादांच्या सहकार्याने अत्यंत महत्त्वाची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली आहे. त्यांच्या प्रवासात त्यांनी अनेक जबाबदाऱ्या सांभाळून आपली कार्यक्षमता सिद्ध केली आहे.

पक्षाच्या कार्यामध्ये ते नेहमी सर्व सहकाऱ्यांना सोबत घेतात, त्यांच्या समस्या ऐकून, त्यांना योग्य सल्ला देऊन मार्गदर्शन करत असतात. यामुळेच पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये ते एक विश्वासार्ह, आदरणीय, आणि निष्ठावंत नेतृत्व म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्या कार्याची खासियत म्हणजे त्यांचा साधेपणा, प्रामाणिकता, आणि सहकाऱ्यांबद्दल असलेली आत्मीयता. कुठलाही निर्णय घेताना ते प्रत्येक कार्यकर्त्याचा सल्ला घेतात आणि सर्वांचा आदर राखतात. त्यामुळेच ते कार्यकर्त्यांच्या हृदयात विशेष स्थान मिळवून आहेत. पक्षाच्या कोणत्याही आंदोलनात, अभियानात, किंवा सभा-संमेलनात ते नेहमीच अग्रेसर असतात, आणि त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यकर्त्यांना नेहमीच प्रेरणा मिळते.

आज निलेशभाऊंचा वाढदिवस आहे, आणि या विशेष दिवशी त्यांच्या सहकाऱ्यांना आणि अनुयायांना विशेष आनंद आहे. त्यांच्या संघर्षमय प्रवासातून हे सिद्ध होतं की साधेपणातच मोठेपण असतं, आणि सेवा हेच खरे नेतृत्व आहे. निलेशभाऊंनी आपल्या कर्तृत्वाने आणि निष्ठेने जळगाव जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाला एक भक्कम आधार दिला आहे, आणि त्यांच्या या सेवाभावी वृत्तीमुळे ते जनतेच्या मनात आपलं स्थान निर्माण करून आहेत.

या प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाला आज शतशः प्रणाम, आणि त्यांच्या जन्मदिनाच्या शुभेच्छा! निलेशभाऊ, आपली सेवा आणि निष्ठा अखंड राहो आणि आपण भविष्यात अधिक उंची गाठत राहावीत, हीच शुभेच्छा!

© शब्दांकन:दीपक पवार (संपादक) खान्देश माझा

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !